TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

माय

 स्त्री. १ आई . तुम्हींहि बळि बांधिला म्हणूनि आमुची माय जी . - केका ८८ . २ ( कों . ) सासू . [ सं . मातृका ; लॅ . मॅटर ; इं . मदर ; प्रा . माउआ ; सिं . पं . हिं . माऊ ( उ ); ते . मम्मा ; उर्दू अम्मा , मा ; का . अव्वा ] म्ह० १ माय मरो पण मावशी उरो . २ ( व . ) माय तशी बेटी गहूं तशी रोटी . ( वाप्र . )
०मावशी   , मावशी पहात - विषयवासना तृप्त करण्यासाठी अगम्यगमन सुद्धा वर्ज्य न करणार्‍या मनुष्यासंबंधीं म्हणतात . माय विणें -
नाहीं   , मावशी पहात - विषयवासना तृप्त करण्यासाठी अगम्यगमन सुद्धा वर्ज्य न करणार्‍या मनुष्यासंबंधीं म्हणतात . माय विणें -
आई प्रसूत होणें ; मातेनें विशिष्ट गुणांनीं युक्त अशा पुत्रास जन्म देणें . २ ( ल . ) ( एखादें काम करण्याविषयीं ) छाती , धाडस , हिंमत होणें . मला शिवी देण्याला कोणाची माय व्याली आहे तें पाहतों . सामाशब्द -
०आंग  न. १ शरीराचा अतिशय कोमल , नाजूक भाग . २ गुदभ्रंशांतील बाहेर आलेलें आतडें ; गुदभ्रंश . ३ बाहेर आलेला गर्भाशय आणि गर्भाशयभ्रंश . ४ योनि ; स्त्रियांच्या किंवा मादीच्या जननेंद्रियाच्या आंतील जननविषयक अंग , इंद्रिय . तिला बाळंत होतांना फार त्रास झाला व मायआंग बाहेर आलें . [ माय + अंग ]
०आजा  पु. आईचा बाप ; मातामह .
०आजी  स्त्री. आईची आई ; मातामही . गोसावीण स्त्री . राजरा किंवा राजेश्वरी देवीच्या कुलधर्मांत सवाष्ण म्हणून सांगितलेली विधवा . या कुलधर्मांत एक घरचें मुहूण , एक बाहेरचें मेहूण , एक ब्राह्मण , एक सुवासिनी , एक ब्रह्मचारी आणि एक विधवा अशीं साडेसात माणसें ( ब्रह्मचारी अर्धा माणूस ) भोजनास बोलावतात . विधवेला मायगोसावीण म्हणतात व देवी मानून तिचें पूजन करितात . हा कुलाचार पुष्कळ ब्राह्मण कुटुंबांत आहे . मायचा पूत , मायेचा पूत पु १ खर्‍या आईचा पुत्र ; पराक्रमी , प्रतापवान , महत्कृत्य करणारा मनुष्य . असे परिणाम उत्पन्न करणारा कायदा कोणत्या मायेचा पूत निर्माण करण्यास तयार आहे ... - टि ४ . ९२ . २ निंदा , उपहास इ० कर्तव्य असतांहि याचा उपयोग करितात . [ माय = आई + पूत = पुत्र ] मायचि मी , मायचि मी चूत उद्गा . ( कों . ) ( अश्लील ) अपशब्द ; एक शिवी . तुझ्या मायचि मी चूत साल्या .
०झवों   उद्गा . ( हेट . ) एक शिवी ; आईशीं वाईट कर्म करणारा या अर्थी .
०थळ  न. आईचें म्हणजे जन्माचें स्थळ ; जन्मभूमि . असंतुष्ट पक्षानें आपल्या गांवांत किंवा भोंवरगांवीं झालेल्या निकालावर पूर्वग्रहदूषित नसलेल्या निःक्षपातीं अशा परस्थळीं फिरुन चौकशी व्हावी अशी विनंति करतांना योजलेला शब्द . उदा० हें मी मायथळ मानितों . दुसरें थळ मला द्या .
०देश  पु. जन्मभूमि .
०पोट  न. अतिशय शांततेची व सुरक्षिततेची जागा ; आसरा ; थारा ; लपण्याची जागा ; शरणस्थान . - वि . १ आश्रय देणारा ; रक्षक ; पालक ( देव , राजा , धनी , लोक , राज्य , देश , गांव ठिकाणा इ० ). जें अचिंतां अनाथांचें मायपोट । - ज्ञा ८ . १९५ . २ गरीब ; निरुपद्रवी ( गाय , घोडा , हत्ती इ० ).
०बहीण  स्त्री. आदरानें कोणत्याहि स्त्रीविषयीं योजावयाचा शब्द ; आईसारखी किंवा बहिणीसारखी मानिलेली स्त्री . मायबहिणी विठाबाई । लागला छंद तुझे पायीं । [ माय + बहीण ]
०बहिण   - ( व . ) आईबहिणीवरुन शिव्या देणें .
घेणें   - ( व . ) आईबहिणीवरुन शिव्या देणें .
०बाप   पुअव . आई व बाप ; आईबापें . म्ह० ( व . ) माय बाप हेल्या लेकरं पाहिले . कोल्ह्या = आईबाप सशक्त व मुलें किडकिडीत .
०भाषा   बोली - स्त्री . स्वतःची भाषा . मावली माउली - स्त्री . १ आईस लडिवाळपणें संबोधण्याचा शब्द . २ ( सामा . ) आई किंवा आदरणीय , आवडतें वडील स्त्रीमाणूस .
०मावशी  स्त्री. १ मातेसमान किंवा प्रौढ स्त्री . २ मातृस्थानीय किंवा अनुल्लंघ्यवचन असलेली नातेवाईक स्त्री . ( क्रि० ओळखणें ; जाणणें ; मानणें ; पाहणें इ० ) गोमांस व शिवस्व . हे शब्द पहा . [ माय + मावशी ]
०माहेर  न. १ आईचें घर ; माहेर . २ आश्रय ; थारा . ३ आश्रयदान ; ( क्रि० करणें ).
०मूर्ति वि.  दिसण्यांत संभावित परंतु महा लुच्चा मनुष्य .
०मायेराणी   राणी - स्त्री . १ स्त्रिया व खालच्या जातींतील लोक यांनीं पूज्य मानलेली पिशाच देवता ; एक क्षुद्र देवता . जाखमाता मायराणी । बाळाबगुळा मानविणी । - दा ४ . ५ . १६ . २ जलदेवता . जळीच्या मेसको मायेराणी । - दा ३ . २ . २७ . ३ ( व . ) एक देवी . हिची पूजा दिवाळीत होते . आमच्या घरीं मायराणीचा कुलाचार आहे . ४ ( निंदेनें ) करंजी नावाचें पक्वान्न . म्ह० अडक्याची मायराणी सापिक्याचा शेंदूर . मायराणीचे दिवे - पुअव . आंत तेल घालून व वात लावून मायराणीस समर्पण केलेले कणकेचे लहान लहान दिवे . बायकांचा हा आषाढांतील एक कुलाचार आहे , या दिव्यासारखे कणकेचे दिवे करुन बायका खातात म्हणून - मायराणीचे दिवे खाल्ले फिरफिरुन घरास येते - असें एखाद्या धीट , लचाळ व त्रासदायक स्त्रीसंबंधीं रागानें म्हणतात .
०वणी  स्त्री. १ कुलीन स्त्री . २ गर्भार स्त्री . मायवणीं धाल्या धाय । गर्भ आंवतणें न पाहे । - तुगा २३४८ . [ प्रा . ]
०वत  न. महारांस आई किंवा पालक यांच्या ठिकाणीं असलेल्या गांवच्या सर्व दुसर्‍या जाती ; या जातीपैकीं एक व्यक्ति .
०वाण  न. ( व . ) नवर्‍या मुलाच्या आईला द्यावयाच वाण . मायवाणासाठीं लुगडें द्यायला हवें .
 f  A mother.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

थिबडी

  • स्त्री. ( उष्णता कमी करण्याकरिता ) डोक्याला तेल चोळणे , थापटणे इ० क्रिया . ( क्रि० घालणे ) [ ध्व . ] 
RANDOM WORD

Did you know?

मृत व्यक्तीच्या तेराव्याचा विधी काय असतो? त्या दिवसाचे महत्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site