भीमरूपी स्तोत्र - कोपला रुद्र जे काळीं । ते...

श्री समर्थ रामदास्वामींनी रचलेली ' भीमरूपी स्तोत्रे ' पठन केल्यास मारूतीचा आशीर्वाद प्राप्त होतो.


कोपला रुद्र जे काळीं । ते काळीं पाहवेचिना । बोलणें चालणे कैंचें । ब्रह्म-कल्पांत मांडला ॥१॥
ब्रह्मांडाहून जो मोंठा । स्थूळ उंच भयानक । पुच्छ तें मुर्डिलें माथां । पाऊल शून्यमंडळा ॥२॥
त्याहून उंच वज्राचा । सव्य बाही उभारिला । त्यापुढें दुसरा कैंचा । अद्भुत तुळणा नसे ॥३॥
मार्तंडमंडळाऐसे । दोन्ही पिंगाक्ष ताविले । कर्करा घर्डिल्या दाढा । उभे रोमांच ऊठिले ॥४॥
अद्भुत गर्जना केली । मेघची वोळले भुमीं । तुटले गिरिचे गाभे । फुटले सिंधु आटले ॥५॥
अद्भुत वेश आवेशें । कोपला रणकर्कशू । धर्म-संस्थापनेसाठीं । दास तो ऊठिला बळें ॥६॥

॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP