मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
कल्याणाचें नाम कल्याणकारी...

श्री कल्याण स्तवन - कल्याणाचें नाम कल्याणकारी...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

कल्याणाचें नाम कल्याणकारी । कल्याणाचें ध्यान सर्वासि तारी ।
कल्याणाचा हस्त माथा जयाचे । चारी मुक्ति वंदिती पाय त्याचे ॥१॥
कल्याण होणें जरी तूज आहे । कल्याणपायीं मन स्थीर राहे ।
कल्याणवाणी पडतां सुकानीं । कल्याण जाले बहुसाल प्राणी ॥२॥
अविनाशि हें नाम कल्याण ज्याचें । करी सर्व कल्याण सर्वा जिवाचें ।
समर्थें जनीं ऊतरायासी पारी । अशी ठेविली मूर्ति कल्याणकारी ॥३॥


श्रमहरणितटाकीं स्वामि कल्याणराजा ।
परम दिनदयाळू नांदतो स्वामि माझा ।
सदय हदय ज्याचें ध्यान हें आठवीतां ।
परम सफल येतो मोक्ष कल्याण हाता ॥४॥


बहू मत्तमत्तांतरी दाटि जाली । तयाचे१ पदीं चित्तवृत्त्यादि ठेली ।
जगज्जीवनाचा प्रभू जो अनामी । नमस्कार साष्टांग कल्याणस्वामी ॥५॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP