मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
कल्यान तो स्वामी प्राप्त ...

श्री कल्याण स्तवन - कल्यान तो स्वामी प्राप्त ...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

कल्यान तो स्वामी प्राप्त होय कैसा । जरी घडे ऐसा भक्तिभाव ॥१॥
भावें भक्ति घडे नवविधा जरी । ते चि पै विवरी परीक्षीती ॥२॥
परीक्षीती राया श्रवण घडलें । कीर्तन जोडलें नारदासी ॥३॥
नारदाच्या मुखें प्रल्हादा श्रवण । अखंड चिंतन हरीनाम ॥४॥
हरींचे पै चरण करी संवाहन । लक्षुमी आपण निज हस्तें ॥५॥
निज हस्तें अर्चन प्रभुरायें केलें । वंदन घडलें अक्रूरासी ॥६॥
अक्रूरा वंदन घडलें देवाचें । दास्य राघवाचें हनुमंता ॥७॥
हनुमंता दास्य भक्तीचें घडलें । सख्यत्व जोडले अर्जुनासी ॥८॥
अर्जुनासी सख्य देवासी जोडलें । आत्मनिवेदिलें बळीरायें ॥९॥
बळीरायाऐसा करितां निश्चय । तरी मग काय भवभय ॥१०॥
भवभय कैंचें राघवाच्या नामीं । कल्यान तो स्वामी केशवाचा ॥११॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP