-
न. १ रक्षण ; सांभाळ . २ रक्षण करण्याचे साधन ; आधार . एवंगुण लक्षण । सात्विक भोज्य जाण । आयुष्याचे त्राण । नीच नवे हे । - ज्ञा १७ . १३१ . ३ नरकापासून तारण ; मुक्ति ; मोक्ष . ४ अतिशय जोराचा , नेटाचां , सर्व शक्ति एकवटून केलेला प्रयत्न . एक शर सोडोनियां त्राणे । कर्णनंदन उडविला । - जै १८ . ७९ . ५ संतापाने , त्वेषाने केलेली आदळाआपट , आरडाओरड इ० ; हातपाय झाडणे व चडफडणे . ६ ( जीर्ण वस्त्र , वस्तु , दुबळा मनुष्य , जनावर इ० कांत ) राहिलेला , शिल्लक असलेला दम ; जीव ; जोर ; धडधाकटपणा ; सत्त्व ; ताकद ; सार . [ सं . त्रा - त्राण ]
-
-
ना. जीव , जोम , जोर , ताकद , धडधाकटपणा , बळ , शक्ती , सत्त्व , सामर्थ्य .
-
त्राण [trāṇa] त्रात [trāta] त्रात &c. See under त्रै.
Site Search
Input language: