मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|विद्यागणपतिरहस्यम्| अध्याय १ ला विद्यागणपतिरहस्यम् अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा विद्यागणपतिरहस्यम् - अध्याय १ ला प्रस्तुत पोथी म्हणजे गणेशप्राप्तीची इच्छा करणार्यांना अत्यंत आवश्यक असें पूजाविधान. Tags : ganeshagodprayervidhiगणपतीगणेशदेवतादेवीविधी अध्याय १ ला Translation - भाषांतर गिरिराज हिमालयाच्या सोनेरी शिखरावर, ऋषिमुनींच्या सान्निध्यांत कल्पवृक्षांनीं वेढलेल्या रत्नजडित खांबांनीं युक्त असलेल्या रत्नजडित खांबांनीं युक्त असलेल्या रत्नमंडपांत रत्नमय सिंहासनावर पार्वतीसह बसलेल्या श्रीशंकराचें दर्शन घेण्यासाठीं स्वत: ब्रह्मदेव आले आणि हात जोडून स्तुति करूं लागले.“ हे शंकरा, सच्चिदान्मदस्वरूप, वेदान्तवेद्य अशा तुला माझा नमस्कार असो. ब्रह्माविष्ण्वादि-स्वरूप, सर्वभूतांच्या अंतर्यामीं असलेल्या तुला माझा पुन्हां पुन्हां नमस्कार असो. ”या स्तुतीनें संतुष्ट झालेले भगवान् शंकर म्हणाले, “ ब्रह्मदेवा ! तुझें स्वागत असो. तुझी सृष्टि निर्माण करण्याची कामगिरी व्यवस्थित चालू आहे ना? मी तुझ्या स्तुतीनें संतुष्ट झालों आहें.तुझ्या येण्याचें कारण काय ? ”तेव्हां ब्रह्मदेव म्हणाले, “ हे देवेशा, तुला अज्ञात असें कांहीं नाहीं; आणि दुसरें असें कीं, तुझ्या चरणकमलाच्या दर्शनाशिवाय माझ्या-सारख्याला दुसरें कोणतें मोठें फल असणार? तरीहि माझ्या मनांत एक गोष्ट जाणून घ्यावयाची आहे. ती म्हणजे सर्व देवदेवतांनी उपास्य म्हणून मानलेला श्रीगणेश आणि त्याची विश्व-स्वरूपी महाविद्या, जिनें मायेनें हें चराचर विश्व निर्माण केलें आहे, जिला परब्रह्मस्वरूप म्हणतात, त्या विद्यासहित विघ्नेश्वराला जाणण्याची माझी इच्छा आहे. तरी त्यासाठीं यंत्र, तंत्र, पुरश्चर-णादि क्रिया कृपा करून मला सांगा.”तेव्हां श्रीशंकर म्हणाले, “ ब्रह्मदेवा, ऐक, सर्व ऐश्वर्य देणार्या, सर्व लोकांना विमोहित करणार्या, चतुर्विध पुरुषार्थांचें साधन असलेल्या आणि सर्व सिद्धि प्रदान करणार्या गणेशाचें यथायोग्य स्वरूप तूं ऐक. ” असें म्हणून ते सांगूं लागले :श्रीविद्यागणेशस्य दक्षिणामूर्ति: ऋषि: । देवी गायत्री छंद: ।विद्यागणेश्वर: देव: ।गं बीजम् ।र्हीं शक्ति: ।पंचबीजात्मक: र्हामिति षडंग: ।तथा च ध्यानम् - “ करीन्द्रवदनं वन्दे त्रिनेत्रं चन्द्रशेखरम् ॥अधस्तात् वनिताकारं सिन्दूरारुणविग्रहम् ॥१॥उत्तुंगस्तनभारोद्य-द्रत्नभूषणभूषितम् ॥क्कणत्किंकिणीकाकांची-मणिनपुरभूषितम् ॥२॥बीजापूरं गदां चापं शूलं चक्रं सरोरुहम् ॥पाशोत्पले च व्रीह्यग्रं स्वदन्तं रत्नकुंभकम् ॥३॥बिभ्रत्सकंकणैर्हस्तै-रुभाभ्यां हेमशृंखलम् ॥बिभ्रंत विद्यागणपं ध्यायेत्सर्वार्थसिद्धये ॥४॥ ”इति ध्यानम् । हें ध्यान दररोज प्रात:कालीं १६ वेळां करावें.त्यानें सर्व इच्छा पूर्ण होऊन विघ्नेश्वर प्रसन्न होतो.आतां मी तुला विघ्नराजाचा मंत्रोद्धार कथन करतों:“प्रणवं पंचबीजाढयं विद्याप्रथमखण्डकम् ॥गणपतिं चतुर्थ्यन्तं द्बितीयं खंडमुच्यते ॥१॥वरद्बयदमुच्चार्य तृतीयं खंडमेव च ॥पश्चात् सर्वजनं मेऽद्य वशमानय संयुतम् ॥२॥स्वाहे-त्युक्तो गणेशस्य मन्त्रोऽ सर्वसिद्धिद: ॥धन-धान्यप्रद: सद्य: सर्वलोकवशंकर: ॥३॥आयुष्कर: प्रजावृद्धिकरो व्याधिविनाशकृत् ॥ ”हा मंत्र सदगुरूच्या मुखांतून ग्रहण करावा.सद्गुणी, गणेशभक्त, मंत्रवेत्ता, दयाळू, शांत आणि परंपरेनें चालत आलेल्या क्तिया करणार्या सद्गुरूकडून ‘ विद्यागणपति मंत्र ’ घ्यावा. N/A References : N/A Last Updated : May 24, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP