Dictionaries | References

लांब

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Long. 2 Distant or remote. In space or in time.
lāmba ad At or to a distance; afar off. 2 Sometimes used for लंबा. लांबचलांब or लांबचेलांब Very long; or very distant. 2 At a great distance.

वि.  
दीर्घ ; आखूड नव्हे असा .
( स्थल किंवा काल या बाबतीत ) दूर ; अंतरावरील . अजून दिवाळी लांब आहे .
विस्तारयुक्त ; पाल्हाळिक . म्हणाल बोलणे कं केले लांब । - दावि ३०० . - क्रिवि . दूर ; अंतरावर . कधी कधी लंबा या अर्थी उपयोग . लंबा पहा . [ सं . लब ]
०लांब   सांगणे -
गोष्टी   सांगणे -
पूर्वीची विपदवस्था विसरुन उद्दामपणाच्या , शेखीच्या गोष्टी सांगणे .
गप्पा , बाता मारणे .
०बसणे   ( बायकी ) विटाळशी असणे . सामाशब्द -
०कान्या वि.  गाढव . माणसांचे कान लहान असतां ते लांबकान्यांप्रमाणे कां वागतात ? - नपुक ९ .
०लांब   लांबचे लांब - वि .
फार लांब ; दूर असलेले .
क्रिवि . दूरच दूर . लांबट - वि . ( विवक्षिताहून ) किंचित अधिक जो लांब तो . माझ्या धोतरापेक्षां हे धोतर लांबट आहे .
लांब घाटाचा , आकाराचा .
०टांग्या वि.  लांब तंगड्यांचा , पायांचा ; ढांगळ्या ; लंबाड्या .
०रुंद वि.  प्रशस्त लांबी , रुंदी असलेला .
प्रशस्त उंचनिंच ; ( सप्रमाण , पाहिजे तितका ) लांब ; अवाढव्य .
( ल . ) दीर्घसूत्री ; कंटाळवाणे ( भाषण , गोष्ट . )
०लेखा  पु. भारी लांबण , विस्तार ; उगीच पाल्हाळ , वाद , चर्चा इ० ( निंदार्थी उपयोग ). या गोष्टीला होण्यास कांही लांबलेखा नको , आतां करुन येतो .
०सर वि.  लांबट ; अधिक लांब .
०हस्त वि.  ( हिं . ) विस्तीर्ण . लांबडा पु . साप . घरांत रात्री लांबडा निघाला होता . - वि . लांबोडा ; लांबट .
०करणे   क्रि . पुष्कळ चोपणे ; ठोकणे ; लंबा करणे . शिवाजीने अफजुलखानाला लांबडा केला . लांबण --- स्त्री .
बरेच मोठे अंतर ; दूरपणा . किल्ला दिसतो खरा पण ही काय लांबण थोडी आहे .
सावकाशी ; दिरंगाई ; दूर टाकण्याचा प्रकार . ह्याच महिन्यात लग्न करुन घ्या . उगीच लांबण लावू नका .
( तुलनेने पहातां ) जास्त लांबी , अंतर . पायवाटेपेक्षां गाडीवाटेकडून लांबण आहे .
विस्तार ; पाल्हाळ ( भाषणादि व्यवहाराचा ). काय ते हंशील सांगा , उगीच लांबण लावूं नका , उशीर होतो . [ सं . लंबन ] लांबणीवर घालणे - टाकणे - लोटणे - दूर मुदतीवर ढकलणे ; उशीरां करण्यासाठी ठेवणे . लांबणीवर पडणे - दूर मुदतीवर जाणे ; पुढे ढकलले जाणे . लांबणे - अक्रि .
लांब होणे ; वाढणे ( स्थल किंवा काल या बाबतीत ).
( लांबी , विस्तार व अवधि या बाबतीत ) वाढणे ( वस्तु , व्यवहार , गोष्ट इ० ). काम एकदोन दिवसांत झाले असते पण सुभेदार गेले , आतां चार महिने लांबले . प्रमाणाबाहेर वाढणे . प्रथमतः दहा हजारांत घर बांधावे असा बेत धरुन आरंभ केला मग जे लांबले ते पंचवीस हजारांवर गेले .
भर घातल्याने प्रमाण वाढणे ; अधिक होणे ( ताक , दूध इ० मध्ये पाणी वगैरे घातल्याने ); विस्तार होणे .
( बातमी , गुप्तगोष्ट , मसलत इ० ) अनेकांस विदित होणे ; जाहीर होणे .
( भाषण , ग्रंथ इ० ) कंटाळा येण्याइतके अधिक मोठे , पाल्हाळीक होणे . [ सं . लंबन ] लांबता - वि . क्रि . वि .
लौकर न करतां हळू हळू केलेला , करुन लांबविलेला ( क्रि० धरणे ) दोन गृहस्थ येणार आहेत , कथा जराशी लांबती धरा .
लांबलेला ; बराच दूर गेलेला ; ( आकाशांत बराच वर आलेला ). लांबतिए सुरिए । केवि लाजिजे नु ! - शिशु ४७० . लांबरा - वि . लांबट . मोठाले कुच इंदुवक्र नयने कर्णावधी लांबरे । - कमं २ . लांबविणे - क्रि .
लांब करणे ( स्थळ , काळ या बाबतीत );
( सामा .) लांबीरुंदी वाढविणे .
पुढे टाकणे ; खेंचणे ; ओढणे .
( मालकाकडून ) काढून नेणे ; पळविणे ; लुबाडणे . [ लांबणे प्रयोजक ] लांबवालांबव - स्त्री .
घाईने ; कसे तरी दूर नेणे , धाडणे ( चोरादीच्या भीतीने द्रव्य , वस्तु इ० ).
लुबाडणी ; पळवापळव . लांबसून - क्रिवि . ( कों . ) लांबन . - लोक २ . ४७ . लांबी - स्त्री .
लंबाई ; दीर्घता .
लांब बाजू .
अंतर ; अवधि ; मधली जागा किंवा वेळ ; दूरता .
एका टोंकापासून दुसर्‍या टोंकापर्यंतचा विस्तार ; त्याचे माप .
( गो . ) उशीर ; दीर्घकाल . रुपये पाठविण्यास लांबी जाहल्याबद्दल राग धरुं नये . लांबीवर पडणे - लांबणीवर पडणे ; विलंब असणे . लांबून - क्रिवि . दुरुन ; अंतरावरुन . लांबोडा , लांबुळा , लांबुडा - वि . वाटोळा , चतुष्कोण इ० जे आकार त्यामध्ये लांबी म्हणून जे प्रमाण तत्प्रधान जो आकार तो ; लांबट ; दीर्घ वर्तुळाकार ; अंडाकृति . तोफेच्या गोळ्यासारखा वाटोळा गोळा करुं नको ; वरंवट्यासारखा लांबोडा गोळा कर .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  Long. Distant.
ad   At a distance.
लांबचेलांब   Very long; lengthy.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP