-
क्रि.वि. वेगानें जाणारी बंदुकीची गोळी , बाण छडी किंवा चाबकाचा मार , दुःखाचा वेग , तिडीक , कळ वगैरेचा उद्रेक यांच्या प्रमाणें आवाज करून . [ ध्व . ] सणकणें - अक्रि . सणकन् आवाज करून जाणें . शीळ घालणें , गाणें ; तिडीक निघणें . [ ध्व ]
-
पु. १ उत्सवप्रसंग ; उत्सवदिवस ; आनंदाचा दिवस . २ उत्सवप्रसंगी केलेली चैन , मौज , जेवणावळ वगैरे . रीण काढून सण करणें . ३ सणाच्या दिवशी विशेषतःदसरा ; दिवाळी वगैरे प्रसंगी आश्रितांना वाढून द्यावयाचे जेवण , शिधा वगैरे . ४ विवाहोत्तर जावई वगैरेस किंवा इतर नातेवाईकांस दिवाळी , शिमगा वगैरे प्रसंगी द्यावयाच्या मेजवान्या , भेटी , देणग्या , पोषाख वगैरे . [ सं . क्षण ]
-
पु. ताग . भक्षितो सण कसा कडबा हो । - किंगवि २२ . [ सं . शण ]
-
०करी पु. कारू , बलुतेदार , आश्रित वगैरे सणाच्या दिवशी ज्यांस वाढणें शिधा वगैरे द्यावयाचा असतो ते
Site Search
Input language: