TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

कृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग ९

श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.


प्रसंग ९
कवणे येके दिवसीं ॥ कंसु बैसला सभेसी ॥ बंधु केसिया भुजेसीं ॥ अक्रुर आणि सकळिक ॥४६॥
ते सकळै पडिले चिंतावनीं ॥ रावो म्हणे बुद्धी नें सांगा रे कवणी ॥ येवढाले प्रतापीये असोनी ॥ वैरीया उपावो न कराची ॥४७॥
तो दिसेंदिसु वाडी जाला ॥ मग तो नागवे सकळांला ॥ जेणें उपजतां पवाडा केला ॥ तो सामान्य वीरू नव्हे ॥४८॥
यैसें बोलिला कंसासुरू ॥ तंव उठिला यमळा अर्जुनु ताडासुरू ॥ म्हणें काये वानीती ते लेंकरूं ॥ गौळीयांचें ॥४९॥
आतां आम्हासी आज्ञा दीजे ॥ कार्यें करून ते पाहिजें ॥ हांसोनी बोलिलें राजे ॥ विजया होइजे वीर हो ॥५०॥
मग ततक्षणीं ॥ प्रवेशले नंदाचे भुवनी ॥ पिंपळ ताड होउनी आंगणी ॥ वाढीनले ॥५१॥
वृक्षे गेले गगना ॥ कृष्ण जाला रांगनां ॥ आतां खेळावया येईल आंगना ॥ आणि वरी पडों ॥५२॥
तंव कृष्ण खेळत होता आंगनीं ॥ तंव त्या वोळखिलें दैत्यां दोहीं ॥ दोही करीं दोघे उपडौनी ॥ धरणीयेवरी आफळिले ॥५३॥
अवचिता गर्जीनला घावो ॥ तंव धांवीनला नंदरावो ॥ ते देखोनी पावला भेवों ॥ म्हणें हे नवल थोर जालें ॥५४॥
तंव कंसासुरा गेली मात ॥ म्हणें दोहीं वींरांचा केला घात ॥ आतां कवण आहे दूत ॥ जो त्याचा करिल संहारू ॥५५॥
तंव उठिला सर्प थोरू ॥ म्हणें मी सर्परूपें करीन संहारू ॥ महां अद्भुत वीषारू ॥ डषौनी मारीन मीं ॥५६॥
मग तयांसी निरोप दीधला ॥ तो पालखी जाउनी राहिला ॥ तंव तो बाळ पालखी निजैला ॥ येरू आला डंखावया ॥५७॥
कृष्णें तो देखिला दृष्टी ॥ मग धरिला मुष्टी । नखे रोउनी कंठी ॥ मारिला तो ॥५८॥
मग लटिकाची देतु असे हाका ॥ तंव धावीनली मायें बापें देखा ॥ तंव देखिला माहा सर्पु आइका ॥ तो विखार काळीया जैसा ॥५९॥
तो हातीचा सोडविला ॥ तंव प्राण त्याचा असे गेला ॥ लोकांस विस्मो जाला ॥ म्हणती वाचविला देवरायें ॥६०॥
तंव कंसा जालें श्रुत ॥ म्हणें येणें मारील माझें दैत्य ॥ जोजो (असें) जात ॥ तो मागता परतेना ॥६१॥
ऐसा चिंताग्रस्त जाला ॥ सकळासी भये सुटला ॥ कंस वीरांकडे पाहों लागला ॥ तंव उठिला कागा सुरू ॥६२॥
राया वरुषाचें लेंकरू ॥ त्याचे माथाचा वाळला नाहीं जारू ॥ त्याचा काईसा बडीवारू ॥ मज कागासुरापुढें ॥६३॥
आतां हाचि माझा प्रतिवादु ॥ चांचु हाणोनि काढीन मेंदु ॥ मज आलिया क्रोधु ॥ कळिकाळ ठगेंना ॥६४॥
यैसे बोलोनी तो निघाला ॥ नंदाए मंदिरी बैसला ॥ जंव कृष्ण खेळतां देखिला ॥ हातीं उंडा दहीं भाताचा ॥६५॥
म्हणें हानो चेपटघातें ॥ आणि काढु पोटींची आतें ॥ की कौटे फोडुं डोईचें ॥ आजी सांपडला कृष्ण हा ॥६६॥
तवं कृष्ण म्हणें हा काउळा ॥ मावा बैसला मज जवळा ॥ तंव तो वेगवगत्र धांवींनला ॥ हाणितला मुष्टीघातें मस्तकीं ॥६७॥
तंव तो वज्रशरीरी ॥ त्यासी कागासुरू काय करी ॥ वेळु न लगतां दोहीं करी ॥ धरूनी चीरी चाचुं त्याची ॥६८॥
ते दोनी सकलें केली ॥ कागासुरासी यैसी गती जाली ॥ नंद यशोदा धावींनली ॥ म्हणती पाठी घेतली कंसासुरें ॥६९॥

आमचें वाणीचें लेंकरू ॥ आणि येणें दैत्यांचा सोडिला पुरू ॥ हा जाने प्रतीकार करू ॥ म्हणउनी वांचतों ॥७७॥
मग कडिये घेउनी देती चुंबन ॥ येकी उतरीती निंबलोन ॥ म्हणती हें लेकरूं आजान ॥ परि वीर मारलें येणें (दारुण) ॥७१॥
आतां यासी जतन करा थोरी ॥ नीघों नेंदावा बाहेरी ॥ याचा कंस वैरी ॥ तो माव करी कपटिया ॥७२॥
तवं कागासुराचा बोभाट जाला ॥ कंस मनी थोर दचकला ॥ आमचें दळीं तों कागासुर भला ॥ होता बळियाडा ॥७३॥
येसना कागासुरू ॥ तें रांगते लेंकरूं ॥ वेळ न लागतां संहारूं ॥ केला तयाचा ॥७४॥
आतां यैसी येकी बुद्धी करुं ॥ त्यासी पडों द्या वीसरु ॥ मग बुद्धीं सीतरूं ॥ येर्‍हावीं नागवे हा ॥७५॥
यैसे चर्तुमास क्रमले ॥ कृष्ण चालों सिकलें ॥ ईतुकीयामध्ये गोकुळी पवाडे केले ॥ ते सांग रे कृष्णदासा ॥७६॥

॥ प्रसंगु ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:05.0000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उभवण

  • स्त्री. ( विणकाम ) ताणा ; उभे दोरे ; याच्या उलट आडवण . [ उभी + वीण ] 
  • स.क्रि. 
  • न. पाऊस निवारण करण्याचें साधन ; छत्री ; इरलें ; वगैरे . [ उभवणें ; तुल० का . उब्बे = पाऊस + सं . आवरण ] 
  • उभारणें ; उभें करणें ; रचणें ; स्थापन करणें . गगनावरी उभवावें । घडे केवी ॥ - ज्ञा १ . १२ . मठ मंडप उभविले । - मुआदि २७ . ५२ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

पापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.