कूटस्थदीप - श्लोक १ ते २०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.

ज्याप्रमाणें भिंतीवर आकाशातील सुर्याचा एक प्रकाश पडला असुन त्यावर दुसरा आरशामधील प्रतिबिंबित सुर्याचा प्रकाश पडावा त्याप्रमाणें हा देहही दोन प्रकारच्या ज्ञानानीं प्रकशीत झाला आहे. पुर्वी ब्रह्माज्ञानाचे योगानें प्रकाशित असुन त्याजवर आणखी एक जीवाचा प्रकाश पडुन तो विशेष स्पष्ट होतो. या दृष्टांतांत खर्‍या व खोट्या सुर्याचे दोन प्रकाश दुर्शवुन एक ब्रह्माचे सामान्य ज्ञान आणीदुसरें जीवांचे विशेष ज्ञान अशी दोन ज्ञानें दर्शविली येथें देहस्थानींभिंत कुटस्थ स्थानीं आकाशांतील सुर्य जीवास्थानी आरशांतील सुर्य आणि बुद्धिशानीं आरसा अशी दृष्टांतांची योजना समजावी ॥१॥

अशा प्रकारच्या निरनिराळ्या आरशांची किरणें भिंतीवर पडलीं असतां मध्यतरी किंवा ती सर्व किरणें आरसे काढुन टाकुन नाहींशी केली असतां सर्वत्र आकाशांतील सुर्याचा सामान्य प्रकाश स्पष्ट दिसतो ॥२॥

ज्याप्रमाणें वरील दृष्टांतात विशेष प्रकाशापासुन सामान्य प्रकाश निराळा स्पष्ट भासतो. त्याप्रमाणे चिदाभास युक्त ज्या निरनिराल्या बुद्धीच्या वृत्ती उठतात त्यांच्या मध्यंतरी किंवा त्याच्या अभावी कुटस्थ ज्ञानाचा प्रकाश स्पष्ट भासतो. तो वाचकांनी सुक्ष्म दृष्टीनें घ्या नांत आणावा . ही देहांतील गोष्ट झाली. आतां देहाबाहेरही हीं दोन प्रकारची ज्ञानें तशींच अनुभवास येतात. ज्या वेळां आम्हांस घट समजतो त्या वेळीं केवळ घटापुरत्यास व्यापुन असणार्‍या व्याप्न असणार्‍या बुद्धीतील चिदाभासास फक्त घटांचे मात्र ज्ञान होतें हे चिदाभास ज्ञान समजावें आणी तो घट मीं जाणला ही गोष्ट ज्या ज्ञनानें समजतें तें ब्रह्माज्ञान असे जाणावे पहिलें विशेष आणि दुसरें सामाज्य आहे ॥४॥

ब्रह्माज्ञनानीं जर घट समजतो तर आणखी बुद्धि ती कशाला पाहिजे ? असे कोणाचा प्रश्न असेल तर त्यांचे समाधान हें कीं बुद्धिवांचुन घटाचे समजणें न समजणे हे भेद मुळींच संभवणार नाहींत बुद्धि उप्तन्न होण्यापुर्वी या घटांचे ज्ञान ब्रह्मास होतें ते न समजुन होतें; आणि तेंच बुद्धिचा उदय झाल्यावर ब्रह्माला त्या घटाचें ज्ञान ब्रह्मास होतें तें न समजुन होतें आणि तेंच बुद्धीचा उदय झाल्यावर ब्रह्माला त्या घटांचे ज्ञान समजुन झालें एवढाच काय तो भेद ॥५॥

एकाच घटाला ज्ञातत्व आणी अज्ञातत्व ही दोन्हींही कशीं संभवतात हें ध्यानंत येण्यास ज्ञान व अज्ञान या दोहींचे स्वरुप चांगलें समजलें पाहिजे ज्या बुद्धिवृत्तिच्या शेवटीं चिदाभास असतो अशी जी, शेवटी पोलाद असलेल्या भाल्यासारखी वृत्ती तेंच ज्ञान आणि ज्यांत स्फूर्ति मुळींचे नाहीं ते अज्ञान ह्मा दोहोंनी पाळी पाळीने घट व्याप्त होतो ॥६॥

येथें घटाची ज्ञातता ब्रह्माला कशीसमजली अशी कोणी शंका घ्यावयास नको अज्ञात कुंभ जसा ब्रह्माला भासला तसा ज्ञात कुंभही ब्राह्मालाच समजतो असें म्हणन्यास कोनती नड आहे ? कारण घटाचे ज्ञातत्व उप्तन्न होतांच निंदाभसाच क्षय होतो तेव्हा चिदाभासास त्या घटाची ज्ञातात कशी समजेल ? ॥७॥

घटाची अज्ञातता अशी अज्ञानानें उप्तन्न होते तशी घटाची ज्ञातता उप्तन्न होण्यास केवळ बुद्धीनेंच साधन बस आहे त्यांत आणखी चिदाभास कशाला पाहिजे अशी शंका घेऊं नये कारण नुस्ती बुद्धि आणि माति या दोहोंमधें जाड्यत्वाचें संबधांने कांहींचे भेदनाहीं. म्हनून ज्ञातता उप्तन्न होण्यास चिदाभासाची अवशय्कता आहे ॥८॥

जसा केवळ मातीनें सारविलेला घट ज्ञत ह्मणजे जाणिला असें म्हणतां येत नाहीं त्याप्रमाणें चिदाभासरहित केवळ बुद्धिनें व्यापिलेला घट जाणलाअसेम म्हणता येणार नाही ॥९॥

याकरितां चिदाभासरुप फलाची जी उप्तात्ती तेंच कुंभाचे ज्ञातत्व तें ज्ञातत्वं उप्तन्न करणें हे कांही ब्रह्मांचे काम नव्हें कारण घत स्फुरण होण्यापुर्वीही ब्रह्मा होतेंच ॥१०॥

घटादिक पदार्थांचे ज्ञान होताना ज्या ज्ञानाचा उपयोग होतो तेंच ज्ञान आपच्या वेदान्त शास्त्रांत चिदाभास शब्दांणे प्रसिद्धि आहे । असें सुरेश्वराचार्याचे वार्तिक आहे ॥११॥

या वार्तिकातं असे चिदाभासालाच घट ज्ञानाचें प्रमाणफलत्व दिलें आहे व शंकराचार्याच्या उपदेशसाहस्त्रीनामक ग्रंथातहीं ब्रह्मा आणि चिदाभास यांचा भेद तसाच वर्णिला आहे ॥१२॥

याकरितां चिदाभास उप्तन्न होतांच घटांचे ज्ञातत्व उप्तन्न होते म्हणजे घट समजतो आणी तें ज्ञातत्व पुर्वीच्या अज्ञातत्वाप्रमाणें ब्रह्मालाच समजते ॥१३॥

चिदाभासाचें काम केवळ थट स्फुरण करणे असें असल्यामुळे त्याला घट मात्र समजतो. ॥१४॥

एवंचं असे सिद्ध झाले कीं घटज्ञान होतांना त्याजवर दोन प्रकारच्या ज्ञानाचें व्यापार घडतात हे जें आम्ही घटांची ज्ञातता समजणारें ब्रह्माज्ञान संगितलें त्याला निय्यायिक अनुव्यवसायाख्य म्हणतात ॥१५॥

दोनही ज्ञानें साधारण व्यवहारांतील भाषाणावरुनही समजुन येतात जेव्हा एकाद्याच्या मुखांतुन हा घट असा उद्गार निघतो तेव्हा तो चिदाभास ज्ञानामुळे निघाला असें समजावें आणि जेव्हा हा घट मला समजला असें तो म्हणता तेव्हा तें ब्रह्माज्ञानाचें लक्षण समजावें ॥१६॥

एथवर देहाबाहेर ब्रह्माज्ञान आणि चिदाभास ज्ञान या दोहोंमधील भेद दाखविला आतां तसांत भेद देहांचे आंतही कुटस्थ आणि चिदाभास या दोहोंचे विवेचन करुन दाखवुं ॥१७॥

ज्याप्रमाणें तापलेल्या लोखंडांत अग्नि ओतप्रोत व्यापुन असतो त्याप्रमाणें अहं वृत्तीत व दुसर्‍या कामक्रोधादिक वृत्तीमध्यें चिदाभासही व्यापुन असतो ॥१८॥

आणी ते तापलेलें लोखंड जसें लोखंड जसें आपल्याला मात्र भासवितं तशी त्या आभासाहवर्तमान वृत्तीही आपल्यालाच भासवितात ॥१९॥

या सर्व वृत्ती क्रमाने एका मागुन एक अशा उप्तन्न होतात. व सुषुप्ति मूर्च्छा समाधि या अवस्थामध्यें त्या सर्व लीन होतात ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP