महावाक्यविवेक - श्लोक १ ते ८

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


गु०- आतां तुला चार वेदांतील चार महावाक्यांचा अर्थ क्रमेंकरुन सांगतों त्यांत प्रथमतः ऋग्वेदापैकीं ऐतरेयारण्यकोपनिषदांतील " प्रज्ञानंब्रह्मा" या महावाक्यातील "प्रज्ञान" शब्दाचा अर्थ सांगतों. ज्या चैतन्याच्या योगेंकरुन हा जीव पहातो. ऐकतो वास घेतो बोलतो व हें गोड आणि हे कडु असें रसनाद्वारें जाणतो, त्यास "प्रज्ञान" असे ह्माटले आहे शि०- "प्रज्ञान" या शब्दाचा अर्थ समजला आतां ब्रह्मा म्हणजे काय तें कृपा करुन सांगा ॥१॥

गु०- ब्रह्मादिदेवाचेठायीं मनुष्याचेंठायीं गवाश्वादि पशुचेठायीं आणि आकाशादि पंचभुतांचेठायीं जन्मास्थितिलयां स हेतभुत सर्वत्र व्यापुन असणारें जें चैतन्य तेंच ब्रह्मा येणेकरुन "एषब्रह्मा" एष इंद्र" इत्यादी अवांतर वाक्यांचाही अर्थ सांगितल्यासारखा झाला असें जें सर्वत्र व्यापुन असणारें जें प्रज्ञान तें जर ब्रह्मा आहे, तर माझ्याठायीं व्यापुन असणारें जे प्रज्ञान तेंहीं असलेंच पाहिजे हेंच वाक्यांचे तात्पर्य शि० हें ऋग्वेदांतील माहावाक्य झाले आतां यजुर्वेदापैकीं बृहदारण्यकोपनिषदंतील "अहं ब्रह्मास्मि " या महावाक्यांचा अर्थ कृपा करुन सांगावा ॥२॥

गु०- बरें आहे, प्रथम " अहं " शब्दांचा अर्थ सांगतो. देशकालवस्तुपरिच्छेरहित परिपुर्न असा परमात्मा तत्त्वज्ञानास अधिकारी अशा देहाचेठायीं बुद्धिचा साक्षी होऊन जो प्रकाशत आहे त्यालाच येथें अहं असें म्हटलें ॥३॥

आतां ब्रह्माशब्दांचा अर्थ एक स्वभावतः जो देशकालवस्तु परिच्छेदरहित सर्वत्र व्यापुन असणारा परमात्मा तोच येथें ब्रह्मा असे समजावें "अस्मि"या क्रियापदानें "अहं " आणि ब्रह्मा या दोन पदांचें सामानाधिकरण्य करुन जीवब्रह्माचें ऐक्य दर्शविले म्हणुन मीच ब्रह्मा आहे असें या महावाक्यचें तात्पर्य आहे. शि०-"प्रज्ञानं ब्रह्मां " आणि "अहं ब्रह्मास्मि" यादोन महावाक्यांना अर्थ समजला आतां सामवेदापैकीं छांदोग्यश्रुतील तत्त्वमासि या वाक्यांचा अर्थ कृपा करुन सांगावा ॥४॥

"सदेवसौम्येदमग्र असीदिकमेवाद्वितीयम " या श्रुतीने सृष्टीच्या पुर्वी जी स्वगतादि भेदशुन्य नामरुपरहित सद्वस्तु होतो ती आतांही तशीच आहे असें दाखविण्यासाठी येथें तत्पदाचा उपयोग केला आणि तत्पदाचा अर्थ तीच सद्वस्तु असेंसमजावें ॥५॥

आणि उपदेश श्रवण करणारा जो शिष्य त्यांच्या देहेंद्रियाचा जो साक्षी म्हनजे तिन्हीं शरीरांस जो पाहाणारा तोच येथें त्वंवदानें दाखविला. आणि आसि म्हनुन जेंक्रियापद या वाक्यांत आहे त्यानें "तत " आणि त्वंस या दोन्हीं पदांचें ऐक्य सांगितलें त्याच्या अनुभव मुमुक्षुनीं घ्यावा.शि आतां चौथें जें महावाक्य " अयमात्माब्रह्मा "त्याचा अर्थ संगावा ॥६॥

गु०- अयम या शब्दाचा अर्थ असा कीं आत्मा हा अवेद्य असुन स्वयंप्रकाश व अपरोक्ष आहे. तो अदृश्य पदर्थासारख परोक्षही नाहीं व घटादि पदार्थासारखा दृश्य ही नाही असें दाखविण्यासाठीं येथें अयं या पदाची योजना केली. शि०- अहो, पण आत्मा हा शब्द देहालाही केव्हा केव्हा लावतात मग या महावाक्यातील आत्मा या शब्दाचा विवक्षित अर्थ कोणता ? गु०- अहंकारापासुन देहापर्यंत जितकीं म्हणुन जड तत्त्वें आहेत त्या सर्वांचा जो साक्षीं तोच येथें आत्मा असें समजावें शि०- ब्रह्माशब्दाचाही विवक्षित अर्थ समजला पाहिजे कारण ब्रह्माणादिकांनाहीं ब्रह्माण म्हनतात याकरतां तो कृपा करुन सांगावा ॥७॥

गु०- तुं म्हणतोस तें खरें आहे. या वाक्यातील ब्रह्मा शब्दांचा अर्थ असा आहे की, जितके म्हणुन दृश्य पदार्थ आहेत त्वा सर्वांचे जे अधिष्ठान तत्त्व तेंच येथें ब्रह्मा आसे समजावें हेंब्रह्मा सच्चिदानंदरुप आहे. तें व वर सांगितलेला आत्मा ही दोन्ही एकच आहेत असें त्य महावाक्यंचें तात्पर्य ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP