ब्रह्मानन्दे योगानन्दः - श्लोक २१ ते ४०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


तें खरें मुख विषयापासून होत नाहीं. विषयापासून होत नाहीं. विषयापासून होणारें सूख विषयुक्त अन्नाप्रमाणें हजारों दुःखांनी वेढलेली असल्यामुळें तें दुःख समजलें पाहिजे अशा अभिप्रायानेंच त्रिपुटीमध्ये सूख नाहीं. असें सनत्कुमारांनी सागितलें. ॥२१॥

याजवर असा एक पुर्वपक्ष आहे कीं , द्वैतात सूख नाहीं हें आम्हास कबुल; पण तुमच्या अद्वैतांत तरी तें कुठें आहे; जर आहे म्हणतांच तर त्याचा अनुभव असला पाहिजे आणि अनुभव जर असेल तर अनुभव घेणारा, आणि अनुभव घेण्याची वस्तु हीं दोन्हीं असलीं पाहिजें तीं दोन घेतलीं म्हणजे पुनः त्रिपुटी येऊन अद्वैतहानी झालीच. ॥२२॥

याचे उत्तर आह्मी असें देतों कीं अद्वैत निराळें असून त्यांना निराळें सूख आहे असें आमचें ह्मणणें मुळींच नाहीं, कारण, अद्वैत हेंच स्वतः सूख आहे. ही गोष्ट इतकी प्रत्यक्ष आहे कीं तिला दुसर्‍या प्रमाणांची जरुर नाहीं. कारण ते स्वयंप्रकाश आहें. ॥२३॥

त्याच्या स्वयंप्रकाशत्वाविषयीं अद्वैतांस सूख नाहीं म्हणणाराचें वाक्यच प्रमाण आहे. कारण तो जेव्हा वाक्य बोलला तेव्हा अद्वैतांत सूख आहे किंवा नाहीं एवढीच मात्र त्यास शंका आहे पण अद्वैताच्या अस्तित्वाविषयीं त्याला शंकाच असल्याचें दिसत नाही. तेव्हा प्रमाणावांचून त्याला अद्वैत भासलें असें ठरतें ॥२४॥

आतां याजवर जो प्रश्न येणार तो आम्हांस माहेतच आहे तो असा कीं, आम्हीं तुमचे अद्वैताचा अनुभव कबुल करीत नाहीं. अद्वैतांत सूख नाहीं असें जें म्हटलें तें तु मचेंच वाक्य घेऊन म्हंटलें ! तर याजवर आम्हीं असें विचारतो, द्वैताचे पुर्वी काय हो तें ते त्यांनींच सांगावें. ॥२५॥

अद्वैत होतें कीं द्वैत होतें किंवा दोन्हीवाचून तिसरा कांहीं प्रकार होता. तिसरा प्रकार तर मुळींच संभवत नाही. कारण अनुभवास येणार्‍या काय त्या दोन वस्तुः एक द्वैत किंवा अद्वैतः यावांचून तिसरी गोष्ट मुळींच नाही. बरें तेव्हा द्वैत होतें असें जर म्हणावें तर द्वैतांच्या पुर्वी द्वैत कसें असेल ? या रीतीनें दोन पक्षांचें खंडण झाल्यावर तिसरा पक्ष जो अद्वैत तो सहजच सिद्ध झाला, ॥२६॥

ही अद्वैत सिद्धि युक्तीनें सिद्ध करुन न आमचें तोंड बंद केलें. अनुभवास येत नाहीं असा आरोप पुन आमचेवर येणारचः तर त्याजवर आम्हीं असें विचारतों कीं, ती युक्ति दृष्टातपुर्वक आहे कीं, अदृष्टांतपुर्वक आहे ? ह्मपैकीं एक प्रकार असला पाहिजे तिसरा प्रकार मुळींच संभवत नाहीं. ॥२७॥

अनुभव तर नाहींच आणि दृष्टांतावांचून तर युक्ति सिद्ध होत नाहीं, ह्मणून युक्तीला दृष्टांत पाहिजे. असें झालें तो दृष्टांत उभय वाद्यांस मान्य असला पाहिजे असा दृष्टांत कोणचा तो सांगा. ॥२८॥

यास दृष्टांत प्रलयाच चांगला आहे कारण तेथें द्वैत नाहें जेथें द्वैत नाहीं ते अद्वैत जशी निद्रा आतां आम्ही पुसतों कीं निद्रा तरी अद्वैत कशावरुन ? त्यास पुनः एक उदाहरण पाहिजे दुसर्‍याचे निद्रेचें ते उदाहरण देतील तर त्यांचे मोठें पांडित्यच समजलें पाहिजे. कारण ज्याला स्वतःची निद्रा समजत नाहीं त्याला दुसर्‍याची कशी समजेल ? ॥२९-३०॥

याजवरही त्यांचे उत्तर आहेच; तें हें कीं दुसरा निःचेष्ट झाला म्हणजे तो निजला असं समजावें तें तरी कशावरुन समजलें अस आम्ही विचारणरच त्यांचे उत्तर आपल्या अनुभवावरुन दुसर्‍याची निद्रा तेव्हा अर्थातच स्वप्रभत्व कबुल करणें भाग पडलें. ॥३१॥

कारण, सूषुप्तीचें ज्ञान करुन देण्याला इंद्रियादि इतर साधनेंही नाहींत व दृष्टांतही नाहीं असे असून सूषुप्ति समजली म्हणतात. तेव्हा अर्थातच ती स्वयंप्रकाश असें ठरलें साधनावांचून जें ज्ञान तेंच स्वयंप्रकाश. ॥३२॥

याप्रमाणें सूषुप्ति अद्वैत असून स्वयंप्रकाश आहे असें सिद्धझालें; परंतु तेथें सूख आहे कीं नाहीं ही अद्यापि शंका राहिलीच या शंकेचा परिहार हा कीं, जेथें दुःख नाहीं तेथे सूख असलेंच पाहिजे. निद्रेंतील दुःखाभावाचा अनुभव सर्वास आहे. तेव्हा अर्थातच बाकी सूख राहिलें. ॥३३॥

यास श्रुतीचे प्रमाण असं आहे कीं निद्रेमध्ये देहाभिमान लीन झाल्यामुळें मनूष्यास आपण आंधळा जखमी किंवा रोगी असूनही त्यांचे भान त्याला कांहींच नसतें असा प्रत्येक मनुष्याचा अनुभवही आहे. ॥३४॥

याजवर कोनी ह्मणेल कीं दुःख नाही एवढ्याचमुळे सूखाचे अस्तित्व सिद्ध होत नाहीं. कारण लोष्टशिलादिकांची ठाथी त्या दोहींचाही अभाव आहे ? पण हा दृष्टांतांच बरोबर नाहीं. ॥३५॥

कारण दुसर्‍याचे सूखदुःखाचें जें आनुमान करावयाचें तें केवळ त्यांचे मुद्रेवरुन मुद्रा प्रफुल्लित असली तर त्यास सूख झालें आहे, व ती म्लान असली तर दुःख झालें आहे असंसमजावयाचें पण तु जो लोष्टाचा दृष्टांत दिलास तेथें दुःखादिकाचें अनुमान करण्यास मार्गच नाही. ॥३६॥

दुसर्‍याचें सूखदुःख जसे अनुमानानें समजावयाचें तसं स्वकीय सूखदुःख समजण्यास अस्तित्व जसें अनुभवानें समजतें तसा त्यांचा अभावही अनुभवानेंच समजतो दुसर्‍या प्रमाणाची जरुर नाही. ॥३७॥

याकरितां आपल्यानिद्रेमधील दुःखाभाव ज्या अर्थी अनुभवानें समजतो त्या आर्थीं विरोधि दुःखाच्या अभावामुळे राहिलेलें सूख अनुभवास आलेंच पाहिजे. ॥३८॥

निद्रेंत जर सूख नसेल तर मोठ्या प्रयासाने मऊ गाद्या गिर्द्या इत्यादिक साधनें करण्याच्या खटपटींत मनुष्य कशाला पडता? ॥३९॥

तो जो खटपट करितो ती केवळ दुःखनिवारणार्थ; तेथे कांहीं नवीन सूखाची प्राप्ति नाहीं अशी शंका कोणी घेऊ नये. कारण ती गोष्ट कदाचित रोग्याला लागू पडेल पण धडधाडक मनूष्य देखील जो इतका त्या साधनार्थ प्रयत्न करितो त्या अर्थी तो सूखार्थच असला पाहिजे यांत संशय नाहीं ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP