Dictionaries | References

तारणे

क्रि.  उद्धारणे , निभावून नेणे , पार पाडणे , बचाव करणे , सुटका करणे , सोडवणे ( संकटातून ).
स.क्रि.  रक्षण करणे ; संभाळणे ; ( संकट , भय , सुटका , बचाव करणे ; पार पाडणे . [ सं . तारण = रक्षण ] तारता , तारिता - वि . १ तारणारा ; रक्षण करणारा . तारता मारता तूच आहेस . २ मुक्ति , मोक्ष देणारा . तैसा दृष्टादृष्टाचा सखा । धर्मु जाला तो फोकारिजे देखा । तरि तारिता तोचि दोखा - । लागी होय । - ज्ञा १६ . २२२ . नसे इतर तारिता मज भवत्पदाब्जाविणे । - केका ११ . म्ह ० मारत्यापेक्षा तारता अधिक = मारणार्‍यापेक्षा रक्षण करणारा केव्हाही अधिक योग्यतेचा होय . तारित - वि . १ ( नदी , इ० कांतून ) तारुन नेलेला ; पार , पलीकडे नेलेला . २ ( ल . ) रक्षण केलेला ; ( संकट , अडचण , भय इ० कांतून ) वांचविलेला ; मुक्त केलेला ; बचावून नेलेला . [ सं . ]
 न. विळ्याच्या मुठीला शेंबी , वसवी करण्याला उपयोगी असा लोखंडी जाड खिळा . - बदलापूर १०० .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP