TransLiteral Foundation

आखाड

The name of the fourth month, reckoning from चैत्र, June-July.
 पु. आषाढ ; अखाड पहा . म्ह० आखाडांत तट्टू , भादव्यांत भट्टू .
०झड  स्त्री. 
आषाढ महिन्यांतील एकसारखा लागून राहणारा पाऊस .
कंटाळवाणें , नीरस - भाषण .
०दवणा  पु. दवणा किडा ( हा आषाढ महिन्यांतच आढळतो ).
०पाटी  स्त्री. लग्न झाल्यानंतर येणार्‍या पहिल्या आषाढ महिन्यांतील वद्य पक्षांत वधुपक्षाकडून वराकडे फळफळावळ , मेवामिठाई व विटीदांडू , लगोरी चेंडू , भोवरा , सोंगट्या , बुध्दिबळें , कलमदान , गंजिफा वगैरे खेळण्याचें सामान व पोशाख वगैरे पाठवितात ती .
०पागोळी  स्त्री. आषाढ महिन्यांत घराच्या वळचणींतून पडणारें पाणी . हें पाणी नवीन लग्न झालेल्या मुलीनें आपल्या सासरीं पाहूं नये ( म्हणून तिला माहेरीं धाडतात ). हें पाहिलें असतां सासूस वाईट .
०पाळी  स्त्री. आषाढ महिन्यांत शेतास द्यावयाची कुळवाची पाळी .
०भूती  पु. सोदा , लुच्चा , लबाड मनुष्य ; प्राचीन काळीं या नांवाचा कोणी लुच्चा माणूस असावा . आखाडभूती ऐसा जाण । गुरुपाशील न्यावया धन । उपदेश घेऊनि दीन । तो दांभिक जाण शठशिष्य - एभा २३ . २३६ . - स्त्री . कपटव्यवहार ; लुच्चेगिरी ; लबाडी ; भोंदूपणा ; ढोंग ; दंभ .
०लाणी   लाहणी - स्त्री . आषाढ महिन्यांतील मेंढ्यांच्या केसांची कापणी , कातरणी , भादरणी . मेंढ्यांची आखाडलाणी झाली . [ सं . लु = कापणें ; सं . लवनं = कापणें ]
०सासरा  पु. 
कोणी पुरुष दबावणीची किंवा उपदेशाची गोष्ट सांगूं लागला असतां त्यास बायका निंदेनें म्हणतात .
( ल . ) दुसर्‍यावर करडा अम्मल चालविणारा मनुष्य ; नसता मोठेपणा आपणाकडे घेऊन दुसर्‍यावर करडा अंमल चालविणारा मनुष्य ( लग्न झाल्यानंतर प्रथम येणार्‍या आषाढांत नव्या सुनेस सासर्‍याचें तोंड पहावयाचें नसतें व यासाठीं तिला दुसर्‍याच्या घरीं ठेवतात - तो परका मनुष्य तिच्यावर सासर्‍यासारखा अधिकार गाजवूं लागला म्हणजे त्यास आखाडसासरा म्हणतात यावरुन ). मोठा मेला आखाडसासरा उपदेश करायला आला आहे !

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

टिकोरणें or टिकोरें

 • ṭikōraṇē or ṇṭikōrēṃ n टिकोरा m A stick. 2 Membrum virile. 3 टिकोरा is used descriptively of any thing extravagantly long or monstrously large; as टि0 शेत-पाऊस-पीक-डोंगर-वाडा. 4 A blow, esp. with a bat or stick, a stroke. v मार. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

दीप किंवा दिवा लावण्याचे कांही शास्त्र आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,108
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 326,018
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.