मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|चरितामृत|सात वारांचीं पदें| गुरुवार सात वारांचीं पदें रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार सात वारांचीं पदें - गुरुवार श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो. Tags : anandbookआनंदपुस्तकमराठी गुरुवार Translation - भाषांतर पद १ लें.भावें सेवाहो, सद्गुरु । भवसिंधूचें तारूं ॥धृ०॥करुनी भक्तीची, सांगली । पावा पैलथडी ॥१॥जपतप अवघाचि, हा शीण । गुरुविण नाहीं भजन ॥२॥जोंवरि नाहीं रे, गुरुमुख । तोंवरि कैंचें सुख ॥३॥सहज आनंदा गुरुकृपा । तरिच मार्ग सोपा ॥४॥पद २ रें.मना चिंता वाटे थोर येई राघवा । मायबाप तूं सखया स्वामी तारी तूं जडजीवा ॥नयेसी तरी प्राण झाला माझा आघवा । सत्वर मजला भेट देई कुपाळू केशवा ॥१॥सत्वर पावे तूं राघवा अवधारी । दीननाथ ऐसें ब्रीद साच करी ॥राम राम म्हणताहे वैखरी । दयासिंधु म्हणा ध्याय तूं अंतरीं ॥२॥वियोग तुझा घडि जाय कल्पांत । रात्रंदिवस मी कष्ट्तों बहुत ॥सर्वसुख जैसें विषयुक्त अमृत । असे वाटतसे नित्य ह्रदयांत ॥३॥ऐशा कारुण्यास येई श्रीरामा । मायबापा सखया स्वामी कृपा करी आम्हां ॥गणिका अजामेळ तारिले निजप्रेमा । आनंद रंक बोले नेई निजधामा ॥४॥ Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP