मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणिसावा|

एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


आदावन्ते च मध्ये च सुज्यात्सृज्यं यदन्वियात् ।

पुनस्तत्प्रतिसंक्रामे यच्छिष्येत तदेव सत् ॥१६॥

गुणां आदि-मध्य-अवसानीं । सृष्टिउत्पत्ति-स्थिति-निदानीं ।

जें असे अविनाशपणीं । तें मी मानें संतत्वें ॥१९०॥

तेंचि संतत्व गा ऐसें । ज्याचेनि आधारें जग वसे ।

जें जगा सबाह्य भरलें असे । जग प्रकाशे ज्याचेनी ॥९१॥

हें जगचि होय जाये । परीं तें संचलेंचि राहे ।

ऐशी जे निजवस्तु आहे । ते तूं पाहे संतत्वें ॥९२॥

जैसे घटमठ होती जाती । आकाश राहे सहजगती ।

तेवीं ब्रह्मांडा लयोत्पत्ती । वस्तूची स्थिती संचली ॥९३॥

जेवीं अलंकारपूर्वीं सोनें । अलंकारीं सोनें सोनेंपणें ।

अलंकारनाशीं नासों नेणे । जेवीं कां सोनें निजस्थिती ॥९४॥

तेवीं आकळोनि चराचर । वस्तु असे अखंडाकार ।

होतां जातां आकारविकार । वस्तु अणुमात्र विकारेना ॥९५॥

ऐशी जे वस्तु अखंडपणें । तिच्या ठायीं चार प्रमाणें ।

इहीं प्रामार्णीं वस्तु जाणणें । प्रपंच देखणें मिथ्यात्वें ॥९६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP