मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणिसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


शमो मन्निष्ठता बुद्धेर्दम इन्द्रियसंयमः ।

तितिक्षा दुःखसंमर्षो जिह्वोपस्थजयो धृतिः ॥३६॥

बुद्धि जे कां विवेकवंती । असार सांडूनि सार धरिती ।

तिणें मनाच्या सकळ वृत्ती । विवेकस्थिती आवरोनि ॥३१॥

त्या वृत्तीसमवेत आपण । बुद्धि परमात्मीं मिळे जाण ।

जेवीं सागरासी लवण । दे आलिंगन भावार्थें ॥३२॥

समुद्रीं मिळतां लवण । समुद्रचि होय आपण ।

तेवीं आत्मनिश्चयें बुद्धि पूर्ण । चैतन्यघन स्वयें होय ॥३३॥

ऐसा बुद्धीचा उपरम । त्यानें म्हणिजे गा `शम' ।

यापूर्वी करावया दम । तोही अनुक्रम अवधारीं ॥३४॥

शत्रूचें जें दुर्दमन । तो दमु येथें नव्हे जाण ।

करावें इंद्रियदमन । तेंही लक्षण अवधारीं ॥३५॥

जेणें सहाय होती शमासी । त्या युक्तीं राखणें इंद्रियांसी ।

विधीवेगळें नेदी भोगासी । आवरी अहर्निशीं वैराग्यें ॥३६॥

ऐसें इंद्रियांचें निग्रहण । त्या नांव गा `दम' गुण ।

आतां तितिक्षेचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥३७॥

महासुख आलें होये । तें जेणें उल्हासें अंगीं वाहे ।

तेणेंचि उल्हासे पाहे । दुःखही साहे निजांगीं ॥३८॥

तेज आणि महा अंधारी । नभ समत्वें अंगीं धरी ।

तेवीं जो अविकारी । सुखदुःखपरी साहता ॥३९॥

गोफणेचा सुवर्णपाषाण । लागे तो दुःखी होय पूर्ण ।

तेचि वोळखिलिया सुवर्ण । दुःख जाऊन सुख वाटे ॥४४०॥

तैसें द्वंद्वांचें निजस्वरूप । वोळखिलिया सद्‌रूप ।

तेव्हा द्वंद्वें होती चिद्‌रूप । हें मुख्य स्वरूप तितिक्षेचें ॥४१॥

सांडूनियां देह‍अहंते । सुखदुःखांहीपरतें ।

देखणें जें आपणातें । तेचि येथें `तितिक्षा' ॥४२॥

स्वप्नींचे दरिद्र आणि सधनता । जागृतीसी दोन्ही मिथ्या ।

तेवीं सुखदुःखापरता । देखणें तत्त्वतां ते `तितिक्षा' ॥४३॥

जिव्हा आणि दुसरें शिश्न । यांचा जयो करावा आपण ।

या नांव `धृति' संपूर्ण । विद्याधारण धृती नव्हे ॥४४॥

जेवीं कृष्णसर्प धरिजे हातीं । हे दोनी धरिजे तैशिया रीतीं ।

अळुमाळ ढिलावतां धृती । परतोनि खाती धरित्यासी ॥४५॥

ज्यासी द्रव्यदारासक्ती । तेथ कदा न रिगे हे धृती ।

द्रव्यदाराअनासक्ती । त्याचे घरीं धृती पोषणी सदा ॥४६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP