मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| उपासकांस उपदेश उपदेश संसारिकांस उपदेश १ ते २ संसारिकांस उपदेश ३ ते ५ संसारिकांस उपदेश ६ ते ८ संसारिकांस उपदेश ९ ते ११ संसारिकांस उपदेश १२ ते १४ संसारिकांस उपदेश १५ ते १८ संसारिकांस उपदेश १९ ते २१ संसारिकांस उपदेश २२ ते २५ संसारिकांस उपदेश २६ ते ३० संसारिकांस उपदेश ३१ ते ३६ खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ वेषधार्यांस उपदेश १ ते ५ वेषधार्यांस उपदेश ६ ते ८ वेषधार्यांस उपदेश ९ वेषधार्यांस उपदेश १० ते १२ वेषधार्यांस उपदेश १३ ते १६ वेषधार्यांस उपदेश १७ ते २० वेषधार्यांस उपदेश २१ ते २५ वेषधार्यांस उपदेश २६ ते ३१ वेषधार्यांस उपदेश ३२ वेषधार्यांस उपदेश ३३ ते ३५ वेषधार्यांस उपदेश ३६ ते ४० वेषधार्यांस उपदेश ४१ ते ४५ वेषधार्यांस उपदेश ४६ ते ५० वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपासकांस उपदेश जनांस उपदेश १ ते ५ जनांस उपदेश ६ ते १० जनांस उपदेश ११ ते १३ जनांस उपदेश १४ ते १७ जनांस उपदेश १८ ते २० जनांस उपदेश २१ ते २५ जनांस उपदेश २६ ते २८ जनांस उपदेश २९ जनांस उपदेश ३० ते ३५ जनांस उपदेश ३६ ते ४० जनांस उपदेश ४१ ते ४५ जनांस उपदेश ४६ जनांस उपदेश ४७ ते ४८ जनांस उपदेश ४९ ते ५० जनांस उपदेश ५१ ते ५५ जनांस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० मुमुक्षूंस उपदेश ११ ते १५ मुमुक्षूंस उपदेश १६ ते २० मुमुक्षूंस उपदेश २१ ते २५ मुमुक्षूंस उपदेश २६ ते ३० मुमुक्षूंस उपदेश ३१ ते ३५ मुमुक्षूंस उपदेश ३६ ते ४० मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५० मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश ६१ ते ६४ मनास उपदेश १ ते ५ मनास उपदेश ६ मनास उपदेश ७ ते १० मनास उपदेश ११ ते १५ मनास उपदेश १६ ते २० मनास उपदेश २१ ते २६ उपदेश - उपासकांस उपदेश संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अन्य - दैवत - उपासकांस उपदेश Translation - भाषांतर १.जाखाई जोखाई उदंड दैवतें । वाउगेंचि व्यर्थ श्रमतोसी ॥१॥अंतकाळीं तुज सोडविना कोणी । एक्या चक्र-पाणी वांचोनियां ॥२॥मागें थोर थोर कोणें केलें तप । उद्धरीलें अमूप नारायणें ॥३॥नामा म्हणे ऐसे बहु झाले भांड । न उच्चारी लंड नाम वाचे ॥४॥२.नानापरिचीं दैवतें । बहुत असती असंख्यातें ॥१॥सेंदुर शेरणी जीं इच्छितीं । तीं काय आर्त पुरविती ॥।२॥अंध नको होऊं आलीया । भज भज पंढरिराया ॥३॥सोडूं नको विष्णु त्रिपार-णिया । तोडी कुलूप पाठी गळ टोचोनियां ॥४॥बाळा अबळा मुकी मौळी । क्षुद्र देवता जीवदान बळी । तेणें न पावती सुख कल्लोंळी । एक विठ्ठलावांचूनियां ॥५॥नाना धातूची प्रतीमा केली । षोडशोपचारें पूजा केली । दुकळी विकूनि खादळी । तें काय आर्त पुरविती ॥६॥आतां दृढ धरोनियां भाव । वोळगा वोळगा पंढ-रिराव । आपुले चरणीं देईल ठाव । विष्णुदास नामा ह्मणे ॥७॥३.खाटिकाप्रमाणें करिसी व्यापार । मनीं निरंतर धरो नियां ॥१॥दुष्ट दुचाचारी दुर्बळ घातकी । परम नाशकी पापिष्ट तो ॥२॥अपमानीं आशा धन मेळविसी । अंतीं नरकासि जासी जाण सत्य ॥३॥नामा म्हणे जाण करूं मोटयाळें । जाऊनियां लोळे विष्टेमाजी ॥४॥४.आपुली करणी न विचारी मनीं । वांयां काय ठेवूनि बोल जिवा ॥१॥खाटकी जो चेपी पशूची नरडी । अवचिता करं-गळी सांपडली ॥२॥मेलों मेलों ह्मणूनि गडबडां लोळे । परि कापी गळे आठवीना ॥३॥आपुलें ह्मणवूनि विव्हळतसे । खदखदां हांसे दुस-र्यासी ॥४॥वाटपाडयानें घर खाणोनि घेतलें । जितुकें मेळविलें तितुकें नेलें ॥५॥आपुलें नेलें म्हणऊनि खलखळां रडे । परि घेतां दरवडे आठवीना ॥६॥सोनाराचे घरीं पडिलेसें खाण । चोरिलें सुवर्ण तेंहि नेलें ॥७॥आपुलें नेलें म्हणऊनि मोकलितो धाया । ठक-विल्या आयाबाया तें आठवीन ॥८॥तराळा़चे घरीं आला असे जेव्हां । ह्मणतसे देवा काय करूम ॥९॥दुसर्यासी मागतां परम सुख वाटे । आपण देतां फुटे काळीज तें ॥१०॥जन्मवरी पोशिलें लेंकुराचे परि । हातीं घेऊनि सुरी उभा राहे ॥११॥गर्दन सुळीं देतां म्हणे काय केलें । पुढिल्यासि मारिलें आठ-वीना ॥१२॥नामा ह्मणे विष्णुदास ऐसे जे निर्लज्ज । त्यांसी पंढरि-राज केंवि भेटे ॥१३॥५.अर्चन विष्णूचें नाहीं पूजन । तये गांवींचे अनामिक जन । भूतप्रेताचें करिती भजन । तयासि दंडन करी यम ॥१॥ह-रीचे वांचोनि सुकृत करी । तया नांव पुण्य ठेविजे जरी । तुटोनि पडो त्यांची वैखरी । अंतीं महा अघोरीं वास तया ॥२॥समारंभ करिती आणिक देवाचा । ह्मणती येणें विष्णु तृप्त होय साचा । धिग् धिग् आचार जळो त्यांचा । वांयांवीण वाचा विटाळली ॥३॥पहा हो नवही द्बारें एकचि देहीं । रसस्वाद कान देतील कांहीं । जयाचा मान तयाच्या ठायीं । येतसे पाहीं सेवितां ॥४॥जो देवदेवतां शिरोमणि । असुर रुळती जयाच्या चरणीं । तो सांडिती चकपाणी । भजना हातीं होईल तुझिया ॥५॥विष्णुदास नामा विनवी जगा । अझूनि तरी हरीसि शरण रिघा । जे जे अपराध केले असतील मागा । ते ते नेईल भंगा स्वामि माझा ॥६॥६.पोटीं अहंतेसी ठाव । जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव ॥१॥भजन चालिलें उफराटें । कोण जाणे खरें खोटें ॥२॥सजि-वासी हाणी लाथा । निर्जिवपायीं ठेवी माथा ॥३॥सजीव तुळसी तोडा । पूजा निर्जिव दगडा ॥४॥वेला करी तोडातोडी । शिवा लाखोली रोकडी ॥५॥तोंड धरून मेंढा तारा । म्हणति सोमयाग करा ॥६॥सिंदूर माखूनियां धोंडा । त्यासि भजती पोरेंरांडा ॥७॥अग्निहोत्राचा सुकळ । कुश पिंपळाचा काळ ॥८।एत्तिकेची पूजा नाना । जित्या नागा घेती डांगा ॥९॥नामा ह्मणे अवघें खोटें । एक हरिनाम गोमर्टे ॥१०॥७.व्यर्थ या व्युत्पत्ति लवितोसी श्रुति । विषयांची तृप्ति काय चाड ॥१॥मायेचा हा फांसा मोहजाळ सोसा । वांयां कासा-विसा होसी झणीं ॥२॥टाकीं टाकीं असत्य विठ्ठल हेंचि सत्य । होईल सर्व कृत्य एका नामें ॥३॥नामा म्हणे दैवत एक तो अच्युत । सांगितलें हित खेचर विसें ॥४॥८.या विठोबापरतें आन दैवत म्हणती । ते शब्द नाय-कवती कानीं माझ्या ॥१॥पाखांडी म्हणती उगेंचि असावें । हा ब्रह्मकटाह करूं शके न अनारिसा ॥२॥तोहि जरी म्हणेल अहं-ब्रह्मास । तरी न पहावी वास येहीं नयनीं ॥३॥कोटि कोटी ब्रह्मांडें एक एक्या रोमीं । व्यापोनियां व्योमीं वर्ततसे ॥४॥ऐसा माझा विठो सर्वां घटीं सम । न संडावें वर्म नामा म्हणे ॥५॥९.केशवापरता देव आणिक आहेती । ऐसें श्रुति स्मृति बोलतील ॥१॥तरी ते शब्द झणीं कानीं हो पडती । पाखांडी ह्मणती सहावें तें ॥२॥इमद्रियांसि तुह्मी करा रे जतन । भजावा निधान श्रीविठ्ठल ॥३॥छेदावया शिर हस्त सहस्रांचें । जरी बहूतांचे उगा-रिले ॥४॥परि तूतें नाम आन न देवाचें । केशवापरतें कैंचें असे ब्रह्म ॥५॥अंगें चतुरानना झालिया हो भेटी । तोहि जरी गोष्टी ऐसी करी ॥६॥तरी तो चळला पोटीं ऐसें जाण । एकीं दुजेपण दावी तरी ॥७॥ब्रह्मकटाह एक उल्लंघों शके ऐसा । वर्तोनि दाही दिशा वर्ते जरी ॥८॥केशव नव्हे तो हो कां अनारिसा । म्हणोनियां वासा पाहों नक ॥९॥व्यसन भक्ति विरक्ति प्रौढी पुरुषार्थ पांचवा । जीवा-चिया सेवा ना कां ॥१०॥सर्वाभूतीं आहे केशव परमात्मा । न विसंबावें वर्मां नामा ह्मणे ॥११॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP