मार्गशीर्ष शु. अष्टमी

Margashirsha shudha Ashtami


१ श्रवणिका व्रत :

हे व्रत मार्ग. शु. चतुर्थीस व अष्टमीस करतात. या तिथींना ब्राह्मण, कुमारिका यांना भोजन घालावयाचे असते. कुमारिकांच्यापुढे बारा जलपात्रे आलंकृत करुन ठेवावीत आणि एक जलपात्र स्वतःच्या मस्तकावर ठेवून केशवाचे ध्यान करावे, असे सांगितले आहे.

२ श्रीदत्तात्रय नवरात्र :

मार्ग. शु. अष्टमीस दत्तात्रयाच्या नवरात्राची यथाविधी स्थापना करतात. या नवरात्राच्या दिवसांत व्रतस्थ राहून गुरु-चरित्राच्या पारायणाचा सप्ताह करतात. सप्ताहाच्या शेवटी पौर्णिमेच्या दिवशी दत्तात्रयाच्या मूर्तीचे पूजन करून ब्राह्मणभोजन घालून पारणे सोडतात.

N/A

N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP