ब्रह्मानन्दे आत्मानन्द - श्लोक ४१ ते ६०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


साक्षी आणि पंचकोश यांत प्रत्यक्ष भेद असूनही तो भ्रमानें भासत नाही. स्थानूवर जसा चोराचा भ्रम व्हावा तसा कोशांवर आत्माचा भ्रम होतो. ह्मणून प्रत्येक कोश मिथ्यात्मा समजावा. ॥४१॥

आणि त्या सर्व कोशांचा जो साक्षीं तोच मुख्यात्मा समजावा. कारण तेथें भेद मुळींच नाहीं व भासतही नाहीं कारण भेद असण्यास व भासण्यास दुसरा कोणी एक प्रतियोगी पाहिजे. साक्षीस तसा प्रतियोगी कोणीच नाही. याला मुख्यात्मा ह्मणण्याचें कारण हेंच कीं तो सर्वाचेठायीं आहे. ॥४२॥

या तीन आत्मयपैकीं ज्या ज्या व्यवहारांत जो जो आत्मा योग्य असेल त्या त्या व्यवहारांत त्याला मुख्यत्व देऊन इतर गौण ( उपसर्जन ) असें समजावें ॥४३॥

जेव्हा बाप मरणांस टेंकतो तेव्हा आपलें घर शेत इत्यादिकांचे रक्षण व्हावें ह्मणून आपल्या बायकामुलांनाच त्या कामी योजितो. ह्मणून त्यांनाच येथें आत्मात्व दिले पाहिजें. कारण साक्षी अविकारी असल्यामुळे मुख्यात्माचा येथें उपयोग नाही आणि देह मरणॊन्मुख असल्यामुले मिथ्यात्माही निरुपयोगी आहे. ॥४४॥

यांस दृष्टांत " अध्येता ( अध्ययन करणारा ) अग्नि आहे " या वाक्यांत खरा दुहन करणारा अग्नि समजावयाचा नव्हे. कारण अध्ययन करण्याचा गूण त्यामध्ये नाहीं, ह्मणून अध्ययन करणारा शिष्यच असा या ठिकाणीम अग्नि शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. ॥४५॥

तसेंच " मी कृश झालों आहे " " दुग्ध पिऊन मला लठ्ट झालें पाहिजे अशा व्यवहारांत अन्न भक्षणाला योग्य अशा देहालाच आत्मत्व दिलें पाहिजे. कारण तेथेंपुत्रांचा उपयोग नाही. ह्मणून येथें मिथ्यात्म्यालाच प्राधान्य दिलें पाहिजे. ॥४६॥

त्याचप्रमाणें तप करुन स्वर्गास मी जाईन अशा इच्छनें जेव्हा मनुष्य तप करितो तेव्हा तेथें कर्ता जो विज्ञानमय त्यालाच आत्म्यत्व दिलें पाहिजे देहास देता येतां नाहीं. कारण तेव्हा तोशरीरास सूख देणारें सर्व भोग एकीकडे सारुन कृच्छ्रनांद्रायणादि तपाचें अनुष्ठान करितो ॥४७॥

तसंच शमादि साधनानें मला मुक्तिव्हावी असें जेव्हा मनुष्य इच्छितो तेव्हा गूरुशास्त्राचे साहायानें त्यास ज्ञान होतें मग त्याला कांहींच करण्याची इच्छा नसते. अशा प्रसंगी मुख्यात्म्यालाच प्राधान्य दिलें पाहिजे ॥४८॥

ब्राह्मणानें बृहस्पतिसवेंकरुन यज्ञ करावा या वाक्यावरुन तो यज्ञ करण्याचा अधिकार ब्राह्मणालाच आहे. राजानें राजसूययज्ञ करावा, या वाक्यावरुन तो यज्ञ करण्याचा क्षत्रियासच अधिकार आहे. आणि वैश्यानें स्तोमनामक यज्ञ करावा, या वाक्यांत तो यज्ञ करण्यास वैश्यालाच अधिकार आहे त्याप्रमाणें गौण मिथ्या व मुख्य हे तीनहीं आत्मे त्या त्या उचित व्यवहारांत प्रधान आहेत. ॥४९॥

ज्या ज्या व्यवहारीं जो जो आत्मा प्रधान असेल त्या त्या व्यवहारांत त्या त्या आत्म्यावर अतिशय प्रीति असते. त्यावांचून त्याच्याकरितां जे दुसरें पदार्थ आहेत त्यांजवर प्रीतिमात्र असते. पण तितकी नसते. आणि त्यावांचून इतर पदार्थावर प्रीतिही नसते आणि अतिप्रीतिही नसते. ॥५०॥

आतां इतर पदार्थ ह्मणून जें वर ह्मटलें त्याविषयीं मनूष्याच्या मनाची वृत्ति दोन प्रकारची असते. एक उपेक्षा आणि दुसरी द्वेषवृत्ते या व्रुत्तिभेदानें पदार्थातही उपेक्षा आणि द्वैष्य असे दोन भेद झाले. मार्गावर पडलेले तृणादिक हे उपेक्षा आहेत आणि व्याघ्रसर्पादिक दुष्ट प्राणी द्वेष्य आहेत. याप्रमाणें मनोवृत्तीचे प्रकार चार झाले. ॥५१॥

आत्मा आत्मशेष उपेक्ष्य आणि द्वैष्य या चारीमध्यें अमुकच आत्मा, अमुकच त्याच शेष, अमुकच उपेक्ष्य आणि अमुकच द्वैष्य असें ह्मणतां येत नाही. तर त्या त्या समयीं त्या त्या कार्यापासून जशी जशी लाभ हानी असेल त्या त्याप्रमाणें ते समजाव्याचें. ॥५२॥

येथें वाघांचेंच उदारहण घेतलें ह्मणजें झालें. वाघ समोर आपल्या आंगावर आला असतांना तो द्वैष्य होतो. दुर डोंगरावर जात असतां उपेक्ष्य होतो. आणि तोच पालन करणार्‍या दरवेशाला लाभदायक असल्यामुळे प्रिय होतो. ह्मणजे त्यास आत्मशेषता येते. ॥५३॥

या तिन्हींचें येथें लक्षण सांगितलें असतां समजण्यास बरें पडेल कारण येथें व्यक्तिचा नेम नाहीं. ते लक्षण असें कीं पादार्थ अनुकुल असतां प्रिय होतो. प्रतिकुल असतां द्वेष्य होतो. आणि दोन्हींही नसेल तर तो उपेक्ष्य समजावा. ॥५४॥

यावरुन असें झालें कीं आत्मा हा सर्वांत प्रिय आणि त्याला उपकार करणारे पदार्थ त्याहुन कमी प्रिय आणि त्यावांचून बाकीच्या पदार्थात कांहीं द्वेष्य आणि उपेक्ष्य अशी व्यवस्था याज्ञवक्ल्यांनीं केली आहे. ॥५५॥

याप्रमाणें पुरुषविध ब्रह्मणांतही आत्म्याचा अतिप्रियपणा वर्णिला आहे तेथें असें ह्मटलें कीं, " सर्वाच्या अंतरी असणारा आत्मा पुत्र वित्त व दुसर्‍या सर्व पदार्थांपेक्षां फार प्रिय आहे." ॥५६॥

आतां श्रुतीस अनुसरुन विचारदृष्टीनें पाहिलें असतां सर्वंचा जो साक्षी तोच आत्मा ठरतो. येथें विचार ह्मणजे हाच कीं पंच कोशाचा विवेक करुन आपल्या आंत दृष्टि घालावी. ॥५७॥

जागृती, स्वप्न, आणि सूषुप्ति या तीन अवस्थाचें येणें ज्याला सहज समजतें तोच स्वप्रकाश चिद्रुप आत्मा. ॥५८॥

या साक्षीवांचून बाकीचे प्राणापासून वित्तापर्यंत सर्व पदार्थ जितके जितके आत्म्याच्याजवळ जवळ असतील तितकी तितकी त्याविषयीं अधिक अधिक प्रीति जितके जितके आत्म्याच्या जवळ जवळ असतील तितकीं तितकी त्याविषयीं अधिक अधिक प्रीति असलेली दृष्टीस पडते. ॥५९॥

जसें द्रव्यापेक्षा मनूष्यांस पुत्र प्रीय आहे . कारण पुत्रांच्या जीवावरील धोंका निवारण्यास द्रव्य खर्च करितो. पुत्रापेक्षाहीं आपला देह प्रिय आहे. कारण स्वदेह रक्षणाकरितां पुत्रादिकाला दुसर्‍यास दिल्याची उदाहरणें पुष्कळ आहेत, तसेंच इंद्रियांचा नाश होण्याचा प्रसंग आला म्हणजे मनुष्य देहपीडा देखील सहन करितात. म्हणून देहापेक्षाहीं इंद्रियें प्रिय म्हटलीं पाहिजेत. आणि प्राणावर संकट आलें म्हणजे तो वांचाविण्याकरितां नाक डोळे गेलें तरी फारशी परवा नसते. म्हणून इंद्रियापेक्षां प्राण प्रिय आहेत. याप्रमाणें उत्तरोत्तर एकांहुन एक अधिक प्रिय असल्याचा अनुभव आबाल वृद्धांस आहे. आणि प्राण्यापेक्षाहीं आत्मा प्रिय आहे. हा अनुभव मात्र तत्त्ववेत्यासच आहे. ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP