Dictionaries | References

चमकणें

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
. 4 To start.

अ.क्रि.  आश्चर्यचकित होणें . प्रबोध पारवे घुमघुमिती । तेणें वागेश्वरी चमके चित्तीं । - एरुस्व ३ . ७ . [ सं . चमत्कृ ; प्रा . चमक्क ]
अ.क्रि.  १ लखलखणें ; चकाकणें ; तकतकणें . २ चमकून चालणें ; डौलानें चालणें ; नखर्‍यानें चालणें ; ठुमकत चालणें . ( स्त्रियासंबधीं ) त्या मागें जनक कुमारी । हंसगति चमकतसे । ३ ( कों . ) चालणें . पारिखा पाई कृष्ण ठाके । हें बोलणें समूळ लटिकें । ऐसें जाणोनि निष्टकें । चरणीं चमके वैदर्भी । - एरुस्व ६ . ६६ . व्याधि हरूनि चमकिला । खडाखडां पावलीं । - ख्रिपु २ . ३६ . ६७ . ४ शिणका लागल्यामुळें व्यथित होणें . ५ दचकणें ; बुजणें ; भिणें . वाघ जवळ येण्यास चमकणार नाहीं . ६ चमक भरल्यासारखें करणें . देवे म्हणोनि चमके , करि फार घाई । - आपू २३ . ७ पुन्हां प्रकट होणें ; वारंवार येणें . [ सं . चमत्कृ ; किंवा कम = प्रकाशणें ; चमक ; हिं . चमकना ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
v i   To glitter, gleam, flash. To start.

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP