TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

वामन पंडित - गजेंद्र मोक्ष

कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.

गजेंद्र मोक्ष
गजा दे जो मुक्ती त्वरित विभु नक्रासि दमुनी
मुनी ज्याला शास्त्रीं हरि म्हणति त्यालाचि नमुनी
कथा ते संक्षेपें कथिन बरि पक्षींद्र गमना
मनामध्यें ध्यान द्विरदवरदा दुःख शमना ॥१॥
जळीं दांतें नक्र द्विरदपदमांसास्थि उकरी
करी प्राणत्यागी सुमति सुचली तों झडकरी
करी धांवा कीं वो सुलभ वर जो देवनिकरीं
करीं घे अर्पाया कमळ पदपद्यें सुखकरी ॥२॥
नसे ठावा ब्रह्मा न शिव अथवा श्रीपति हरी
हरी जो तापातें उचलुनि कृपासिं धुलहरी
हरी वाटे काळा करिस विपती मृत्युभुजगा
जगाचा तूं ऐसा धनि कवण तो पाव मज गा ॥३॥
वदे दुःखी तेव्हां म्हणउनि कळे दिवनिकरा
करावा तो मुक्त स्वशरण गमे श्रीप्रियकरा
करीं चक्रें शस्त्र प्रभु उचलि यानीं खगमनीं
मनीं साक्षी तो ये गज जळज घे तो स्वनमनीं ॥४॥
असा मी तो आत्मा त्रिदशनिकरां वंद्य सकळां
कळाया ही ये त्यासह करि तया मुक्त विकळा
कळा प्रेतप्राय स्मरण करि त्यातें न अवधी
वधी नक्रातें त्या अवसरिं कृपाब्धी निरवधी ॥५॥
मृताच्या त्या तोंडामधुनि पद तो हा झडकरी
करी तें वोढे ना प्रभुच करुणा मागुति करी
करीं दोंपायातें सह उचलि यानीं सुखकरी
करींद्रा सारुप्य त्वरितगति दे मुक्ति निकरीं ॥६॥
भुजा चारी पीतांबरधर असी मूर्ति बरवी
रवी जाणों हातीं रथचरण तें दीप्ति मिरवी
गजा एके हातीं जळजयुग दोहीं शुभकरीं
करींद्रा सारुप्य त्वरितगति दे मुक्ति निकरी ॥७॥
स्तवी ब्रह्मा शंभू त्रिदशपति तो मुक्तिहि नवा
नवा भक्तीची हे गति दिधलि ज्याला अभिनवा
न वाटे त्यां सर्वा हरिविण धनी आणिक जगा
जगाया हे भक्ती प्रभुच म्हणती ईश मज गा ॥८॥
पदें तेव्हां सर्वद्विरदवरदा श्रीपति असा
असारीं संसारीं गजगति असी गातचि असा
पहाटे हें गाय प्रतिदिनिंहि माझें चरित रे
तरे दुःखाब्धी तो नपरमपदींहूनि उतरे ॥९॥
गजाची जे मुक्ती क्रमुनि इतरां शक्ति नजनीं
जनीं गाती त्याला फळ परम या विष्णुभजनीं
जनीं ध्वंसस्वामी करि भजक हो गातचि असा
असारीं संसारीं म्हणुनि विनवी वामन असा ॥१०॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-07-04T06:51:13.4700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सतरा

  • वि. दहा अधिक सात ही संख्या . १७ [ सं . सप्तदश ; प्रा . सत्तरह ; हिं . सत्रह ; पं . सतारा ; सिं . सत्रहं ; गु . सत्तर ; उरिसतर ; बं सतेर ] सतरा पंधरा गोष्टी सांगणें - बिसंगत , असंबध्द , बोलणें ; बडबडणें ; भाकड कथा सांगणें . सतरा गुणांचा खंडोबा - अनेक रोग किंवा दुर्गुण असलेला . सतरा जणांच्या डोक्यांस पाणी लावून ठेवणें - ( न्हावी हजामत करण्यापूर्वी पाणी लावतो यावरून ). अनेकांची खुशामत करणें . सतरा फणगाटे फोडणारा - अनेक आक्षेप घेणारा ; बयादखोर . सतरावी - स्त्री . चंद्रबिंब ; ज्या मूळ चंद्रबिंबावर त्याच्या सोळा कला अधिष्ठित होतात ती मूळचंद्राची आकृति , बिंब . आंवसेचिये दिवसीं । सतराविये अंशीं । - अमृ ७ . १५३ ; - ज्ञा १५ . २७२ . 
  • a  Seventeen. 
  • सतरा पंधरा गोष्टी सांगणें Utter incoherent speeches, rant, raveprate. 
RANDOM WORD

Did you know?

If the rituals after the death are not performed what are the consequences?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site