मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणिसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४१ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्रीर्गुणा नैरपेक्ष्याद्याः सुखं दुःखसुखात्ययः ।

दुःखं कामसुखापेक्षा पण्डितो बन्धमोक्षवित् ॥४१॥

सकळ साम्राज्यवैभवेंसीं । चतुर्दशभुवनविलासेंसीं ।

अंगीं लक्ष्मी आलिया जयापाशीं । परी थुंकोनि तिसी पाहेना ॥१२॥

ऐशी ज्याचे निरपेक्षता । ते उत्कृष्ट `श्री' तत्त्वतां ।

त्यासी मी श्रीकृष्ण वंदीं माथां । इतरांची कथा कायसी ॥१३॥

ज्यासी लक्ष्मीची निरपेक्षता । त्याची नित्य वस्ती माझे माथां ।

त्याहीहोनि पढियंता । आणिक सर्वथा मज नाहीं ॥१४॥

सुख आणि महादुःख । दोनींतें ग्रासोनियां देख ।

प्रकटे स्वानंद स्वाभाविक । या नांव `सुख' उद्धवा ॥१५॥

जेथ दुजयाची चाड नाहीं । इंद्रियांचा पांग न पडे कांहीं ।

विषयावीण आनंद हृदयीं । `निजसुख' पाहीं या नांव ॥१६॥

विसरोनि हें निजसुख । कामापेक्षा करणें देख ।

याचि नांव गा परम `दुःख' । केवळ ते मूर्ख सेविती ॥१७॥

नित्य होतां कामप्राप्ती । कदा नव्हे कामतृप्ती ।

कामापेक्षा पाडी दुःखावर्ती । दुःख निश्चितीं कामापेक्षा ॥१८॥

हा बंध हा मोक्ष चोख । जाणणें जें अलौकिक ।

कदा नव्हे आनुमानिक । `पंडित' देख या नांव ॥१९॥

ऐशी न जोडतां अवस्था । आम्ही सज्ञान वेदशास्त्रतां ।

ऐशी अभिमानि पंडितता । ते न ये सर्वथा उपेगा ॥५२०॥

ज्यासी शांति आणि समाधान । साचार बंधमोक्षाचें ज्ञान ।

तो `महापंडित' जाण । ऐसें श्रीकृष्ण बोलिला ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP