TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्लोक ३ रा

श्रीभगवानुवाच ।

सिद्धयोऽष्टादश प्रोक्ता धारणा योगपारगैः ।

तासामष्टौ मत्प्रधाना दशैव गुणहेतवः ॥३॥

सिद्धी अष्टादश जाण । त्यांची धारणा भिन्न भिन्न ।

ऐंसे बोलिले योगज्ञ । योगसंपन्न महासिद्ध ॥३७॥

या नांव गा सिद्धी समस्ता । यांत अष्ट महासिद्धी विख्याता ।

त्या माझे स्वरूपीं स्वरूपस्थिता । आणिकासी तत्त्वतां त्या नाहीं ॥३८॥

मनसा वाचा कर्मणा जाण । विसरोनि देहाचें देहपण ।

माझेनि स्वरूपें अतिसंपन्न । चैतन्यघन जो झाला ॥३९॥

त्यापाशीं या सिद्धी जाण । उभ्या असती हात जोडून ।

परी तो न पाहे थुंकोन । निचाड जाण यापरी ॥४०॥

इतर दहा सिद्धींची कथा । ज्या सत्त्वगुणें गुणभूता ।

साधक शुद्धसत्त्वात्मा होतां । त्यापाशीं सर्वथा प्रकटती ॥४१॥

अष्ट महासिद्धींची कथा । तुज मी सांगेन तत्त्वतां ।

ज्या माझे स्वरूपीं स्वभावतां । असती वर्तता अहर्निशीं ॥४२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-09-19T11:20:33.6900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्‍याला म्‍यान नाहीं

 • गाढवाला ज्‍याप्रमाणें काही समजत नसल्‍यामुळे ते गांवभर भटकते, वाटेल ते करते 
 • त्‍याप्रमाणें कोयत्‍याला म्‍यान नसल्‍यामुळे तो वाटेल त्‍यावर घातला जातो. मनुष्‍याला कोणताहि निर्बंध नसला म्‍हणजे त्‍याच्या वर्तनाला आळ बसत नाही व तो स्‍वैरपणें वागून आपली किंमत कमी करून घेतो. शस्‍त्राला आवरण जसे म्‍यान तसे प्राण्याला ज्ञान असले पाहिजे, म्‍हणजे त्‍यापासून त्रास पोहोचत नाही. 
RANDOM WORD

Did you know?

सोळा मासिक श्राद्धें कोणती ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.