भाद्रपद व. चतुर्दशी

Bhadrapad vadya Chaturdashi


* अघोर चतुर्दशी

भाद्रपद व व. चतुर्दशीचे हे नाव. या दिवशी उपवास करून शिवपूजा करतात.

भाद्रे मास्यस्थिते पक्षे अघोराख्या चतुर्दशी ।

तस्यामाराधित: स्थाणुर्नयेच्छिवपुर ध्रुवम् ॥

अर्थ - भाद्रपद व. चतुर्दशीला अघोरा असे नाव आहे. त्या दिवशी शंकराची पूजा केली असता तो भक्‍ताला शिवलोकी नेतो.

* दुर्मरणश्राद्ध

जो मनुष्य तिर्यग्योनी (मनुष्येतर, कुत्रा आदी पशू, पक्षी ) प्राण्याच्या दंशाने आणि विष-शस्त्राच्या आघाताने मृत असेल, किंवा ब्राह्मणद्वारा हत्या झाली असेल (ब्रह्मघाती ) तर त्याचे श्राद्ध भाद्रपद व. चतुर्दशीला केल्याने त्याचा आत्मा तृप्ती पावतो.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP