Dictionaries | References

बाहुला

Cow-rope &c.
 पु. 
कापड , लांकूड , माती यांचा बनविलेला पुतळा ; पुरुषाची प्रतिकृति ( विशेषत : मुलींच्या खेळण्यांत ); भावला .
बुजगावणें . कां तृणाचा बाहुला । जो आगरामेरें ठेविला । तो साचचि राखिता कोल्हा । मानिजे ना । - ज्ञा १८ . ४३८ . बाहुली - स्त्री .
पुतळी ; खेळण्याची भावली .
डोळ्यांतील पुतळी ; डोळ्यांत दिसणारें प्रतिबिंब ; त्या प्रतिबिंबाची जागा .
मोटेचा चाकदांडा ज्यांवर बसविलेला असतो ते दोन खांब ; बुटली .
( व . ) तसबीर . [ दे . बहुल्ली , बाहुल्ली ]
०देणें   दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त करणें ; दुष्कृत्यास प्रोत्साहन देणें . बाहुलें न . बाहुली अर्थ १ व ३ . पहा . बाहुलेंभोरपी पु . कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणार मनुष्य . बाहुलेभोरीप न . कळसूत्री बाहुल्यांचा खेळ .
n m  A doll, puppet. A figure, image, statue.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.