Dictionaries | References

हिरवा

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
To worry exceedingly and at all seasons and whether or no.

वि.  १ पाच , शेवाळ , कोंवळें गवत इ० च्या रंगाचा . २ ( ल . ) कच्चा ; अपक्व ; अपुरा शिजलेला ( फळ , अन्न , रसायन , वीट ). ३ कोती ( समजूत , विचार ). ४ अपक्व वासाचा ; कच्च्या रुचीचा . ५ ( सांके . ) भांग , गांजा किंवा तो ओंढणारा इसम . ६ भांडखोर ; ज्याचें कोणाशींहि पटत नाहीं असा ; हिरवट . [ सं . हरित ]
०एरंड  पु. एरंडाची एक जात .
०कंच   
०गार   
०चार वि.  अतिशय हिरवा ; गर्द हिरवा .
०कच्चा वि.  १ अर्धवट पिकलेलें ( फळ इ० ). २ अर्धवट शिजलेलें , भाजलेलें . ( अन्न इ० ). ३ अर्धवट केलेलें ( काम ).
०चांपा   चांफा - पु . एक फूलझाड . याच्या उलट पांढरा , पिवळा चांपा .
०निळा   पिवळा - वि . काळानिळा ( राग , मत्सर , विष इ० मुळें झालेला - चेहरा , मुद्रा ).
०भाजला   सदानकदा , कांहींहि झालें तरी अतिशय छळणें , त्रास देणें . हिरवट - वि . १ साधारण किंचित् ‍ हिरवा . २ किंचित् ‍ अपक्व ; कच्चा . ३ तंबाखूसह गांजा ओढणारा . ४ ( ल . ) अडाणी ; अशिक्षित ; रानवट . ५ अविचारी ; तापट ; एककल्ली ; चिडखोर ; तिरसट . मृत्यू ऐसा व्याघ्र । मुख पसरोनि समोर । तेथें हिरवटाचार । देहधेनूतें केंवि रुचे । - मुरंशु २८२ . हिरवटाण - स्त्री . हिरवा चारा , फळ इ० ची घाण ; हिरवा असल्याची घाण . [ हिरवट + घाण ] हिरवंडा - वि . १ हिरवट . अर्थ २ पहा . २ हिरवट घाण येणारें , हिरवट असलेलें ( फळ , वीट इ० ). हिरवस - वि . हिरवंडा . हिरवसान - पु . ( गो . ) हिरवटपणा ; कच्चेपणा . हिरवळ , हिरवाळ , हिरावळ - स्त्री . ओलें , हिरवेंगार गवत , वनस्पति इ० चा समुदाय . सडकून पर्जन्य पडला म्हणजे आठा दिवसांत चोहींकडे हिरवळ होत्ये . हिरवळणें - अक्रि . हिरवा पाला फुटणें पाल्हेजणें . वाळले काष्ठ हिरवळेना । - दा ९ . ७ . २९ . हिरवा घेवडी - स्त्री . हिरव्या शेंगा येणारी घेवडयाची वेल . हिरवीजमीन - स्त्री . ( कों . ) जमीन प्रथम माजल्याशिवाय , दाढ केल्याशिवाय जीत पेरणी केली आहे अशी जमीन . हिरवी तमाखू - स्त्री . ( सांके . ) गांजा . हिरवें - न . गुरांना खाण्यास उपयोगी असें हिरवे गवत , पाला इ० हिरवळ .
खाणें   सदानकदा , कांहींहि झालें तरी अतिशय छळणें , त्रास देणें . हिरवट - वि . १ साधारण किंचित् ‍ हिरवा . २ किंचित् ‍ अपक्व ; कच्चा . ३ तंबाखूसह गांजा ओढणारा . ४ ( ल . ) अडाणी ; अशिक्षित ; रानवट . ५ अविचारी ; तापट ; एककल्ली ; चिडखोर ; तिरसट . मृत्यू ऐसा व्याघ्र । मुख पसरोनि समोर । तेथें हिरवटाचार । देहधेनूतें केंवि रुचे । - मुरंशु २८२ . हिरवटाण - स्त्री . हिरवा चारा , फळ इ० ची घाण ; हिरवा असल्याची घाण . [ हिरवट + घाण ] हिरवंडा - वि . १ हिरवट . अर्थ २ पहा . २ हिरवट घाण येणारें , हिरवट असलेलें ( फळ , वीट इ० ). हिरवस - वि . हिरवंडा . हिरवसान - पु . ( गो . ) हिरवटपणा ; कच्चेपणा . हिरवळ , हिरवाळ , हिरावळ - स्त्री . ओलें , हिरवेंगार गवत , वनस्पति इ० चा समुदाय . सडकून पर्जन्य पडला म्हणजे आठा दिवसांत चोहींकडे हिरवळ होत्ये . हिरवळणें - अक्रि . हिरवा पाला फुटणें पाल्हेजणें . वाळले काष्ठ हिरवळेना । - दा ९ . ७ . २९ . हिरवा घेवडी - स्त्री . हिरव्या शेंगा येणारी घेवडयाची वेल . हिरवीजमीन - स्त्री . ( कों . ) जमीन प्रथम माजल्याशिवाय , दाढ केल्याशिवाय जीत पेरणी केली आहे अशी जमीन . हिरवी तमाखू - स्त्री . ( सांके . ) गांजा . हिरवें - न . गुरांना खाण्यास उपयोगी असें हिरवे गवत , पाला इ० हिरवळ .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  Green. Fig. Raw, unripe; imperfectly cooked. Quarrelsome.
हिरवा भाजला खाणें   To worry exceedingly and at all seasons.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP