रोगोपचार - कडिस उपाय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


हिंगुळ तोळा ३ आकलकाठा तोळा येक ३ कासवाचि वाटि जाळुन भस्म करणे ही येकत्र करूण तेलासि खलने कडिस लावने आत घालने वरि वेट घुलियाचि बळकट देऊन बांधने आंबट तिखट तेल वर्ज रोग समे ॥

मोठे मानसास अगर लेकरास बीजनळ अगर जंताचि उत्पत्ति असोन पोट तोडत असले त्यास अवषध ॥

काळा बोळ हिंग डिकिमालि सदर्हु गोळी नाथिचे रसात करूण देन ॥

। -कुड विद्र व गुळात गोळी करूण देन ॥

रगतबोळ आंबिहळद सदर्हु माठेफलासि देन जवखार मासा भर लेनियात गोळी करून देउन वरती पथ्य दूध भात ॥

अथ पारज प्रयोग ॥ पारा आवळीचा रस ॥ - तुळसीचा रस काळिया धोतर्‍याचा रस ॥ - शुभ्र चिची सजिर व टागानेर कली . रस उतरेल त्या रसा करुण मेलिया सिद्ध होय ॥ चालप्रमाणें विडियासी खाने प्राणी तेजवंत होय .

अथ रस उतारः ॥ पारथा सिरडे ॥

बाबुलिची साल निबुखातर सांबार बांगि तांदुळजायाचा काढा करूण गुरलिया दाबुन पोटांत देने नाडिस सांदे सांदे जिरवने उतार होय ॥

हरताळाचा उतार काटेकोहळियाचा रस जिरवणे उतार होय ॥

हिंगुळाचा उतार रान पोफळि रानमुळा उतार दूध ॥

सोमलाचा उतारू सोनईघा ॥ आफूचा उतार मुलतान्या हिंग सम भाग देने ॥

अथ बीज स्तंब प्रयोगः ॥ खरजूर सवा सेर ॥

साखर रायपुरि सेर मर्कटीचे बीज सेर कुपका पावसेर २ करिट्याचे बीज पावसेर :। - अष्टियाचे बीज पावसरे सुंठ पिंपळी मिरे पिंपळामुळ वजन तोळे ६ कलमि तुज ६ लवंग जायपत्रि दर तोळा ६ येक वाघाटिचे मुळ भेंडिचे मुळ घाटुळिची मुळि सराटे पांढर्‍या गुलबासाचा कंद दुध तीन सेर ३ त्यांत पाक करणे वारंवार भुरका टाकने पाक सिद्ध होय ॥

सुपारि प्रमाण मात्रा करण सायं प्रातःकाळी भक्षने पथ्य आंबट तिखट वर्ज सातवे दिवसी जागने वीर्यस्तंभ होय ॥

गत इंद्रियतेजाः तेजः पुंज विरामा न होय ॥ पण भोकरिचे चेरटे सवासेर साखर सवासेर पत्री लवंग जायफळ दर तोळा ३ तजपत्र नागेश्र्वर तोळा येक ॥

वाघाटिच्या मुळाचा भुरका ३ दुधांत पाक करने गोळि बांधने सायंप्रातः काळी भक्षिणे गेला इंद्रिय सिद्ध होईल ॥ पथ्य आंबट तिखट तेलकट वर्ज ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP