TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्लोक ३० वा

मद्‌विभूतीरभिध्यायन् श्रीवत्सास्त्रविभूषिताः ।

ध्वजातपत्रव्यजनैः स भवेदपराजितः ॥३०॥

अपराजयसिद्धी प्राप्ती । ध्याना आणावी माझी मूर्ती ।

जिचेनि नांवे जयो पावती । जाण निश्चितीं सुरवर ॥ ७२॥

चतुर्भुज घनश्याम । शंखचक्रगदापद्म ।

छत्रातपत्र चामरयुग्म । ध्वजीं उत्तम गरुडलांछन ॥७३॥

रत्‍नदंडें झणत्कार । व्यजन वीजिती सनागर ।

चरणीं गर्जती तोडर । तोडरीं अपार अरिवर्ग ॥७४॥

ऐशिये माझे मूर्तीचें ध्यान । जो सर्वदा करी सावधान ।

तो सर्वत्र विजयी जाण । अभंगपण माझेनी ॥७५॥

तो माझेनि ध्यानें पाहें । कोणी न मेळवितां साह्ये ।

एकला सर्वत्र विजयी होये । ऐशी सिद्धी लाहे या निष्ठा ॥७६॥

जो मी हृदयीं धरी अजितू । तो सर्वत्र होय अपराजितू ।

ऐसें सांगोनि भगवंतू । उपसंहारितू सिद्धींतें ॥७७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-09-19T11:20:52.3900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

माठ

  • पु. पसरट असा मातीचा घडा ; रांजण - स्त्री . ( कु . ) चिकण माती असलेली जागा . [ सं . मृद + घट ; मृत्तिका + घट ] 
  • पुस्त्री . एक पालेभाजी . ही सर्वत्र व सर्वकाळीं होते . तांबडा व पांढरा असे याचे दोन प्रकार आहेत . लावल्यापासून तीन आठवड्यांत खाण्याजोगी होते . [ सं . मारिश ] 
  • वि. 
  • चापटसर ; खालपट ; किंचित उतरतें ( छप्पर इ० ); याच्या उलट खर किंवा पाणढाळ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

रुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site