Dictionaries | References

तारतम्य

ना.  निवड करण्याची क्षमता , व्यवहार कौशल्य , सारासार , विचार .
consideration of as distinct from ordinary or common.
 न. १ ( दोन वस्तू , व्यक्ति इ० कांतील ) श्रेष्ठकनिष्ठ भाव ; न्यूनाधिक्य ; बरेवाईटपणा ; उच्चनिचपणा . २ ( दोन वस्तु व्यक्ति इ० कांतील गुण , उत्कृष्टता , दर्जा इ० संबंधी ) अंतर ; तफावत ; विषमता ; असमानता ; भेद . पोपट बोलतो आणि मनुष्य बोलतो परंतु त्यांत तारतम्य आहे . ३ गुणभेद जाणून उपचारादिकांत बुद्धीचे कौशल्य ; विवेक ; विवेचक शक्ति ; सारासार विचार ; धोरण . ( क्रि० पाहणे ; राखणे ; ठेवणे ). कोणास किती मात्रा द्यावी हे तारतम्य या वैद्याच्या अंगी आहे . ४ ( एखाद्यास ) सामान्य मनुष्यापेक्षा अधिक समजून , असाधारण दर्जा ओळखून केलेला आदरसत्कार , शिष्टाचार , आगतस्वागत . [ सं . तर आणि तम प्रत्ययांपासून झालेले भाववाचक नाम ]
०भाव  पु. ( प्र . ) तारतम्य ; तारतम्य अर्थ १ व २ पहा .
  State of more or less; difference; discrimination, judgment. Courtesies.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP