मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
गोणाईने नवस केला । देवा प...

संत जनाबाई - गोणाईने नवस केला । देवा प...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


गोणाईने नवस केला । देवा पुत्र देंई मला ॥१॥

ऐसा पुत्र देंई भक्त । ज्याला आवडे पंढरीनाथ ॥२॥

शुद्ध देखोनियां भाव । पोटा आले नामदेव ॥३॥

दामाशेटी हरुषला । दासी जनीनें ओवाळिला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP