मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|चित्रकथा|सुदाम्याचे पोहे| भाग १६ ते २० सुदाम्याचे पोहे प्रसंग १ ते ५ भाग ६ ते १० भाग ११ ते १५ भाग १६ ते २० भाग २१ ते २५ भाग २६ ते ३० भाग ३१ ते ३५ भाग ३६ ते ४० भाग ४१ ते ४५ भाग ४६ ते ५० भाग ५१ ते ५५ भाग ५६ ते ६० भाग ६१ ते ६५ भाग ६६ ते ७० भाग ७१ ते ७६ सुदाम्याचे पोहे - भाग १६ ते २० प्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो Tags : storysudamकथासुदाम भाग १६ ते २० Translation - भाषांतर १६ [ इंद्रसेनाच्या वाड्यांतील चौक . नोकर चंद्रसेनाला घेऊन येतो . ] चंद्रसेन : मी जाणार ... मी जाणार ... मला शिकायचं आहे .... ] [ चंपाराणी येते . ] चंपाराणी : काय आहे रे गडबड ? नोकर : ह्यांना शिकायला जायचंय् ... समोरच्या घरांत ... चंपाराणी : त्या सुदाम्याच्या खोपटांत ? शिकायला ? दळभद्री मेला ! चल , इकडे ये असा . काय करायचं आहे रे तुला शिकून ? तुझ्या वडिलांना ओ कीं ठो येत नाहीं ... तरी ह्या कपिलानगरीवर राज्य करताहेतच ना ते ?.... कालयवनमहाराजांचे प्रतिनिधि म्हणून ? [ इतक्यांत सुदामा येतो . ] सुदामा : अहो , पण बाप निरक्षर असला म्हणून मुलानं शिकूं नये , असं थोडंच आहे ! आहे त्याची शिकायची इच्छा तर .... चंपाराणी : पुरे पुरे ! हा शिकणार नि तूं ह्याला शिकवणार ! उजेद तुझ्या अकलेचा पोथ्या - पुराणं वाचायला शिकवून आपल्यसारखी भीकच मागायला शिकवणार न ! तूं त्याला ? चल , चालता हो इथून ... दक्षिणेच्या लोभानं मला शहाणपणा शिकवूं नकोस .... सुदामा : श्रीहरि ! श्रीहरि ! अहो , द्रव्याच्या लोभान मी बोलत नाहीं . मुलाच्या शिक्षणाआड येऊं नका , एवढंच माझ म्हणणं ... चंपाराणी : कांहीं अडणार नाहीं त्याचं शिकण्यावांचून हा कांहीं तुझ्यासारखा दरिद्री कंगालच्या पोटीं आलेला नाहीं . चांगला धनवंताचा मुलगा आहे हा ! समजलास ? सांदीपनी शिष्य आणि त्या कृष्णाचा मित्र म्हणून सार्या गांवाला झुलव . मला सांगूं नकोस तुझा नसता मोठेपणा ! हे चंपाराणी तुला चांगली ओळखून आहे , चल , हो चालता जा म्हणतें ना !.... चल रे कार्ट्या ! [ सुदामा मुकाट्यानें निघून जातो . चंपराणी चंद्रसेनाला दरादरा ओढीत आंत नेते व एका खोलींत कोंडून घालते . चंद्रसेन ’ मी जाणार ’ असें ओरडत असतो . ] चंपाराणी : तोंड मीट . नाहींतर आज जेवायला घालणार नाहीं ... सांगून ठेवतें .... म्हणे शिकणार ! ( इतक्यांत शिंग - नगार्याचा आवाज ऐकू येतो . ) अगबाई ! स्वारी आली वाटतं ? १७ [ इंद्रसेन दिवाणखान्यांत येतो . नोकर कपडे उतरूं लागतात . तोंच चंपाराणी येते . ] इंद्रसेन : चंद्रसेन कुठं आहे ? चंपाराणी : आज मी त्याला कोंडून ठेवलाय् ! इंद्रसेन : कोंडून ठेवलाय् ? तें कां ? चंपाराणी : दिवसेंदिवस भारीच मस्तवाल होत चालालय् तो . इंद्रसेन : म्हणजे ? एवढं केलं तरी काय त्यानं ? चंपाराणी : दुसरं काय करणार ? समोरच्या त्या भिकारड्या सुदाम्याकडे जाऊन बसला म्हणतो कसा ... मला शिकायचं आहे . डोंबल शिकायचं आहे ! इंद्रसेन : शिकेन शिकत असला तर . त्यांत वाईट काय आहे ? चंपाराणी : अक्कल आहे का तुम्हींला ? तो भिकारडा माझ्या मुलाला शिकवणार ? इंद्रसेन : सुदामा दरिद्री असला तरी विद्दान् आहे ... ज्ञानी आहे .... चंपाराणी : पूरे तुमचं ! हे मेले दरिद्री लोक लवकर उलथून कां जात नाहींत जगांतून ... इंद्रसेन : दरिद्री असणं हा काय गुन्हा आहे माणसाचा ? चंपाराणी : दरिद्री असणं गुन्हा नसेल . पण आढ्यतेनं वागणं ... इंद्रसेन : तो बिचारा कुणाशीं काय आढ्यतेनं वागतोय् ? चंपाराणी : तर ... तर ! केवढी आढ्यता मेल्याची ?..... तशीच ती त्याची बायको ! तिचा तर केवढा तोरा ! पाहावी तेव्हां आपल्याच ह्याच्यांत ! उभा गांव इथं आमच्यापुढं हात जोडून उभा असतो ! पण ही नवराबायको चुकून कधीं आमच्या दारावरून देखील जात नाहींत ... इंद्रसेन : अस्सं ! म्हणजे तीं दोघं पुढं पुढं करून तुमच्याकडे हात पसरत नाहींत म्हणून त्यांच्यावर तुमचा एवढा राग ! चंपाराणी : होयच मुळीं . हे कोण समजतात आपणाला ? दरिद्री ते दरिद्री अन् वरती ही अशी शिरजोरी ? इंद्रसेन : मग ? त्यांना कुणाची आहे चोरी ? एक गरीब ब्राह्मणकुटुंब रात्रंदिवस कष्ट करून प्रामाणिक आयुष्य कंठतंय् ... स्वभिमानान जगतंय् ... चंपाराणी : ( चिडून ) गप्प बसा . माझ्यासमोर नका त्यांचे गोडवे गाऊं ... लाखदा कानींकपाळीं ओरडलें कीं हे भिकारडे माझ्या वाड्यासामोर नकोत म्हणून ! पण ऐकतांय् कुठं ? आज पुन्हा बजावतें .... आजच्या त्यांना हाकलून द्या इथून .... पण तसं कशाला ? अश्शीच जातें नि मीच .. [ तरातरा जाऊ कागते . इंद्रसेन तिला अडवितो . ] इंद्रसेन : अहो , पण जरा दमानं घ्या . त्यांना हुसकून लावायला कांहीं कारण तर हवं चंपाराणी : कारण कसलं कपाळाचं ? आमची मर्जी हेंच कारण !.... फुक्कट झालांत नगराधीश ! कांकणं भरा हातांत ! इंद्रसेन : समजलं . एकूण तुम्ही सुदाम्याचा राग चंद्रसेनावर काढलात ! कुठ कोंडलंय त्याला ? चंपाराणी : त्या तिकडे खोलींत .... इंद्रसेन : एकूलतं एक पोर ...( खोलीकडे जाऊं लागतो . ) चंपाराणी : घ्या गळ्यांत बांधून ! खबरदार त्याला बाहेर काढलंत तर ! इंद्रसेन : राहिलं ! ( चंपाराणी जाते . ) १८ [ दोन पांथस्थ ब्राह्मण इंद्रसेनाच्या वाड्यांत येतात . फहारेकरी त्यांना अडवितो . ] पहारेकरी : अरे , कोण तुम्ही ? कुठं चाललांत ? [ इंद्र्सेन येतो . ] इंद्रसेन : कोण आहे रे ? पहारेकरी : ( हात जोडून ) महारज ! हे वाड्यांत घुसत होते .... ब्राह्मण : आशेनं आलोंत महाराज ! कांहीं दान ... दक्षिणा ... संभावना ... इंद्रसेन : या ... आंत या .... [ इतक्यांत चंपाराणी येते . ] चंपाराणी : कशाला आंत या ? इथं काय अन्नछत्र आहे ? १ ब्राह्मण : मध्यान्हाची वेळ आहे .... ब्राह्मण दारीं आले आहेत .... चंपाराणी : मग समोर जा ... त्या सुदाम्या ब्राह्मणाकडे ! आयतं पोटभर गिळायला मिळेल ! २ ब्राह्मण : पण आपण कांहीं संभावना करा ! चंपाराणी : करतें हं तुमची चांगली संभावना ! पहारेकरी , हाकलून दे ह्यांना धक्के मारून ! [ पहारेकरी ब्राह्मणांना हाकलतो . ] इंद्रसेन : काय हें ? हें बरं नाहीं झालं चंपाराणी : फार छान झालं ! एकादशीच्या घरीं शिवरात्र गेलीं ! ( हसते . ) १९ [ ते ब्राह्मण सुदाम्याकडे येतात . सुदामा त्यांचें स्वागत करतो . ] सुदामा : ( हात जोडून ) या , या भूदेव ! तुमचं स्वागत असो ! मी गरीब ब्राह्मण ! तुमची काय संभावना करणार ? पण मध्यान्ह - समय आहे . भोजन करून चला .... बसा ... बसा . आलोंच मी .... २० [ सुदामा स्वयंपाकघरांत येतो . ] सुदामा : ( सुशीलेस ) बाहेर दोन पांथस्थ ब्राह्मण आले आहेत . जेवायची आहेत ... सुशीला : त्याच तयारीला लागलें आहें . सुदामा : म्हणजे ? तुला कसं कळलं ? सुशीला : दारीं आलेला अतिथी तुम्ही जेवल्याशिवाय जाऊं देणार होय ? सुदामा : किती ग चतुर आहेस तूं ! पण आतां असेल तेंच वाढ त्यांना .... सुशीला : आहे काय वाढायला ? आपण एक अर्धपोटीं राहात असलों तरी पाहुण्यांना पोटभर घातलं पाहिजे . सुदामा : खरं आहे . पण लवकर आटप . बिचारे भुकेजले असतील . सुशीला : त्यांना पाणी द्या हातपाय धुवायला . तंबर झालंच माझं ... सुदामा : जशी तूं सुग्रण आहेसच ग ! N/A References : N/A Last Updated : August 30, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP