विद्यानन्द - श्लोक १ ते २०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


मागील तीन आनंद प्रकरणांत योगाभ्यास, आत्मविवेक आणि द्वैतमिथ्यात्व यांच्या योगानें क्रमेकरुन ब्रह्मनंद अनुभवणार्‍या पुरुषास जो एक प्रकारचा विद्यानंद होतो तो आह्मी या प्रकरणांत संवादरुपानें सांगतो. ॥१॥

गू०- आतां तुला विद्यानंदाचें स्वरुप सांगतो. विषयानंदाप्रमाणें हा विद्यानंदही बुधिवृत्तिपासून होणारा आहे. त्याचे दुःखाभाव आदिकरुन चारप्रकार आहेत. ॥२॥

शि०- ते चार प्रकार कोणते ? गू०- दुःखाभाव सर्व इच्छेची तृप्ती कृतकृत्यता आणि प्राप्तप्राप्यता. ॥३॥

दुःखाचेही दोन प्रकार आहेत एक ऐहिक आणि दुसरें आत्मष्मिक ऐहिक दुःखाची निवृत्ति बृहदारण्यक श्रुतींत सांगितली आहे. ॥४॥

शि० ती श्रुति कोनती ? गू०- "आत्मनं चेत" यांचा अभिप्राय असा कीं, आत्मा मी आहें असें जाणणार्‍या पुरुषास भोक्तृत्वाच मुळीं खों ? ठरल्यानें शरीराची दुःखें कशी होतील ? कारण इच्छा पुरुषांस भोक्तृत्वच मुळीं खोटें ठरल्याने शरीराची दुःखें कशी होतील ? कारण इच्छा करणारा व इच्छिला विषय हे दोन्हीं मिथ्या ठरतात. ॥५॥

शि०- आत्म्याला शोकसंबंध कसा आला? गू० आत्मे दोन प्रकारचे जीवात्मा व परमात्मा तीन देहाच्या तादात्म्यानें तो जीव होऊन भोक्ता झाला. ॥६॥

शि०- परमात्म्याचें स्वरुप सांगा. गू०- परमात्मा मुळचा सच्चिदानंदरुप आहे. तो नामरुपाशीं तादात्म्य पावल्यामुळें भोग्य झाला. त्त्या नामरुपांचा विवेक केला असतां त्याचा भोक्तेपणा आणि भोग्यपणा हीं दोन्हींही नाहींशी होतात. ॥७॥

शरीरास ज्वर ह्मणजे संताप झाला असतां तो आपणावर घेण्याचे करण हें कीं भोक्त्याकरितां भोग्य विषयाची इच्छा होते हे ज्वर तीन शरीरांस मात्र आहेत. आत्म्याला मुळींच नाहींत. ॥८॥

शि०- कोणच्या शरीराला कोणचा ज्वर आहे ? गू०- धातुवैषम्यानें ज्या व्याधीं होतात ते स्थल शरीरांतील ज्वर होत. कामक्रोधाधिक सूक्ष्म शरीरातील ज्वर आणि त्या दोहींस कारण जें अज्ञान तें कारण शरीरारातील ज्वर. ॥९॥

अद्वैतानंद प्रकरणांत जो आह्मीं विवेचनाचा मार्ग सांगितला, तेणेंकरुन आत्म्याचें विवेचन केले असता वास्तविक भोग्य पदार्थ कोठेंच दिसत नाहीं. मग आत्मवेत्यास इच्छा कशाची व्हावी? ॥१०॥

शि०- ते ज्वर आत्म्यास कसे लागत नाहींत ? गू०- आत्मानंद विवेचन करण्याची जी रीत आम्हीं सांगितली त्या रीतीनें जीवत्माचा निश्चय झाला असतां भोक्ता मुळींच नाहींसा होतो. मग ज्वरांचा संबंध कसा लागेल? ॥११॥

शि०- हें ऐहिक दुःख झालें आतां आमुष्मिक तें कोणतें ? गू०- पुण्यपापाची जी चिंता तेंच आमुष्पीक दुःख ही चिंता ज्ञान्यास ताप देत नाहीं अशा अर्थाची श्रुति आह्मीं प्रथमाध्यायीं सांगीतली आहे. ॥१२॥

शि०- प्रारब्धकर्माची चिंता नसो पण आगा मी कर्माची तरी बाधा आहे कीं नाहीं ? गू०- तीही ज्ञान्यास नाहीं. ज्याप्रमाणें कमल पत्र पाण्यांत असून त्याचा त्यास स्पर्श होत नाहीं. त्याप्रमाणें ज्ञानोत्तर काळीं आगामी कर्माचा संपर्क ज्ञान्यास लागत नाहीं ॥१३॥

शि०- मग संचित कर्माची व्यवस्था कशी ? गू०- ज्या प्रकाणें इषीका तुणांचा कापुस अग्नि लागतांच जळुन जातें त्याप्रमाणें ज्ञान होतांच संचित कर्म जळुन जातें ॥१४॥

याविषयीं गीतेंतही प्रमाण आहे ज्याप्रमाणें पेटलेला अग्नि लांकडांचीराख करुन टाकतो, त्याप्रमाणें हा ज्ञानाग्नि सर्वकर्माचे भत्म करुन टाकतो. ॥१५॥

देहादिकाविषयीं ज्याचा अहंभाव अगदीं गेला, ज्याची बुद्धि कर्मामध्यें लिप्त होत नाही. त्याच्या हातुन लोकांचा जरी मोठा घात झाला तरीतें पापतो करितो असें होत नाही, व तो कर्मांत बद्ध होत नाहीं. ॥१६॥

शि०- काय असं शास्त्रांत आहे काय ? गू० शास्त्रात आहे काय ? गू०- शास्त्र तर राहुं द्यां आशाविषयीं श्रुतीतहीं प्रमाण आहे तें असें कीं एकदां निश्चयात्मक ज्ञन होऊन मुक्तिमिळाली असतां मातापितरांचें वघ, चोरी भ्रुणहत्या इत्यादि महा पातकेंजरी घडलीं तरी त्याच्या मोक्षास हानी येत नाही. इतकेंच नव्हे तर त्याची मुखकांति जशाची तशीच असते. ॥१७॥

शि०- हा दुःखाभावा झाला, आतां सर्व कामाची प्राप्ति ती कशी ? गू० तीही श्रुतींतच सांगितली आहे. ब्रह्मवेत्यांस सर्व कामाची प्राप्ति होऊन तो अमृत होतो अशा अर्थात श्रुति आहे. ॥१८॥

ब्रह्मवेत्ता खावो, पिवो, खेळो, स्त्रियांबरोबर रममाण होवो, आबालवृद्धाबरोबर क्रीडा करो, त्याणें कांहीं केलें, तरी देहांचें स्मरण नसतें, कुडींत प्राण असेंपर्यंत पुर्व कर्माच्या योगानें त्याचें जीवन कसें तरी होतें. ॥१९॥

शि०- कर्मफलाचा भोग आहे असें म्हटल्यावर ज्ञान्यास जन्म आहे असे म्हणावें लागेल. गू०- ज्ञानेंकरुन संचित कर्म दग्ध झाल्यामुळे त्याला जन्म नसून सर्व कामाची प्राप्ति होते.श्रोत्रियाचेठायीं जे भोग घडतात त्यास क्रम म्हणून कांहींच नसतो जसे प्राप्त होतील तसे तो भोगतो. ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP