मार्गशीर्ष शु. प्रतिपदा

Margashirsha shudha Pratipada

 


* अनरक व्रत :

एक ऋतुव्रत. हेमंत व शिशिर ऋतूंत हे करतात. मार्ग. शु. प्रतिपदेपासून याचा प्रारंभ होतो. यात केशवपूजा व 'ॐ नमः केशवाय' या मंत्राचा १०८ वेळा जप करतात.

 

* कात्यायनी व्रत

नंदव्रजातील कुमारिकांनी श्रीकृष्ण पती मिळावा, म्हणून मार्गशीर्ष मासात महिनाभर व्रत केले. त्या प्रात:काळी यमुनेत स्नान करीत व कात्यायनीदेवीची वालुकामय मूर्ती बनवून तिची पूजा करीत.

 

* खंडोबा-नवरात्र :

मल्हारी-म्हाळसा नवरात्र किंवा खंडोबा-नवरात्र, हे नवरात्र मार्गशीर्ष शु. प्रतिपदेपासून सुरु होते. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही प्रदेशांत बहुसंख्य जनतेचे कुलदैवत खंडोबा हे आहे. या खंडोबाच्या नवरात्राची स्थापना देवीच्या शारदीय नवरात्राप्रमाणेच करतात. मार्गशीर्ष शु. षष्ठीस हे नवरात्र संपते. (पाहा - चंपाषष्ठी )

N/A

N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP