आश्‍विन शु. द्वादशी

Ashvina shudha Dvadashi


अखंड द्वादशी

एक तिथिव्रत. एकादशीस उपवास. द्वादशीस विष्णुपूजा. व्रतावधी एक वर्ष.

फल - धर्मकृत्यातले न्यून पूर्ण होते.

 

* अशोकाद्वादशी

तिथिव्रत. आश्‍विन शु. दशमीपासून प्रारंभ. यात केशवाची पूजा करायची असते. त्यादिवशी अल्पाहार, एकादशीस उपवास व द्वादशीस पारणा असा याचा विधी आहे. व्रतावधी एक वर्ष -

फल - आरोग्यलाभ व शोक-मुक्ती.

 

*कौमुदीव्रत

एक विष्णुव्रत. आश्‍विन शु. द्वादशीस व्रताचा प्रारंभ. त्या दिवशी कमळांनी विष्णूपूजा, त्रयोदशीस वैष्णवक्षेत्राची यात्रा, चतुर्दशीस उपवास व जागरण, पौर्णिमेला विष्णुपूजा व

'ॐ नमो नारायणाय, ॐ नमो वासुदेवाय'

या मंत्राचा जप, असा या व्रताचा विधी आहे.

फल -वैकुंठप्राप्ती.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP