Dictionaries | References

रग

ना.  गुर्मी , जोर , ताठा , मगरुरी , मस्ती , मिजास , मुजोरी ;
ना.  कळ , दुःख , वेदना .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
. And सावकाराची रग or देणेदाराची रग The dunning, i. e. the pinching and producing of ache, of one's banker or creditor. In this sense कामाची रग The press of business. v लाव & लाग. See the order or class. of this word under धमक.

 स्त्री. 
इंगा ; नांगा .
ईर्षा ; मिजास ; मस्ती ; जोर ; गुर्मी ; ताठा ; मग्रुरी . मराठ्यांची रग जिरविल्याशिवाय तें गप्प बसावयाचे नाहींत . ( क्रि० धरणें ; बाळगणें ; येणें ; मोडणें ; जिरविणें )
उत्साह ; जोर ; सहनशक्ति .
तीव्रता ; कडकपणा ; प्रभाव ; वेग ; सोसाटा , गळवाचें रक्त काढतांच त्याची रग मोडली . उन्हाची - पावसाळ्याची - वार्‍याची रग .
कळ ; वेदना ; दुःख ; अवघडणें . ( क्रि० लागणें ; येणें ) टवकारुनी दृष्टि लावूनिया रग । दावी झगमग डोळ्यापुढें । - तुगा ४०७ .
धमनी ; नस ; स्नायु ; शीर ; नाडी . मिठी मारा सळसळती सार्‍या रगा । - प्रला १३१ .
वेदना ; पोट , हातपाय , डोकें , डोळे इ० अवयवांमध्यें सारख्या होणार्‍या कळा . [ फा . रग = धमनी ] ( वाप्र . )
०जिरविणें   मोडणें - खोडकी जिरविणें ; खोड मोडणें ; शासन करुन एखाद्याचा ताठा नाहींसा करणें .
०जिरणें   उतरणें - मस्ती शमणें ; नरम येणें . मदनरगा या त्वरितगती जिरुं देरे । - प्रला १८७ . मणगटाला रग लावणें रग लावणें - मनगट घट्ट पकडणें ; अवळून धरणें ; पिळणें ; वेदना होतील अशा रीतीनें दाबणें . कामाची रग - कामाची आच , त्रास , घाई ; जाचणूक . ( क्रि० लावणें ; लागणें ) सावकाराची रग देणेदाराची रग - स्त्री . सावकारानीं किंवा देणेदारांनीं मागें लाविलेली टोचणी , तगादा , त्रास , दुःख ; छळणूक . सामाशब्द - रगदार - वि .
जोरदार ; पाणीदार ; मस्त ; रगेल , उन्मत्त ; मिजासखोर ; ऐटबाज .
जिवंत ; उत्साही ; ईर्षेबाज तगडा ( मनुष्य , पशु इ० ). रग पहा . रगदारी - स्त्री . उत्साह ; ईर्षा ; कस ; जिवंतपणा ; चैतन्य . रगमोड - स्त्री . गर्वहरण ; मानहानि ; नाक खालीं होणें ; मस्ती घालविणें ; जाणें . रगेल - वि . अंगांत पुष्कळ रग असलेला . ( मनुष्य ; घोडा ); ताठलेला ; गर्विष्ठ ; मस्त ; गुर्मीखोर अहंमन्य ; मिजासखोर ; बेगुमान ; दिमाखी .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  A sinew. Fig. Haughty stiffness. Spirit. An ache. Dunning.
रग मोडणेंजिरविणें   Lower the crest of, take the conceit out of.

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP