* रूपसत्र :

एक काम्य व्रत. फाल्गुन व. अष्टमीला मूळ नक्षत्र असेल, तर त्या दिवशी या व्रताला आरंभ करतात. याचा विधी असा - मूळ नक्षत्र, त्याचा अधिपती वरुण, चंद्र व विष्णू यांची पूजा करून होम करावा. गुरूचा सन्मान करावा. दुसर्‍या दिवशी उपवास करून विष्णुला पायापासून डोक्यापर्यंतच्या निरनिराळ्या अवयवांवर व केसांवर निरनिराळ्या नक्षत्रांची कल्पना करून पूजा करावी. व्रताचा शेवट चैत्र मासातील शुद्ध पक्षाच्या शेवटी करावा. उद्यापनाच्या वेळी श्रीविष्णूची पूजा व

'तद् विष्णौ: परमं पदम्' या ऋग्वेदीय मंत्राने होम करावा. त्यानंतर गुरूला दक्षिणा द्यावी, ब्राह्मण भोजन घालावे.

फल - स्वर्गप्राप्ती आणि स्वर्गातून परत आल्यावर राज्यप्राप्ती.

* शाकाष्टका :

फाल्गुन वद्य अष्टमीला हे नाव आहे. या दिवशी आठ शाकभाज्या ब्राह्मणाला दान देऊन पितरांचे श्राद्ध करावे, असे सांगितले आहे.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP