मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
धन्य तो गुरुमहिमा काय कीं...

श्री कल्याण स्तवन - धन्य तो गुरुमहिमा काय कीं...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

धन्य तो गुरुमहिमा काय कीं न काळे । विश्वासिका फळे वरदानें ॥१॥
भैरवभट्टासी कांडोनि उखळांत । पुन्हां मूर्तिमंत केलें त्यासी ॥२॥
नरसिहं सरस्वतीं मेल्यासी उठवीलें । कबिरानें केलें चोज मोठें ॥३॥
तळोन घेतला शिष्य तो गोरख । केलें कवतुक नानकानें ॥४॥
कल्याणस्वामींचें आश्र्चिर्य परम । खेळे आत्माराम ज्या सबाह्य ॥५॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP