मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
अक्षतारोपण

अक्षतारोपण

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


एका पात्रांत दूध व तूप एकत्र घ्यावें. दुसर्‍या पात्रांत ओले पांढरे तांदूळ घ्यावें. वधूवरांनीं आपले हात धुवावें. वरानें वधूच्या ओंजळींत दूधतूप एकत्र केलेले हाताच्या दोन अंगुलींनी: २ वेळां चोपडून २ वेळां तांदूळ घालावेत. वरून २ वेळ दूधतूप घालावें व तो वधूचा अंजलि तसाच असूं द्यावा. त्यानंतर वराच्या ओंजळींतही अशाच रीतीनें दोनदा दूधतूप मग तांदूळ व फ़िरून दोनदा दूधतोप दात्यानें अथवा दुसर्‍या कोणी करावें. नंतर दात्यानें त्या दोघांच्या ओंजळींत सुवर्ण घालावें आणि वधूच्या ओंजळीवर वराची ओंजळ ठेवून “ कन्यातारयतु ” इत्यादि ६ मंत्र म्हणून वधूला उठवून तिच्याकडून ओंजळींतल्या अक्षता “ भगोमेका० ” हा मंत्र म्हणवून वराच्या मस्तकावर टाकवाव्यात. नंतर वरानें आपल्या ओंजळींतल्या अक्षता “ यज्ञोमेकाम:० ” हा मंत्र म्हणून वधूच्या मस्तकावर घालाव्यात. अशा रीतीनें दोघांनीं पुन: दोन वेळां करावें. त्यामध्यें दुसर्‍या वेळेस वधूनें “ श्रियोमेका० ” हा मंत्र म्हणून वराच्या मस्तकावर अक्षता घालाव्या आणि वरानें “ धर्मोंमे० ” हा मंत्र म्हणून वधूच्या मस्तकावर घालाव्या. तिसर्‍या वेळेस वधूनें “ प्रजामे० ” हा मंत्र म्हणून वराच्या मस्तकावर घालाव्या आणि वरानें “ यशोमे० ” हा मंत्र म्हणून वधूच्या मस्तकावर घालाव्या. नंतर पूर्वी प्रमाणेंच कन्येकडून वराच्या ओंजळींमध्यें दोन वेळां एकत्र दूधतूप चोपडून त्यांत दोन वेळां तांदूळ घालावेंत आणि त्यांवर दोन वेळां अभिघार करावा. नंतर दात्यानें अथवा दुसर्‍या कोणी पूर्वीप्रमाणें कन्येची ओंजळ भरली असतां दात्यानें पूर्वीप्रमाणें तीत सोनें घालून वराच्या ओंजळीवर कन्येची ओंजळ ठेवून पूर्वीप्रमाणें “ कन्यातारयतु ” इत्यादि ६ वाक्यें बोलावींत. नंतर वरानें “ यज्ञोमेका० ” हा मंत्र म्हणून वधूच्या मस्तकावर अक्षता घालाव्या आणि वधूनें “ भगोमेका० ” हा मंत्र म्हणून वराच्या मस्तकावर घालाव्या. असें पुन: दोन वेळां बोलावें. त्यामध्यें दुसर्‍या वेळेस वरानें “ धर्मोमे० हा मंत्र म्हणून वधूच्या मस्तकावर घालाव्या. आणि वधूनें “ श्रियोमे० ” हा मंत्र म्हणून वराच्या मस्तकावर घालाव्या. तिसर्‍या वेळेस वरानें “ यशोमे० ” हा मंत्र म्हणून वधूच्या मस्तकावर घालाव्या आणि वधूनें “ प्रजामें० ” हा मंत्र म्हणून वराच्या मस्तकावर घालाव्या. नंतर वरानें वधूच्या अंजलींत पूर्वीप्रमाणें अक्षता भरून्ब आपली ओंजळ दुसर्‍याकडून भरव्वून दोघांनींही अगोदर वधूनें व मग वरानें अशा रीतीनें मंत्र न म्हणतां अक्षतां टाकाव्यात. नंतर वरानें आपल्या मस्तकावरील एक फ़ूल घेऊन तें दूध व तूप मिश्र केलेल्या पात्रांत भिजवून त्याच्या योगानें कन्येच्या कपाळावर एक तिलक करावा. तिनेंही आपल्या मस्तकावरील फ़ुलानें तशाच रीतीनें वराच्या कपाळावर तिलक करावा आणि फ़ुलाची माळा वराच्या गळ्यांत घालावीं. वरानेंही वधूच्या गळ्यांत माळा घालावी.
मंगलसूत्र - बंधन :- नंतर वरपक्षाकडील सुवासिनींनीं वधू आणि वर ह्या ह्या दोघांना पूर्वेस तोंड करून बसवावें. आणि शिष्टाचाराप्रमाणें अष्टापुत्री नांवाची दोन वस्त्रें आणि कंचुकी म्हणजे चोळी, काळ्या मण्यांचें मंगलसूत्र वधूला अर्पण करून, एक वस्त्र नेसवून अंगांत चोळी घालवावी व दुसरें वस्त्र अंगावर पांघरण्यास द्यावें. नंतर वरानें आपल्या हातांत तें मंगलसूत्र घेऊन “ हे पतिव्रते, हें मंगलसूत्र भर्त्याच्या ( माझ्या ) जीवनाचें कारण आहे, म्हणून हें सूत्र हे सुभगे मी तुझ्या गळ्यांत बांधतो; ह्यामुळें तूं शंभर वर्षेपर्यंत जीवंत रहा. ” असा मंत्र बोलून इष्टदेवतेचें स्मरण करीत करीत तें सूत्र वधूच्या कंठांत बांधावें. “ आयुष्यवर्चस्यं० ” या सूक्ताच्या* “ भूषणधारणमंत्रांनीं ” वधूला दागिने घालावेत. नंतर विवाहव्रताची निर्विघ्नता होण्याकरितां वधूवरांनीं “ गणानांत्वा० ” या मंत्रांनीं एका पात्रांत हळकुंडे, पांच सुपार्‍या, ठेऊन श्री गणपतीचें पूजन लाडू इत्यादि षोडशउपचारांनीं करावें. पुन: पूर्वी सांगितलेल्या मंत्रांनीं पूजा केलेल्या सुपार्‍या दंपतीचे अंगावरील वस्त्राचे पदरांत निरनिराळी गांठ देऊन बांधाव्या. नंतर उपाध्यायानें “ नीललोहित० ” ह्या मंत्रानें त्या निरनिराळ्या दोन्ही गांठीं एकेठिकाणीं बांधाव्यात. नंतर दात्यानें भार्येसह वृद्ध सुवासिनी आणि आप्त ज्ञातिबांधवांनीं वधूवराच्या कपाळीं ओल्या अक्षता लावाव्या व उभयतांस आशीर्वाद द्यावा. ( ह्या ठिकाणीं कौस्तुभ व प्रयोगरत्नामध्यें महालक्ष्मी, पार्वती, शची यांचें नाममंत्रानें षोडशोपचार पूजन करून त्या देवतेच्या संतोषार्थ वधून सुवासिनी स्त्रियांस वायनें द्यावीं असें सांगितलें आहे. ) नंतर वधू आणि वर ह्यांनीं एकमेकांचे हात धरून मंडपांतील वेदीवर मंत्राच्या घोषासह जावें

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP