Dictionaries | References

लागणे

   
Script: Devanagari

लागणे     

क्रि.  शिवणे , स्पर्श होणे ( विटाळाचे संदर्भात );
क्रि.  गच्च बसणे ( झाकण ), बंद होणे , मिटणे ( दरवाजा );
क्रि.  झोंबणे , बोचणे , भिडणे ( मनाला );
क्रि.  आढळणे , भेटणे , वाटेवर असणे ( स्टेशने लागतात );
क्रि.  प्राप्त होणे , मिळणे , ( नोकरी धंदा );
क्रि.  अंगवळणी पडणे , चिकटणे , जडणे ( सवय );
क्रि.  ओकारी होणे , त्रास होणे ( मोटार , बोट ).

लागणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  पैसा, वेळ, पदार्थ इत्यादी खर्चले जाणे   Ex. नुसत्या बसभाड्यालाच हजार रुपये लागले.
HYPERNYMY:
भरणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
खर्च येणे खर्च होणे
Wordnet:
asmখৰচ হোৱা
bdखरसा जा
benখরচ হওয়া
gujખર્ચાવું
hinखर्च होना
kanಖರ್ಚುಮಾಡು
kasخرٕچ گَژھُن
kokखर्च जावप
malചിലവാകുക
mniꯆꯥꯗꯤꯡ꯭ꯇꯧꯕ
nepखर्च हुनु
oriଖର୍ଚ୍ଚହେବା
panਖਰਚ ਹੋਣਾ
sanव्यय्
tamசெலவாகிபோனது
telఖర్చుచేయు
urdخرچ ہونا , لگنا , صرف ہونا
verb  मार बसणे   Ex. ती जिन्यावरून घसरली आणि तिला फार लागले
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
भौतिक अवस्थासूचक (Physical State)अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
asmআঘাত কৰা
kanಆಘಾತ ಉಂಟುಮಾಡು
kasلَگُن
malകൊള്ളുക
mniꯁꯣꯛꯄ
oriଲାଗିବା
tamதாக்கப்படு
verb  दार इत्यादीचे बंद होणे   Ex. वार्‍याने दार लागले.
HYPERNYMY:
चोंदणे
ONTOLOGY:
घटनासूचक (Event)होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
kanಹಾಕಿಕೊ
verb  जाणीव होणे   Ex. मला कडाडून भूक लागली/मला थंडी वाजत आहे.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
SYNONYM:
वाजणे होणे
Wordnet:
asmলগা
bdमोन
benঅনুভূত হওয়া
gujલાગવું
hinलगना
kanಆಗು
kasلَگُن
kokखावप
malഅനുഭവപ്പെടുക
mniꯐꯥꯎꯕ
nepलाग्नु
oriହୃଦୟଙ୍ଗମ କରିବା
telఅనిపించు
urdلگنا , لمس ہونا
verb  प्रारंभ होऊन सुरू असणे   Ex. पाडव्याला नवे वर्ष लागते.
verb  प्राप्त होणे, मिळणे   Ex. खणताना आठ फुटावर पाणी लागले.
ONTOLOGY:
घटनासूचक (Event)होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
kokमेळप
verb  नाते वा संबंध असणे   Ex. ती तुझी कोण लागते?
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
मानसिक अवस्थासूचक (Mental State)अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
gujથવું
malആയിതീരുക
mniꯊꯣꯛꯄ
nepपर्नु
oriହେବା
telఅగు
verb  कुजण्यास, सडण्यास आरंभ होणे   Ex. पेटीतला एक आंबा लागला की सगळेच लागतात
HYPERNYMY:
कुजणे
ONTOLOGY:
भौतिक अवस्थासूचक (Physical State)अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
डागाळणे
Wordnet:
asmগেলা
bdसेव
ben(পচন)লাগা
kasہۄژُن
malചീത്തയാവുക
mniꯃꯨꯟꯁꯤꯜꯂꯛꯄ
oriଦବିଯିବା
tamஅழுகிப்போ
telక్రుళ్ళిపోవు
verb  एखाद्या गोष्टीचा वाईट परिणाम होणे   Ex. भर दुपारी वणवण केल्याने त्याला ऊन लागले
SYNONYM:
बाधणे
verb  पूर्णपणे आणि योग्य रीतीने मिसळले जाणे   Ex. चिवड्यात मीठ व्यवस्थित लागले
verb  योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे   Ex. तंबोरा कसा छान लागला
SYNONYM:
जुळणे
verb  मुख्य विधी, संस्कार होणे   Ex. बारा वाजता लग्न लागले
verb  मग्न, गुंतलेला असणे   Ex. वातावरण शांत असले की अभ्यासात मन लागते
verb  पार पाडण्यासाठी सोपवणे   Ex. तुला त्यांना भेटवण्याचे काम माझ्याकडे लागले
verb  भाग पडणे   Ex. पुस्तक हरवल्यास दंड भरावा लागतो
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
malവീഴ്ച വരുക
verb  भूत इत्यादींची बाधा होणे   Ex. दादूला चिंचेवरची हडळ लागली.
HYPERNYMY:
घडणे
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
SYNONYM:
झपाटणे पछाडणे
Wordnet:
kanಹಿಡಿದುಕೂ
verb  शौच, मूत्रविसर्जन इत्यादी क्रियेची इच्छा होणे   Ex. त्याला जोरात लागली.
HYPERNYMY:
इच्छा होणे
ONTOLOGY:
अनैच्छिक क्रिया (Verbs of Non-volition)क्रिया (Verb)
Wordnet:
kanಅವಸರವಾಗು
verb  लावलेले रोपटे इत्यादी जगणे   Ex. गेल्या वर्षी लावलेल्या रोपट्यांपैकी काहीच रोपे लागली.
HYPERNYMY:
फोफावणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
रुजणे
Wordnet:
kanಹೊಂದಿಕೊಳ್ಳು
malവേര് പിടിക്കുക
telమొలుచు
verb  वाटेत येणे   Ex. रायगडाच्या वाटेवर महाड लागते.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
benপড়া
kanಮಧ್ಯ ಸಿಕ್ಕು
malകാണപ്പെടുക
mniꯊꯦꯡꯅꯕ
nepभेटिनु
sanवृत्
tamதென்படு
telపడటం
urdپڑنا , آنا
verb  अंगवळणी पडणे   Ex. त्याला विड्या ओढायचे व्यसन लागले.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
जडणे
Wordnet:
hinलत पड़ना
malശീലമാവുക
mniꯍꯩꯅꯕꯤ꯭ꯑꯣꯏꯕ
tamபழக்கம் ஏற்படு
urdپڑنا , لگنا
verb  एखाद्या ठिकाणी येऊन थांबणे   Ex. नाव किनार्‍याला लागली. / गाडी फलाटाला लागली आहे.
HYPERNYMY:
पोहोचणे
ONTOLOGY:
भौतिक अवस्थासूचक (Physical State)अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
bdनांहै
benলাগা
kanತಲುಪು
kasلَگُن
malഎത്തിചേരുക
verb  वर्ष, महिना इत्यादींचा आरंभ होणे   Ex. गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष लागते.
HYPERNYMY:
आरंभणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
सुरवात होणे सुरू होणे प्रारंभ होणे आरंभ होणे श्रीगणेशा होणे
Wordnet:
kasاَژُن
telప్రారంభమగు
urdلگنا , چڑھنا
verb  एखाद्या वस्तूचा दुसर्‍या एखाद्या वस्तूला स्पर्श होणे   Ex. चालता चालता माझा हात विजेच्या खांब्याला लागला.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
SYNONYM:
स्पर्श होणे
Wordnet:
asmলাগি যোৱা
benছোঁয়া
gujઅડી જવું
hinछूना
kanತಗಲು
kasاَتھہٕ لَگُن
kokलागप
malതൊടുക
nepछुनु
oriବାଜିବା
panਛੂਹਣਾ
sanस्पर्श्
tamதொடு
urdچھونا , لگنا , چھوانا
verb  लागलेला असणे   Ex. तो ज्या खोलीत बसून अभ्यास करत होता त्याला कुलूप लागले होते.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
असणे
Wordnet:
gujલાગવું
kanಹಾಕು
kasکٔرِتھ آسُن
urdلگنا , ڈلنا , پڑنا
verb  एखादे वाहन किंवा व्यक्तीचे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहचण्यासाठी वेळ खर्च होणे   Ex. मला घरी पोहचायला एक तास लागेल.
HYPERNYMY:
घडणे
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
kasلگُن
malതടുക്കുക
verb  शरीर इत्यादीला जखम होणे किंवा शरीर अथवा शरीराच्या एखाद्या अंग, भाग इत्यादीला अपाय होणे   Ex. रमेशला खेळताना लागले.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
जखम होणे इजा होणे दुखापत होणे घाव होणे
Wordnet:
hinचोट लगना
kanಗಾಯವಾಗು
kasزَخٕم لگُن
kokजखम जावप
See : शिवणे, चावणे, येणे, चढणे, चढणे, करपणे, गुंतणे, टोचणे, गरज असणे

लागणे     

अ.क्रि.  ( ह्या क्रियापदाचा संलग्न , संयुक्त किंवा संबद्ध होणे , जुळणे , चिकटणे , जडणे असा मूळचा एकच अर्थ आहे . परंतु अनेक नामांशी आणि शब्दांशी उपयोग केल्यामुळे यांस अनेक भिन्न अर्थाच्या छटा आल्या आहेत . त्यांपैकी सर्वसामान्य व कांही विशेष खाली दिल्या आहेत )
स्पर्श करणे ; शिवणे . तूं त्याला लागूं नको . विटाळ होईल . परि सावध व्हा लागो शुचि व्हाया हृदयलोह या परिसा । - मोभीष्म ६ . ११ .
लावणे ; आंत घालणे ; खुपसणे ( रोप , झाड इ० ); लागवड ; करणे ( जमीनीची ). वाफा , अळे , सरी लागली .
मूळ धरणे ; रुजणे ; चांगले जीव धरणे ; एक जीव होणे ( लावलेली रोपे , कलमे )
मार बसणे ; आघात होणे ( शस्त्र इ० चा ).
( ल . ) मनाला बोंचणे ; परिणामकारक होणे ; अंतःकरणाला भिडणे ( रागे भरणे , शब्दांचा मार ). - दा १० . ८ . २७ .
बंद होणे ; मिटणे ; गच्च बसणे . ( दरवाजा , खिडक्या , झांकण , पापण्या , डोळे ).
योग्य प्रकारे जुळणे ; जोडले जाणे ( शब्दशः व ल . ) ( तुकडे विभाग , कविता , शब्द ).
बरोबर होणे ; लागी बसणे ; नीट सामावणे .
प्रचारांत असणे ; रुढ असणे ( तर्‍हा , पद्धति , रीत ).
चिकटणे ; जडणे ; आंगवळणी पडणे ( दुर्गुण , खोड , रोग ).
येणे ; उत्पन्न होणे ; आसक्ति होणे ( भूक , तहान , खोकला , कंप इ० ).
निघणे व चालू होणे ; प्रारंभ होऊन सुरु असणे ( स्थल आणि काल यांतील पदार्थ आणि प्रसंग , विशिष्ट परिणाम किंवा प्रकार ). एथून मावळ संपले आणि देश लागला . या अध्यायापासून ग्रंथ कठीण लागला . तेव्हांपासून ह्याचा त्याचा कलह लागला . हे काय सोपे लागले आहे ?
बरेवाईट कळणे ; विशिष्ट प्रकाराचे किंवा जातीचे म्हणून समजणे , वाटणे . आंबे खाऊन पहा , गोड लागले तर घ्या . त्याला बरी गोष्ट जरी सांगितली तरी वाईट लागते .
प्राप्त होणे ; मिळणे ( नोकरी , चाकरी , नेमणूक ). इतकी खटपट करुन अखेर त्याला नोकरी लागली .
नाते किंवा संबंध असणे ; नात्याच्या संबंधाने असणे . तुझा तो काय मेहुणा लागतो .
आढळणे ; भेटणे ; रस्त्यांत मार्गांत येणे ; पुढे येणे . वाटेने चार नद्या लागतात , तुम्ही वाचीत जा आणि पुढे वृत्तश्लोक लागेल तेथे ठेवा .
. फळ धरणे ; बहर येणे ; वृक्ष फलोप्तादनाच्या स्थितीस येणे . ह्या प्रांताचे माड लागूं लागले म्हणजे असे लागतात की एका एका माडास हजार हजार नारळ लागतात .
करपणे ; बिघडणे ; बुडाशी जळणे . भात बुडाशी लागला .
. कामांतून जाणे ; खराब , घाण होणे ; डागळणे ; कुजण्यास , सडण्यास आरंभ होणे ; बुरशीने व्याप्त होणे . लांकूड लागले .
चिकटणे ; चिकटून राहाणे . उदंड उपाधी तरी थोडी , लागोच नेदी . - दा ९ . १० . ५ .
बसणे जडणे ; बिलगणे ( मन ). चित्त ते लागले तुझे पायी । - दावि ५६ .
चावणे ; दंश करणे ; झोंबणे ( साप , विंचू चिकट पदार्थ ).
हल्ला , आघात होणे . त्याला विंचू लागला . मला ठेंच लागली - दगड लागला .
पडणे ; धाड येणे ( मेकाड , मोवा इ०ची ); व्यापणे ; ग्रासणे ( मेकाड इ० नी झाड ).
परिणाम करणे ; अनिष्ट व उपद्रव होईल असे करणे ; ( मादक पदार्थ , वाईट हवा , पाणी उपवास , शिव्याशाप इ० नी ).
जनावर , माणूस इ० ची पाठ , पाय इ० गात्रांस ( खोगीर , जोडा , लगाम इ० च्या घर्षणाने ) इजा होणे ; घसटणे ; खरचटणे ; चोळवटणे ; सोलवटणे . जोडा लागला .
नेहेमीच्या एखाद्या आजाराने पछाडले जाणे ( जनावर ).
पूर्णपणे व योग्य रीतीने मिसळले जाणे ( साखर , तिखट , मीठ वगैरे अन्नांत एखादा पदार्थ ).
घालविण्याची जरुरी पडणे ; खर्चिला जाणे ; व्यय होणे ( पैसा , पदार्थ , वेळ ). याच्या लग्नास पांचशे रुपये लागले .
पाहिजे असणे ; गरज असणे ; सुस्थितीस पूर्णतेस जरुर असणे ; ( सामा . एखादी गोष्ट ) ( गरज , नड , उपयोगाचा प्रसंग ) उत्पन्न होणे . क्षत्रियासि लागल्या अनुपत्ती । पूर्वोक्त करावी वणिग वृत्ति । - एभा १७ . ४६२ .
योग्य स्वरांत बसणे ; स्वरानुकूल असणे ( गळा , आवाज , वाद्य , सूर ).
पेटणे ; दीप्तियुक्त होणे ( दिवा , विस्तव ); चेतणे ( आग ).
प्रत्यक्ष आरंभ होणे ; मुख्य विधि , संस्कार याला सुरवात व्हावयाची वेळ येणे ( लग्न , मुंज इ० विधीची ).
( बोलतांना ) अडखळणे ( माणूस , जीभ , शब्द ).
चालू होणे ; क्रिया सुरु होणे ; गति मिळणे , ( एंजिन , यंत्र इ० ).
चालणे ; समर्थ , कार्यक्षम असणे ( आपल्या विशिष्ट कार्यात ); उपयोगास येणे . जंग चढला आहे म्हणून चाकू लागत नाही .
तीक्ष्ण होणे ; धारेने युक्त होणे . दोन चाकू लागले आहेत , बाकीचे लागावयाचे आहेत .
निश्चित किंवा ठरलेले असणे ; न सुटण्यासारखे जोडलेले किंवा पाठीमागे लागलेले असणे . उपजत्या प्राण्यास मरण हे लागलेच आहे . संसाराचे कृत्य हे रोज लागलेच आहे .
सुरु होणे ; सतत चालू असणे ; एकसारखा असणे ; एकसारखा राहणे , धडणे ( पाउस , थंडी , उष्णता ). कालपासून पाऊस सारखा लागला आहे .
मग्न , गुंतलेला असणे .
मनांत योजिलेला किंवा स्वाभाविक परिणाम होणे ; यश येणे ; उपयोग होणे .
जुगणे ; मैथुन चालणे , करणे ( पशु , पक्षी यांमध्ये नराने मादीशी ) ( निंदार्थी माणसालाही लावतात ).
. योग्य स्थितीला येणे ; फलदायी होणे ( गाय , म्हैस इ० दूध देऊं लागणे , झाड फळाला येणे ).
संबद्ध , मालकीचा असणे ; कार्यक्षेत्रांतील , कक्षेतील , अधिकारांतील असणे .
विवक्षित स्थितीत असणे ; विवक्षित गुण , जात , धर्म असणे ; विशिष्ट परिस्थिती असणे . मी कां श्रीमंत लागलो आहे ? सर्वांस शालजोड्या द्या म्हणतो तो . हा काय मुसलमान लागला !
लावणे ; अंगी लागू करणे ( गुन्हाचे कृत्य ); करावयासाठी , पार पाडण्यासाठी एखाद्या व्यक्तीवर लादलेले असणे ; सोपविलेले असणे ( कर्तव्य , काम इ० ). हे काम मजकडे लागले .
सक्तीचे , आवश्यक , जरुर असणे ; करणे - भोगणे भाग पडणे . ह्याचे हातून न झाले तर तुम्हास जावे लागेल . अडकणे ; गुंतणे . कोठे तुझा जाउनि हेतु लागे । - सारुह २ . ९४ .
झपाटणे ; पछाडणे ; अंगात येणे ; बाधा होणे . चिंतूला चिंचेवरची हडळ लागली .
( शौच , मूत्रविसर्जन इ० ) क्रियेची इच्छा होणे . शौचास - मुतावयास लागली .
( क्रियापद ऊं , आवयास इ० प्रत्यय लागून त्यांचे पुढे लागणे हे क्रियापदातील आले असतां ) क्रिया सुरु करणे ; आरंभणे ; घडणे ; लागूं होणे . तो ए करुं किंवा करावयास लागला . ; तो मारुं लागला - देऊ घेऊ खाऊं - बोलू बसावयास करावयास लागला .
क्रियापदांतील वे ह्या प्रत्ययापुढे लागणे क्रियापद आले तर आवश्यक होणे , अनिवार्य होणे असे अर्थ होतात . त्याला जावे लागले .
बरोबर , बाजूला असणे ; मदत करणे . हा धोंडा मला उचलूं लाग ; हे काम मला करुं लाग
नांगर टाकण्याच्या स्थितीत येणे ; कडेला येणे ; स्थिरावणे ; गति खुंटणे ( जहाज , होडी ).
( ल . ) अगतिक होणे ; हालचाल बंद पडणे . [ सं . लग लग्न ; प्रा . लग्ग ; हिं . गु . लागना ] म्ह० लागे बोट वाढे पोट = नुसते निमित्त होऊन एखादे वाईट काम होऊन जाणे . एखाद्यास लागला जाणे , एखाद्याला लागला जाणे -
ऋणी होणे , असणे ; मिंधा असणे . त्वां मला दोन पैसे दिलेस म्हणून मी कां तुला लागला गेलो ? मी काय तुझे चार चवल लागतो ?
जास्त परिचयाचा , आसक्त असणे . लागून असणे -
( स्नेह , लोभ , इ० मुळे ) अगदी चिकटला असणे ; तंत्राने किंवा मर्जीप्रमाणे वागणे .
एखाद्या स्त्रीने एखाद्याशी व्यभिचारसक्त असणे .
मग्न , गुंतलेले असणे . लागून जाणे - नवरा सोडून दुसर्‍यापाशी राहणे ( एखाद्या स्त्रीने ). कानास - कानी - लागणे - गुप्त गोष्टी बोलणे ; कुजबुजणे किती लागली परस्पर कानी । मधुर भाषणी । - रत्न १० . पाणी लागणे -
एखाद्या ठिकाणच्या हवेचा , चालीरीतींचा मनावर , वागणुकीवर परिणाम होणे . विदेशी लागले पाणी । - दा ३ . ६ . २५ .
एखाद्या ठिकाणची हवा बाधणे .
( पुसणे ) एखाद्याकडे येणे असलेली रक्कम बुडणे ; नाहीसे होणे . पायी लागणे - नम्र होणे ; नमस्कार , वंदन करणे . समर्थपायी राजराजेंद्र लागती । - सप्र . ३ . ६६ . लागत - न . ( गु . ) भाडे ; खर्च . अगाऊ लागत भरुन पावती मिळविली पाहिजे . -( बडोदे ) खानगी खाते , लागतीचे नियम ४ . लागत खेवो - क्रिवि . लागताच . लागतगुण - पु . संगतीचा परिणाम - गुण ; संबंध जडल्याने येणारा गुण . कोणाचा कोणास लागतगुण असतोच . लागता गुण - पु . ( बायकी ) माणूस , संपत्ति , उत्कर्ष , वस्तु जोडण्याचा गुण ; संपादन करण्याचा , मिळविण्याचा गुण . लागता जुगता - वि . मार्गावर आणलेला ; योग्य क्रमांत , रांगेत लावलेला ; पायावर उभा केलेला . [ लागणे + जुगणे ] लागता वगळता - वि . ( गु . ) संबंधी ; संबद्ध . जबाबदार इसमाने आपले ताब्यांतील व लागते वगळते नोकर लोकांस वरचेवर माहिती देत जावी . -( बडोदे ) आगी पासून बचाव ४ . लागते - न . संबंध . बुझवितां मते ।न फिटे आक्षेपाचे लागते । - ज्ञा १३ . ३२७ . लागन - क्रि . ( खा . ) मनाला वाटणे . लागरा - वि .
