मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|भीमरूपी स्तोत्रे| चपळ ठाण विराजतसे बरें । प... भीमरूपी स्तोत्रे भीमरूपी महारुद्रा । वज्रह... जनीं ते अंजनी माता । जन्म... कोपला रुद्र जे काळीं । ते... अंजनीसुत प्रचंड । वज्रपुच... हनुमंता रामदूता । वायुपुत... कपि विर उठला तो केग अद्भ... रुद्र हा समुद्र देखतांक्ष... भुवनदहनकाळीं काळ विक्राल ... लघूशी परी मूर्ति हे हाटका... चपळ ठाण विराजतसे बरें । प... नमन गा तुज हे भिमराया । न... भिम भयानक तो शिक लावी । भ... बळें सर्व संहारिलें रावणा... भीमरूपी स्तोत्र - चपळ ठाण विराजतसे बरें । प... श्री समर्थ रामदास्वामींनी रचलेली ' भीमरूपी स्तोत्रे ' पठन केल्यास मारूतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. Tags : hanumanmarutiramdassamarthaमारूतीरामदाससमर्थहनुमान भीमरूपी स्तोत्र - ९ Translation - भाषांतर चपळ ठाण विराजतसे बरें । परम सुंदर रूप साजिरें ।धगधगीत बरी उटि सिंदुरे । निकट दास कपी विरहें खरें ॥१॥कपी वीर जेठी उडे चारि कोटि । गिरी द्रोण दाटी तळातें उपाटी ।झपेटी लपेटी करी पुच्छवेटी । त्रिकूटाचळीं उठवा वीर कोटी ॥२॥रघुविरा समिरात्मज भेटला । हरिजनां भजनांकुर फूटला ।कपिकुळें सकळें मिनलीं बळें । रिपुदळें विकळें वडवानळें ॥३॥कपीवीर तो लीन तल्लीन झाला । प्रसंगेचि पाहोनि सन्मूख आला ।हनूमंत हें पावला नाम तेथें । महीमंडळीं चालिलें सर्व तेथें ॥४॥नव्हें सौख्य हा भीम पूर्णप्रतापी । देहो आचळातुल्य हा काळरूपी ।पुढें देखतां दैत्यकूळें दरारा । भुतें कांपती नाम घेतां थरारां ॥५॥सिमा सांडिली भीमराजें विशाळें । बळें रेटिलें दैत्य कृत्तांत काळें ।गजामस्तकीं केसरीचा चपेटा । महावीर तैसा विभांडी त्रिकूटा ॥६॥॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥९॥ N/A References : N/A Last Updated : September 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP