TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्लोक ३३ वा

अन्तरायान्वदन्त्येता युञ्जतो योगमुत्तमम् ।

मया सम्पद्यमानस्य कालक्षपणहेतवः ॥३३॥

अहेतुक करितां माझें भजन । तेणें शीघ्र माझी प्राप्ती जाण ।

तेथें सिद्धींवरी घालिता मन । आली नागवण मत्प्राप्तीसी ॥८६॥

ज्यासी विषयभोग लागे गोड । तोचि सिद्धींची वाहे चाड ।

ज्यासी माझे प्राप्तीचें कोड । तो वांच्छीना बंड ऋद्धिसिद्धींचें ॥८७॥

ज्यासी लौकिकीं अतिप्रतिष्ठा । तो सिद्धींच्या सोशी खटपटा ।

ज्यासी मत्प्राप्तीची निष्ठा । तो वचेना वाटा सिद्धींच्या ॥८८॥

पावतपावतां वाराणसी । जो वस्तीसी गेला वेश्यागृहासी ।

तेथें भुलोनि तिच्या भोगासी । सर्वस्व तियेसी समर्पी ॥८९॥

इयेपासूनि जीवेंप्राणें । सर्वथा वेगळें नाहीं जाणें ।

ऐसा संकल्प करोनि तेणें । वश्य होणें वेश्येसी ॥१९०॥

जंव असे गांठी गांठोडी । तंव ते त्यापाशीं लुडबुडी ।

निःशेष वेंचलिया कवडी । बाहेरी दवडी तत्काळ ॥९१॥

तो दवडितांही न जाये । निर्लज्ज निसंगु होऊनि राहे ।

तरी आपणचि सांडोनि जाये । तैशाचि पाहें महासिद्धी ॥९२॥

सकळ पापांतें निर्दळणें । सकळ कुळांतें उद्धरणें ।

तें काशीचें खुंटलें पावणें । वेश्यानागवणें भोगलिप्सा ॥९३॥

तैसीच सिद्धींचीही कथा । माझे प्राप्तीसी प्रतिबंधभूता ।

माझें ध्यान ज्ञान वैराग्यावस्था । नागवूनि रिता सांडिती ॥९४॥

माझे प्राप्तीनिकट जाण । उठे सिद्धींची नागवण ।

भोगें छळावया व्यामोहकपण । विलंबकारण मत्प्राप्ती ॥९५॥

माझें स्वरूप अद्वैतता । तेथें सिद्धींच्या नानावस्था ।

ते मायेची व्यामोहकता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥९६॥

माझे प्राप्तीआड सिद्धींचें विघ्न । हेंचि तुज कळावया जाण ।

म्यां सर्व सिद्धींचें निरूपण । समूळ संपूर्ण सांगीतलें ॥९७॥

माझ्या ठायीं धरितां ध्यान । एकाग्रता होतां मन ।

तेथ भोगलिया सिद्धी जाण । करिती नागवण साधका ॥९८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-09-19T11:20:54.7730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वेणु

  • पु. १ वेळू ; बांबू ; कळक . २ वेळूची मुरली ; पांवा ; बांसरी . - एरुस्व ६ . ७३ . वाहिला गोपाळें वेणुनाद पडे कानीं । - तुगा १६१ . [ सं . ] 
  • ०दंड पु. वेळूची काठी . केवळ वेणुदंडग्रहण । तेणें सन्यासत्व न घडे जाण । - एभा १८ . १०३ . 
  • m  Bamboo; a bamboo flute or pipe. 
  • ०बीज यव - नपु . वेळूचें बी . अठरा उपधान्यापैकीं हें एक आहे . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

रुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.