मादक ; अंमली ; खाल्ली असतां लागणारी ( सुपारी , औषध , इ० ).
खराब झालेला ; किडीने खाल्लेला ; किडका ( धान्य , फळ , लांकूड इ० ). लागीर - स्त्री . न .
पिशाच ; भूत .
पिशाच - भूत - संमंध - बाधा ; पछाडणी . ( क्रि० लागणे ; काढणे ; निघणे ). - वि .
किडके ; सडके .
किडण्यासारखे किडण्याजोगे ( लांकूड , धान्य ).
नास - नुकसान - दुखापत पोंचेल असा .
लागलेला .
बाधा झालेला ; पछाडलेला .
चिकटलेला ; चिकट .
मादक ; माजगा ; अंमली .
वाईट परिणाम करणारा ; अहितकारी .
दुसर्‍याचे प्रेम , लोभ , दया , जडवून - लावून घेणारा ; लाडिक . लागीर होणे - बाधा होणे ; लागणे ( भूत , पिशाच्च ).

Related Words

अंदाजाच्या वर लागणे   अंदाजापेक्षा अधिक लागणे   ठोकर लागणे   तंदुरा लागणे   मार्गाला लागणे   लूक लागणे   लूख लागणे   कुमार्गाला लागणे   देशोधडीस लागणे   कारणी लागणे   अंदाजापेक्षा जास्त लागणे   कच्छपी लागणे   लागणे   ಹಿಡಿದುಕೂ   अंगास मिरच्या लागणे   अंगीं कुयले लागणे   ग्रहण लागणे   घरघर लागणे   हात लागणे   खावा लागणे   आग लागणे   चुना लागणे   टिकाव लागणे   ठेच लागणे   ढास लागणे   उचकी लागणे   ओळ लागणे   भलत्या वाटेस लागणे   फुट लागणे   भूक लागणे   मागे लागणे   मार्गी लागणे   म्हातारचळ लागणे   मनाला लागणे   निभाव लागणे   पाठीस लागणे   पायबंद लागणे   लू लागणे   रांग लागणे   रीघ लागणे   वेड लागणे   रास्ते लगना   പിടികൂടുക   हात लागप   അനുഗമിക്കുന   ഉത്കണ്ഠാഭരിതമാകുക   चोट लगना   जखम जावप   लत पड़ना   زَخٕم لگُن   பழக்கம் ஏற்படு   ಗಾಯವಾಗು   hiccup   اَتھٕ لاگُن   ചീത്തയാവുക   క్రుళ్ళిపోవు   (পচন)লাগা   ಕೈ ಹಾಕು   ശീലമാവുക   খেতে হওয়া   हाथ लगना   मानजा मोननां   کھاناپڑنا   کھینچنا   کھیٚون   தாங்கிக்கொள்   തുടങ്ങുക   ਖਾਣਾ ਪੈਣਾ   വലിക്കുക   addict   খারাপ লাগা   गोरान गुजु   اَتھہٕ لَگُن   गाज्रि नां   खलना   ढाँसना   ढांसप   उजो लागप   अर नां   ڈھانسنا   بُرٕ لَگُن   நெருப்புப்பற்றிக்கொள்   കടുപ്പമുള്ളതായി തോന്നുക   കൊക്കി കൊക്കി ചുമയ്ക്കുക   തീ‍യിടുക   வெறுப்பாயிரு   ప్రారంభమగు   కాలిబూడిదవడం   నచ్చకపోవు   লাগি যোৱা   শুকনো কাশি কাশা   ਖਲਣਾ   અડી જવું   ઢાંસવું   ಅಪ್ರಿಯವಾಗು   ಒಣಕೆಮ್ಮು   go bad   ঠোক্কর লাগা   খরচ হওয়া   খৰচ হোৱা   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP