कृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग ११

श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.


या नंतरें नंदे विचारिलें ॥ हे परब्रह्म अवतीर्ण जाले ॥ गोधनें राखतां नव्हें भलें ॥ कंसु करील अपघातु ॥१६॥
म्हणौनी बळीमद्रु सांगाती ॥ म्हणें हा न विसंबे गा श्रीपती ॥ तंव राम करी विनंती ॥ यापुढें किती बळ आमचें ॥१७॥
लाउनियां डावी करांगुळी ॥ जेणें गोवर्धनु उचलिला अंतराळी ॥ या पुढें कवण असे बळी ॥ यासी आकळी यैसा ॥१८॥
ब्रह्मीयानें केली रांडोळी ॥ चोरूनिया नेली वछे गोवळी ॥ तीतुकीहीं वनमाळी ॥ जाला देखा ॥१९॥
जो रावो सकळ उदकासी ॥ तेणें धरून नेले तुम्हासी ॥ मग तेथें गेले ऋषीकेशी ॥ तैं तुम्हासी सोडविले तेणें ॥२०॥
मागे जे जे पवाडे केलें ॥ तें तुम्हासी श्रुत जाले ॥ तुम्हीं कवणे बोले ॥ यासी जतन करा म्हणतां ॥२१॥
यैसे कवणे येके वेळीं ॥ गौळीयांचिया बाळा सकळीं ॥ त्या खेळती येमुने जळीं ॥ वस्त्रें पाळीं ठेउनियां ॥२२॥
तेथें श्रीकृष्ण आलें ॥ वस्त्रों घेउनी कळंबावरी वेघले ॥ त्यांचे खेळ सरले ॥ तंव वस्त्रें न देखती ॥२३॥
म्हणती आतां बाहिर कैसें नीगणें ॥ वस्त्रें कवणासी मागणें ॥ आतां घरासी कैसें जाणें ॥ वस्त्रेंविणा ॥२४॥
तंव तो कळंबावरी देखिला ॥ वस्त्रें घेउनि बैसला ॥ कुमारी म्हणती तयाला ॥ वस्त्रें देई जी नंदकुमरा ॥२५॥
तंव कृष्णनाथु म्हणें येउनि घेईंजें ॥ त्या म्हणती आम्हीं नज्ञ केवी येईजे ॥ रळीया मांडिलिया वोजें ॥ भाक देईजे सुखाची ॥२६॥
येकी नेमीति येकीसीं ॥ हे मात न सांगावी कवणासी ॥ कळो नेंदावी भ्रतारासी ॥ मग भाकेसी गुंतलिया ॥२७॥
मागां खेळिनला बाळलीला ॥ आतां भोगीतसे आवोला ॥ मग धरूनी प्रौढ कळां ॥ तो खेळे गोकुळामाझारी ॥२८॥
मार्ग रुधुनी मथुरेचा ॥ दानी जाला गोरसाचा ॥ देखोनी कान्हा नंदाचा ॥ चतुर विद्या भुललिया ॥२९॥
कवणें येके वेळीं ॥ गौळणी रीघालीया सकळै ॥ वडील राही चंद्रावळी ॥ पुढें चालिलीयां ॥३०॥
तंव पुढें उभा देखिला हरि ॥ मग ते जाली पाठमोरी ॥ तंव मागें हीं मुरारी ॥ उभाची आहे ॥३१॥
मग ते दक्षिणें करें ॥ तंव रूप देखेती सरें ॥ मग वामांगीं सरें ॥ तंव कृष्णची देखे ॥३२॥
जंव पाहे वास आकाशीं ॥ तंव तेथेंहीं देखे ऋषीकेसी ॥ मग विनवी भूमिकेसी ॥ तंव मूर्ती तैसीची देखें ॥३३॥
मग बैसली लाउनी डोळे ॥ तंव रूप ह्रदई प्रगटलें सावळें ॥ मग हांसे आलें बाळे ॥ बोले सकोमल उत्तरीं ॥३४॥
आहो जी जगदात्मया हरी रामा ॥ कांहो जी मार्गु नेंदा आम्हा ॥ आजीचा दिवस करी क्षमा ॥ मग इच्छा ते प्रमाण ॥३५॥
मग तो खेळे पानीयेडीं ॥ गौळणी येती लवडसवडी ॥ मस्तकी घेउनी द्रडी ॥ तंव तो फोडी खडीयानें ॥३६॥
यैसा रळीया विनोदे ॥ क्रीडा खेळे आनंदें ॥ यैसे वेधुनी मुकुंदे ॥ नानापरी उद्धरिले ॥३७॥
सुदामा देवांचा गुरू ॥ तो संदपाणी विप्रु ॥ तेथें विद्यारंभ करूं ॥ घातले रामकृष्ण ॥३८॥
यैसे पढतां श्री मुरारी ॥ कंसकेसिया विचारू करी ॥ श्रीकृष्ण नागवे बळाधीकारी ॥ बुद्धी वैरी सांधु अक्रुर ॥३९॥
तो भाचा होय आम्हासी ॥ कन्या देवो कृष्णासी ॥ तो विश्वासैल सोईरीकेसी ॥ मग तयासीं घातावें ॥४०॥
यैसें विचारूनी मानसीं ॥ मग पाठविते जाले आक्रुरासी ॥ तुम्हीं जावें वेगेसी ॥ कृष्णासी मूळ ॥४१॥
तो पुत्र बहीणीचा ॥ जावाईं करू सत्येवाचा ॥ मान वाढउं तयाचा ॥ नंदा येशोदेचा विचारू घेईजे ॥४२॥
आतां साहुं वैराकारू ॥ देउ आपुले लेंकरू ॥ हा सांगोनु विचारू ॥ कृष्णासी घेउनी येईजे ॥४३॥
मग अक्रुरासी विडा दीधला ॥ तो वस्त्रें देउनी वाटा लाविला ॥ कंस कानी लागला ॥ कृष्ण पातेजैल तुज ॥४४॥
तुं बुद्धीवंतु शाहाणा ॥ त्यासी भलतया प्रेत्नें आणा ॥ जरी उचित मागाना ॥ (नेदी) तरी आण पीतीयाची ॥४५॥
जें नुम्हीं मागणें ॥ ते म्या तुम्हांसी देणें ॥ जरी मीं नेंदी तरी उणें ॥ आमच्या पूर्वजासी ॥४६॥
मग रायासी नमस्कारू केला ॥ अक्रुर रथा आरूढ जाला ॥ सवें लोंक दिधला ॥ चतुरविध शाहाणें ॥४७॥
तंव अक्रर येमुना उतरला ॥ गोकुलाभीतरी प्रवेशला ॥ तंव विनोद देखता जाला ॥ श्रीकृष्णरायाचा ॥४८॥
तिये येमुने तीरीं ॥ गाई राखताती गोवारी ॥ वाती पावे तारफी मोहरी ॥ विमानें अंबरी पाहो ठेली ॥४९॥
जीकडे पाहे अक्रुरु ॥ तीकडें गोपाळांचीच भारु ॥ गर्जे वाजांतराचा गजरु ॥ आणी उच्चारू कृष्णनामाचा ॥५०॥
देव पुष्पवरुषाव करिती ॥ ते म्हणती आमचें देवपण किती ॥ हा आवतराला आदी मूर्ती ॥ जाला सारथी गौळीयाचा ॥५१॥
धन्य धन्य ते गोकुळ ॥ धन्य ते गोवळे सकळ ॥ कैसा खेळती खेळ ॥ परब्रह्मेंसीं ॥५२॥
मग म्हाणें अक्रूरु ॥ यांत असैल नंदकुमरू ॥ याचा भेटी आधीं सारूं ॥ मग करूं पुढील कार्ये ॥५३॥
मग टाकिला गोपाळाचा भारू ॥ तंव चतुर्भज सकळ परिवारू ॥ न कळे साणा थोरू ॥ सकळै मुगुटवर्धन ॥५४॥
तेथें भुळला अक्रुरु ॥ केला समस्ता नमस्कारू ॥ म्हणें येथें असे विचारु ॥ आणीके परीचा ॥५५॥
हा अवतरलासे सर्वेश्वरू ॥ फेडावया भूमीचा भारू ॥ खेळतसे बेषधरू ॥ नानारूपें ॥५६॥
हा कंसु व्रुथ्या भुळला ॥ अती गर्वे मातला ॥ आम्हासी भला कळला ॥ येर्‍हवीं नर्का जातों ॥५७॥
हा परत्परू सुंदरु ॥ विश्वाचा दातारू ॥ अवतरलासे सर्वेश्वरू ॥ स्वामी माझा ॥५८॥
तेथें माव केली चोज ॥ सकळै जाले जतुर्भुज ॥ आतां जावों गोकळामाजी ॥ भेटो नंदा येशोदेसी ॥५९॥
मग चाले चर्णचाली ॥ मार्गीं पाउलें उमटली ॥ तेथें ध्बजु पद्मे वोळखिलीं ॥ कुंकुमवर्णीं ॥६०॥
ते देखोनिया घाली साष्टांग ॥ देखतसें कृष्णाचे माग ॥ उमटले सुरंग ॥ आमोदकंदाचे ॥६१॥
तें कुंकुमम्रुत्तिका लावी कपाळी ॥ तंव ते भेदली असे पाताळीं ॥ म्हणें धन्यें हे महीतळी ॥ घाली लोटांगण ॥६२॥
येसा नंदभुवन पातला ॥ नंदारायाते भेटला ॥ वहुतां रीती सन्मानिला ॥ मग जाला बैसकारू ॥६३॥
मग चरणप्रक्षाळण जालें ॥ चंदनें टिळे रेखिलें ॥ वरी सुरंग मीर्वले ॥ गंध अक्षता ॥६४॥
मग कर्पूरेसी विडे देउनी ॥ नंद विनवी कर जोडुनी ॥ आज्ञा द्यावी झडकरुनी ॥ कवणा कार्या बीजें केलें ॥६५॥
तंव अक्रूर म्हणें गा राया ॥ कंसें पाठविले तुमचेया ठायां ॥ कन्या देताती भाचया ॥ तुमचीया षुत्रासी ॥६६॥
सांडिला वैराकारू ॥ आतां आनंदे सोईरीक करूं ॥ आम्हीं देउनी आपुलें लेंकरूं ॥ घर जोडित असों आम्हीं ॥६७॥
कंसें केली विनंति ॥ आणि मज मूळ पाठविलें तुम्हाप्रती ॥ पृथ्वीचे रायें हांसती ॥ यैसें न कीजे तुम्हीं ॥६८॥
तुम्हांसीं दीधली बहीणी ॥ आणि सोईरीक दुणाउ कन्या देउनी ॥ म्हणोनी विनंति कर जोडुनि ॥ मज पाठविले ॥६९॥
आतां वरू द्रुस्टीसी घालिजे ॥ मग मज आज्ञां दींजे ॥ वाट पाहती राजे ॥ नोवरा आणिजे आतांची ॥७०॥
मग नोवरा देखिला डोळां ॥ तो केवळ मदनाचा पुतळा ॥ तोची सींनगारु सकळां ॥ सुंदरा श्रीमंतासी ॥७१॥
प्रकाशले सूर्येभान ॥ तारांगणें सांडीती अभिमान ॥ देखती अगस्ती ब्राह्मण ॥ सागरू कांपें ॥७२॥
कृष्णातें देखोनि कंसाचा परिवारू ॥ गर्वां जाला परिहारू ॥ द्दष्टी पाहें आक्रूरु ॥ तंव देखे अनारिसें ॥७३॥
देखोनी कृष्णातें मन निवालें ॥ मूर्ती देखोनि आल्हादलें ॥ जैसे आंबुज विकासलें ॥ तैसें तळवे अलोहित ॥७४॥
कुंकुमरंगें रातलें ॥ कीं संध्यारागें प्रवर्तले ॥ ध्वज वज्र अंकुस मीर्वले ॥ स्वयंभ ऊर्ध रेखा ॥७५॥
वांकी तोडरु चरणीं ॥ जानु पोटरिया जघनी ॥ वरी पीतांबर वोढौणी ॥ कास शोभे गोमटी ॥७७॥
नाभीचे महीमान ॥ तेंची ब्रह्मयाचें जन्मस्थान ॥ ह्रदयें घनश्यामवर्ण ॥ शोभतसे ॥७७॥
यैसा चतुर्भुज सांवळा ॥ कंठीं तुळसीचिया माळा ॥ मर्गज पावा गळां ॥ मुखकमळा चंद्र लाजे ॥७८॥
दतपक्तीचे विकास ॥ जैसी उघडिली माणीकाची मांदुस ॥ नासाग्री परिमळ सुरस ॥ नीट तिखट पैं ॥७९॥
कुंडळे शोभती श्रवणी ॥ जैसी जोतीलिंगें दोम्हीं ॥ आंमृत वसे नयनी ॥ कृपाद्दष्टी ॥८०॥
त्रिपुंड शोभे लल्हाटी ॥ माथा मोरपीसांची वेठी ॥ पुष्पें तुरंविली मुगटी ॥ यैसा जगजेठी कान्हया ॥८१॥
मग काय केले तेणें नंदकुमरें ॥ निद्रा केली आक्रुरें ॥ स्वप्न दाविलें सारंगधरें ॥ त्या अक्रुरासी ॥८२॥
क्षीरसमुद्र भोवता असे ॥ तेथें शेषसया असे ॥ लक्षुमींसहित रुषिकेशे ॥ राज्य कीजे ॥८३॥
तें अमृत केवळ ॥ भीतरी कृष्णरावो घणनीळ ॥ निद्रा केली सुसीतळ ॥ लक्षुमी चरण प्रक्षाळीं ॥८४॥
शेषमंचकावरी ॥ पोहुडलासे रावो मुरारी ॥ यैसें स्वप्न देखिलें भीतरी ॥ तंव अक्रुर जागा जाला ॥८५॥
नेत्र उघडौनि पाहे ॥ तंव तैसेंची देखत आहें ॥ मग उठौनी भोंवतें पाहे ॥ तंव तो क्षीरसमुद्र ॥८६॥
मग आनंदभरित अक्रुर ॥ तंव द्दष्टी पोंह सारंगधर ॥ (स) भोंवता परिवार ॥ माहा सक्तीचा ॥८७॥
मग विचारी मानसीं ॥ हा अवतरला रुषिकेशी ॥ स्थापावया देवांसी ॥ नासील दैत्येकुळांतें ॥८८॥
हा अविनासे अपरांपरू ॥ येणें केला अवतारू ॥ जाला मायावेषधरू ॥ प्रगटला हाची ॥८७॥
आतां माझी भ्रांती निरसली ॥ मग साष्टांगें दंडवतें घातली ॥ चरणकमळें वंदीली ॥ मग जाला भक्तराजु ॥९०॥
आतां अक्रुरा प्रेम दीधलें ॥ मग नंदा येशोदेतें पुसिलें ॥ म्हणें अतां पाठवीजे वहीलें ॥ रामकृष्णासी ॥९१॥
येशोदा म्हणें लेंकरू अजाण ॥ येईल कीं नये नेणो ॥ म्हणोनि मग भीतरी गेला कृष्ण ॥ माये सिकवी ब्रहुतां रीती ॥९२॥
हा कंस कपटिया बहुत ॥ तेथें जातां नव्हे हित ॥ तो करिल अपघात ॥ यैसें मज कल्पतसें ॥९३॥
तो वैरी प्रतक्षे जाणां ॥ वाईट अती कठिणां ॥ तो पा तोजौन प्राणां ॥ घेवों पाहतसे ॥९४॥
यावरी बोले पुरुशोउत्तमु ॥ माझा तुं नेणसी वो पराक्रमु ॥ अझुणी न संडी संभ्रमु ॥ आजाणपणाचा ॥९५॥
आवो पाहे कर्तव्य ईश्वराचे ॥ आणी पाप भयें कैंचें ॥ जैसे कर्तव्य जयाचें ॥ तो तैसेचि पावैल ॥९६॥
माझी न करावी चिंता ॥ मीं भेटौनी येईन मागुता ॥ जो मारीता (आणि) मारविता ॥ तो वेगळाची असे ॥९७॥
भावो सुद्ध तरि मीं भेटैन ॥ कपट असैल तरी सीख लावीन ॥ तुझ्या प्रसादें घिजया होईन ॥ यैसे जाण सत्यार्थ ॥९८॥
या वचना निरोप दीधला ॥ मग नमस्कारू करुनी निघाला ॥ संवंगडियां हाकारा केला ॥ बळीभद्रासहित ॥९९॥
पांच शतें गोपाळां ॥ सहित रामकृष्ण सांवळा ॥ नंदु गौळियांसहित सकळां ॥ बोळवितु निघाला ॥८००॥
अक्रुरा घातलें दंडवत ॥ मग परतले समस्त ॥ गोपाळ खरसींगें वात ॥ येक नाचत कृष्णापुढें ॥१॥
येक येक घालिती हा (मा) मां हुंमरी ॥ वात पावे तारपी मोहोरी ॥ गात वात नाचत नानापरीं ॥ यमुनातीरीं उतरले ॥२॥
ते देखौनि आक्रूरू आल्हादला ॥ कृष्णरायाचा वेधु लागला ॥ म्हणें हा परमानंदु अवतरला ॥ आर्त रक्षावया ॥३॥
धन्ये ते गोकुळ ॥ धन्ये धन्ये ते यादव सकळ ॥ धन्ये धन्ये ते भूमीमंडळ ॥ जेथें केवळ मूर्ती आली ॥४॥
जो नातुडे साही दरुषणां ॥ ना सांपडें नाना साधना ॥ तो खेळे लेंकुरपणें (कान्हा) ॥ घरी गौळीयाचां ॥५॥
तीर्थक्षेत्र व्रतदानें ॥ करिती नाना आचरणें ॥ परी हा न सांपडे कवण्या वो गुणें ॥ तयासी येणें केवीं जालें ॥५॥
मज कवणां सुक्रुतास्तव ॥ देव भेटला सावेव ॥ पुढें कवण कर्तव्य मांव ॥ ते तु जाणसी स्वामीयां ॥७॥
आतां पैल तीर उतरलें ॥ अक्रुर स्नान करिते जाले ॥ श्रीमुरारी म्हणौनि बुडी देते जालें ॥ तंव देखिलें जळीं कृषा ॥८॥
तेथें थडीये दचकौनी पाहे ॥ तंव सपरिवारीं बैसला आहे ॥ आंतरिक्ष देखता होये ॥ तंव तैसीची मूर्ती देखत असे ॥९॥
पुनरपी बुडी देतां ॥ तंव देखिले त्या कृष्णनाथा ॥ आष्ट दिसा पाहातां ॥ वेगळा नव्हे ॥१०॥
मग मनोभावें नमस्कारू ॥ म्हणें हां विधी आवीधीचां दातारू ॥ ह्रदै प्रगटला सारंगधरू ॥ आतां संसारा काय करूं सके ॥११॥
संध्या वंदनें सारूनीं ॥ निघते जालें त (त) क्षणीं ॥ गोपाळ म्हणती चक्रपाणी वस्त्रें नयनीं ॥ देखों आम्हीं अपुर्वे ॥१२॥
पांटाउं (आणि) पीतांबर ॥ बेपावं (?) मंजीस्ट परीकर ॥ नाना वर्ण भेदाकार ॥ वस्तें राया कंसाची ॥१३॥
नाचत गेले गोपाळ तयावरी ॥ वस्त्रें वेढीत फाडीत चरणचारी ॥ हाका हुमरी मोहोरी ॥ गगन गर्जीनलें ॥१४॥
शत वरठयाचा नायकु ॥ तयासी क्रुध आला बहुतु ॥ तो धांवीनला हाक देतु ॥ गोपाळावरी ॥१५॥
गोपाळी केलीं वोहरी ॥ हाणती मारिती थापेवरी ॥ सांडुनी पावे मोहरी ॥ मग कृष्णावरी धांवीनला ॥१६॥
अरे नंदाचीया कुमरा ॥ कुळहीना ताकपीरा ॥ अरे अकल्पीत आलासी घरा ॥ आतां केवी जासील तुं ॥१७॥
अरे उठी चामचोरा ॥ दहीदूधतस्करा ॥ हाणोन मारीन रे पांपरा ॥ परि या अक्रूरासी भीतसें ॥१८॥
सीळेवरी जैसा आपटीन परीकाळा ॥ तैसा मीं तुज उपटीन रे गोपाळा ॥ आणि पाळीन सगळा ॥ तुज अपसरा गौळीया ॥१९॥
आतां कवण राखैल तुज ॥ कोपलया मज (सहज) ॥ तव कोपला कृष्णराज ॥ तेणें थापा हाणितलें ॥२०॥
थापा हाणितले गोपाळें ॥ तवं सीर जाले वेगळें ॥ ते जात असें अंतराळें ॥ मोक्षालागी ॥२१॥
सकळ स्वर्ग धांडोळिता ॥ मोक्ष नाहीं पाहाता ॥ सीर आले त्वरीता ॥ श्रीकृष्णचरणी लागलें ॥२२॥
ते देखे कृष्ण कृपाळु ॥ सीर टाकिले अंतराळु ॥ सीवगण धांवीनले सकळु ॥ तेहीं सीर स्वर्गासी नेलें ॥२३॥
ऐसी वरठया वैर मुक्ती देउनी ॥ निघाले श्रीचक्रपाणी ॥ आक्रुर करी विनवनी ॥ जी मज देईजें आज्ञा स्वामी ॥२४॥
अक्रूर मथुरे प्रवेशला ॥ आणि कृष्णरायाचा वृत्तांतु सांघीतला ॥ जी कृष्ण असे आला ॥ बळीमद्र देवासी ॥२५॥
ते पांच शतें गोपाळां ॥ बळीमद्रेसी सांवळा ॥ वरठयासी केली अवकळा ॥ सीर थापा हाणीतलें ॥२६॥
तंव कंस म्हणें बुद्धी करा ॥ वैरी आला असें दैवें घरा ॥ वीरासी केला हाकारा ॥ पाचारा चानोर मुष्टीकु ॥२७॥
सकळ वीर आलें ॥ कुंजर भार सावध केलें ॥ बीदी कुंचे बळकाविलें ॥ ठाईं ठाईं ॥२८॥
तंव ते नगरीचे लोक ॥ पाहाती उपरिया वरूनी कवतीक ॥ नरनारी असंक्षात ॥ पाहों ठेलिया ॥२९॥
पावें खरसींगें मोहोरी ॥ नादें दुमदुमीली धरत्री ॥ येक घालिती हमामा हुंबरी ॥ डागा करी झेलताती ॥३०॥
कास पीतांबराची मालगंठी ॥ सीरी मोरपीसाचीया वेठी ॥ फुलें तुरंबीली मुगुटी ॥ कंठी मळा तुळसीचिया ॥३१॥
येकाहुनी येकु आगळा ॥ चरणी तोडरू रुळे सकळा ॥ म्हणती नाभी नाभी दैत्यकुळा ॥ शरण गोपाळा रीगा रें ॥३२॥
ऐसे मथुरा प्रवेशले ॥ तेथें कुंब्जेचें भाग्य उदैलें ॥ तीणें गंधाक्षता कंचोळे घेतलें ॥ परिमळद्रव्यासहित ॥३३॥
ते जाउनी लगली कृष्णचरणी ॥ हे गंधाक्षता कीजो जी चक्रपाणी ॥ मग समस्ता गंध लाऊनी ॥ रामकृष्ण स्वीकरीती ॥३४॥
देखोनी तियेचा भावों ॥ संतोषला कृष्णरावों ॥ अभयकर मस्तकी ठेवो ॥ ततक्षणीं दिव्य देहे पातली ॥३५॥
वृद्धपण लपालें ॥ तारुण्यपण आले ॥ मग मुक्तीपद दीधलें ॥ कुबजा अनारिसी ॥३६॥
तेथुनी नरनारी ॥ त्या नगरी पाहती घरोघरी ॥ त्या येत देखती मुरारी ॥ भावमिश्रित ॥३७॥
कुमारी म्हणती हा धाकुटा डोळसु ॥ जाणतीया कुमारीतें दिसें पंचवीसु ॥ मदन भरीतासी प्रौढ पुरुषु ॥ पुतळा मदनाचा ॥३८॥
यौगियां चतुर्भुज सावळा ॥ शंखचक्र पद्मगदा कंठमाळा ॥ जनु देखें डोळा ॥ जैसा ज्याचा भावों ॥३९॥
नृपवरां राजपती ॥ विप्रासी परब्रह्ममूर्ती ॥ पुरानीकां शास्त्रयुक्ती ॥ माला मालमर्दनु ॥४०॥
धनुवाडेया धनोर्पती ॥ बळाडेया बळार्थीं ॥ कुंजरा सींही मूर्ती ॥ दैत्यासी दैत्येमर्दनु ॥४१॥
काळाते दिसे माहांकाळु ॥ महाक्षेत्रिया हलकालोळु ॥ धाकुटिया अज्ञान बाळु ॥ भावे समेळ मिळोनिया गेला ॥४२॥
जैसा जयाचा भावों ॥ तैसाची तयासी दिसे देव रावों ॥ मग न लगतां क्षेवो ॥ मालखडियाजवळी आलें ॥४३॥
देखिला आटोप सैन्याचा ॥ पुढें चोहटा साळेचा ॥ तेथें कुमरू नंदाचा ॥ येता जाला ॥४५॥
तेथे धनुष्य कंसाचे ठेवीलें ॥ रक्षण सुबंध नेमीले ॥ तया वीरातें नीभ्रांसीलें ॥ धनुष पाहो म्हणोनिया ॥४५॥
तंव ते म्हणति नंदकुमारा ॥ तुं नेणसी रे राया कंसासुरा ॥ येरें धनुष घेउनी येकसग ॥ कृष्ण पाहाता जाला ॥४६॥
देव म्हणें येव्हडा कंस तुमचा दारुण ॥ तो आम्हीं आईको बळियाडा म्हणउन ॥ हा काय वागवीतो (हे) पींजनु ॥ मग धनु वोढीयेलें ॥४७॥
त्याचे दोन्ही गोसें येक जाले ॥ दोनी टुकडे करुनी सांडीलें ॥ तंव राखणाईत कोपलें ॥ उठावले कृष्णरायावरी ॥४८॥
अरे अपसरा ताकपीरा ॥ अरे उधटा बहासरा ॥ तुं नेणसी धनुषाचा मारा ॥ तुज डांगाची साजें ॥४९॥
म्हणौनि उठिले हलाळ ॥ तंव गर्जीनले अंतराळ ॥ देव पाहों ठेले सकळ ॥ विमानें अंतराळी दाटली ॥५०॥
येक वेळे दाहा सहस्त्र ॥ घाये घालिती अपार ॥ मग कोपला बळीमद्र वीर ॥ तेणें हळधर प्रजीयेलें ॥५१॥
बहुतीं वेढीयलें रामा ॥ तंव क्रोध आला मेघशामा ॥ मग जाउनी साउमा ॥ त्राहाटिंता जाला ॥५२॥
वीर मारुनी पळविलें ॥ धनुषे रायाचें मोडिलें ॥ तंव कुंजरभार खवळले ॥ घे घे म्हणतिलें सकळिकीं ॥५३॥
काळ आणी माहाकाळ ॥ तें दोन्हीं कुंजर हलकालोळ ॥ ते देखोती गोपाळ ॥ तयांवरी धांवीनलें ॥५४॥
तंव मालमर्दन  जगजेटी ॥ धांवोनी बैसे कुंजरालल्हाटीं ॥ कुंभस्थळीं हाणोनि मुष्टी ॥ सीरें उफराटी पीळीतसे ॥५५॥
उपडोनियां दोन्ही दांत ॥ पाईं धरूनिया आपटीत ॥ कुंजर पळती किंकळिया देत ॥ दाही दिसा मोकळिया ॥५६॥
मोडुनी कुंजरांचे भार ॥ क्रोधें धांवीनला सारंगधर ॥ तेवेळें पळाला कंसासुर ॥ वरीले खणाहुनी पाहाअत असे ॥५७॥
मुष्टीक चाणोर माहांवीर ॥ ते बोलताती बडीवार ॥ राया राहें राहें थीर ॥ नंदकुमर मारीन मीं ॥५८॥
मालखडीयाचे माहा द्वारीं ॥ रायें केली साता खणाची उपरी ॥ मग रावो गेला तीयेवरी ॥ मग तो पाचारि तयां मालांसीं ॥५९॥
तंव चाणौर म्हणें दाताग ॥ आहो जी राया कंसासुरा ॥ आज्ञा द्यावी माहा वीरा ॥ नंदकुमरासीं भीडैन मीं ॥६०॥
रामकृष्ण दोघै वीर ॥ आणि मीं मुष्टीक हा चाणोर ॥ तयांचे गोपाळ आपसर ॥ आमचेहीं सकळ जेठी ॥६१॥
पाहे पा प्रतिवादु आमचा ॥ काईसा बडीवारू गौळीयाचा ॥ तंव कंसु म्हणें भर्वसा तुमचा ॥ आम्हासी असें ॥६२॥
आरे आमचें दळी ॥ उरलेती तुम्ही बळी ॥ म्हणें बा चंद्रमौळी ॥ राखा तुम्हासी ॥६३॥
म्हणोनि वस्त्रासहित विडा दीधळा ॥ तंव मुष्टीक चाणोर गर्जिनला ॥ ब्रह्मकटाहो आदळला ॥ पाहों ठेला स्वर्गलोकु ॥६४॥
दोघे बोलती बडीवारू ॥ अरे कृष्णा तुं धाकुटे लेंकरू ॥ नाहीं वाळला माथाचा जारू ॥ तुझा सोहदरू कां भुळला ॥६५॥
अरे तुम्हीं आमचें स्थापीलें ॥ सुखें कां रें न व्हावे उगलें ॥ परी तुमचे भोग पुरलें ॥ कवण जालें तुम्हासी ॥ गुरू ॥६६॥
अरे कान्हा वीरा ॥ तु राया कंसाचा सोईरा ॥ येणें आधारें पोट भरा ॥ कांरे मराल असतेन अवळक्षणे ॥६७॥
अरे तुं म्हणतोसी पवाडा केला ॥ वासुरू काउला मारिला ॥ तेणें गर्वे टाकिला ॥ हा ठावो आमचा ॥६८॥
अरे पाणियांतील विरूळा ॥ तो मारुन जालासी आगळा ॥ बापुडें बग मारुनिया सफळा ॥ ठकीतोसी ॥६९॥
माउसीये सोखिलें ॥ बापुडें कीरडु उतटिलें ॥ थोर नाव केलें ॥ लाजसी ना ॥७०॥
जैसा ससा आला भानवसा ॥ आतां तुं जासील कैसा ॥ शरण जा रें राया कंसा ॥ मीं तुज न मारी ॥७१॥
तुजसी जुंझता पाडु नाहीं ॥ शरण रीगै रे लवलाही ॥ तंव कृष्णरावो म्हणें सही ॥ तुं बोलत अससी तें ॥७२॥
अरे गर्वे भुळले कुंजर ॥ नेणती सिंव्हावे मार ॥ मिळाला मृकुटीयाचा भार ॥ तेणें गिरीवरू केवीचे पैं ॥७३॥
नखें खुडे काडी ॥ तेथें स्वर्गाची कवण प्रौढी ॥ आली कुरंगिनीची उडी ॥ तरी काई करी पंचाननातें ॥७४॥
शेषा विरुळया दंद पाहीं ॥ तैसी तुज मज सरी नाही ॥ हे तु बोलिलासी सही ॥ आतां साही द्यावो माझा ॥७५॥
अरे कळीकाळ धर्मकेतु ॥ मीं यादव वंशी वसुदेवोसुतु ॥ बहु बडिवार बोलतु ॥ तो साच करी आतां ॥७६॥
मग मांडिलें ठाणा ॥ ते कवतीक पाहातसे कंसराणा ॥ घाये वाजती दणा दणा ॥ जग शहाणा न करी कृष्णा ॥७७॥
ब्रह्मांडगोळकाचीया माळा ॥ साजती शक्ती जेचीये गळा ॥ ते शक्ती करकमळा ॥ तेणें लाविली असें ॥७८॥
तेथें कंस चाणौर केउता ॥ परी शाहाणा न करी सर्वथा ॥ यैसा तडवातडवी हाणतां ॥ सोडवी ती चिकाटिया ॥७९॥
चाणौर महाबळी ॥ कृष्णराणा बो तंवके मुष्टी बळी ॥ घाव हाणितला वक्षस्थळीं ॥ मग भूमंडळीं पाडियेला ॥८०॥
तंव क्रोधें पाहें भोवतें ॥ तव मुष्टीक हाणे बळिमद्रातें ॥ तोहीं हाणितला मुष्टीघातें ॥ त्या दोहिं वीरातें मारियेलें ॥८१॥
बाहे आपुटूनी गर्जीनला ॥ ठाण मांडोनी उभा ठाकला ॥ तंव केसिया उठावला ॥ तो गर्जिनला सिंहिनादें ॥८२॥
थापा लाथा हाणतु ॥ मुखें कडकडा तोडीतु ॥ मागा पुढा आडवांगी हाणतु ॥ जेवी केतु उठावला ॥८३॥
कृष्णराया आणि भळीमद्रा ॥ मारीत चावीत दोही वीरा ॥ माल मुष्टीक चाणौरा ॥ या दोघां वीरांचा मीं सूड घेइन ॥८४॥
अरे मज केसीयापुढें ॥ हे पर्वत रगडि दाढें ॥ तु रे लेंकरू बापुडे ॥ तुज मीं काय मारू ॥८५॥
तुज मीं जीतेची धरून ॥ संखळा पाई जडीन ॥ प्रतीदिनी मार करीन ॥ जेणें येमु कांटाळे ॥८६॥
यावरी कृष्ण जगजेठी ॥ वळली वज्र मुठी ॥ होणे पोटि पाळी लल्हाटी ॥ केली पीठी हाडांची ॥८७॥
मागुता हा (णित) ला चर्णघातें ॥ बाहिर काढिली पोटिची आतें ॥ तंव देखिलें वीरातें ॥ पुढें मीळतां ॥८८॥
वाजंत्रांचां गजरीं ॥ तेणें नाद उठिती अंबरी ॥ तंव भोवतां वेष्टिला माहावीरीं ॥ रामकृष्ण ॥८९॥
सकळांचा येकची घावो ॥ मागा पुढा नेदीती पावो ॥ जे जे बळार्थी माहाबाहो ॥ ते हाणती घावों मुदगलाचा ॥९०॥
त्रिशूळ लहुडी बाणवरी ॥ चक्र गदा हाणती शिरीं ॥ येक वरूषती शिळाधारी ॥ तेथें मुरारी न दिसेंचीं ॥९१॥
वज्रस्वरें श्रीकृष्ण रावो ॥ तो अवतरला देवांचा रावो ॥ तेथें मानवीयाचा कवण ठावो ॥ तो काय करील ॥९२॥
जैसी पुष्पाची पुजा होये ॥ तैसेची आंगी लागती घायें ॥ तंव वरीले खणी जाउनी पाहें ॥ कंसरावो ॥९३॥
रामकृष्ण घायातळीं ॥ ते भस्म जाले म्हणती बळी ॥ तंव गर्जीनले अंत्राळी ॥ उडोनियां ॥९४॥
हाक फुटली दोघांची ॥ तंव टाळी बैसली वीरांची ॥ शस्त्रें गळाली हाताची ॥ सांडवले वीरस्त्रीया ॥९५॥
जे प्रतापीये उभे देखिलें ॥ मारुनी चूर्ण केलें ॥ जे पळतां देखिलें ॥ ते राखिले न मारीताची ॥९६॥
पुनरपी गर्जीनले सत्राणें ॥ तंव कांठाळली देवाची मनें ॥ म्हणती दैत्या आलें उणें ॥ तेहीं वोचकलें ॥९७॥
पाताळी शेष होता दुचिता ॥ पृथ्वी उलंडु पाहें आतां ॥ म्हणें ब्रह्मकटाहो पालथा ॥ होउं पाहातु असे ॥९८॥
हाकाचिया प्रतापें ॥ कंस पडिला दुचीते ॥ उडोनी कृष्णरावो गेला अवचिते ॥ जेथें कंस होता तेथेंचि ॥९९॥
तो धांवोनी धरिला केंसी ॥ आणी आप टीला भूमीसी ॥ तंव चेतना नाहीं तयासी ॥ प्राण गेला देखतांची ॥९००॥

मग तो मेलाची मारी ॥ तंव येरा वीरासी जाली अपरांपरी ॥ तयासी आडवा रीगोनी मारी ॥ तो बळीमद्र वीरू ॥१॥
तेथें अवघेची आळे काकुळती ॥ जी शरण आलों म्हणती ॥ येक लोटांगणी येती ॥ येक धरिती दाती तृनें ॥२॥
मलखडिया भीतरा ॥ वीरु नाहीं दुसरा ॥ कृपा आली सारंगधरा ॥ नाभी रे नाभी म्हणतसें ॥३॥
मग म्हणें कृष्ण सावळा ॥ चला रें फोंडु बंदसाळा ॥ मग तोडुनियां सांखळा ॥ कवोड फोडियली ॥४॥
वसुदेवे देवकीयेसी ॥ नमस्कारु करी रुसीकेसी ॥ अहलाद जाला भुमीसी ॥ गोकुळा गुढी पाठविली ॥५॥
कंसाचीया राणीया अपत्यें ॥ नाभीकारिली समस्तें ॥ तेणें विरोधुनी आमतें ॥ हटें प्राण दीधला ॥६॥
मग नगरीचें लोक सकळै ॥ त्यासी आस्वासीतसे वनमाळी ॥ ते मिळोनीया नगरकुळी ॥ सभामंडपीं बैसलें ॥७॥
तेथें जाला जयेजयेकारू ॥ पुष्पवरुषावो करती सुरवरू ॥ वाजंत्राचा गजरू ॥ गर्जतसें ॥८॥
भाट बंदीजन वेंगाडे ॥ पढती कृष्णारायाचें पवाडें ॥ उचीत देतसें रोकडें ॥ पात्र पाहोनियां ॥९॥
मग उग्रशंनातें ॥ पाचारिलें कृष्णनाथें ॥ राज्यें पाटीं तयातें ॥ बैसविलें ॥१०॥
कृष्णरावो म्हणें उग्रसेनासी ॥ हा बोलो नाही आम्हासी ॥ बोलाउनी सोईरेंकेसी ॥ खोटें केलें ॥११॥
आम्हीं भावाचें भोक्तें ॥ म्हणोनी पाताईलो तुमतें ॥ खोटे राखिले कवणातें ॥ हे विचारून पाह पां ॥१२॥
प्रथम योगी संखासुरू ॥ वेद आलासे चोरू ॥ तया कारणें मछअवतारू ॥ जाला पाही ॥१३॥
तयासी राज्य करितां सागरी ॥ ब्रह्मयाचा घरी केली चोरी ॥ हे कुविद्या शरीरी ॥ कां उपजावी ॥१४॥
दैत्या जाला प्रसन्न ॥ हा भोला चक्रवर्ती आपण ॥ तोहीं कां अपमान ॥ देवाचा करावा ॥१५॥
दैत्य म्हणती देवासी ॥ अमृत दीजे आम्हासी ॥ म्हणोनी तयासी ॥ उडविले तेहीं ॥१६॥
रुसी मुनी महंता ॥ आणि समस्ता देवतां ॥ आणि विप्रकुळां बहुता ॥ नोळखेंची ॥१७॥
तयाचा धांवया ॥ कूर्म अवतार अमृत द्यावया ॥ चौदा रत्नें काढावया ॥ हेची कारण ॥१८॥
देवासी अमृतपान ॥ सुरापान दैत्या देउन ॥ ऐसी माव करून ॥ निभ्रांसीलें राक्षसा ॥१९॥
शंभूचे द्वारपाळी ॥ ते सेवा चुकले येकें काळीं ॥ श्राप दीधला चंद्रमौळी ॥ जन्म मृत्यलोकीं ॥२०॥
मग तीहीं विनविला महेश्वरू ॥ त्यासी उश्राप दे कर्पूरगौरू ॥ मग केला नमस्कारू ॥ जये विजये द्वारपाळी ॥२१॥
अरें जये विजये द्वारपाळा ॥ तीन जन्में दैत्यकुळा ॥ विरोधोनी गोपाळा ॥ मोक्षें पावाल ॥२२॥
अरे जो अविनाश अपरांपरू ॥ आणि जो सर्व जीवांचा दातारू ॥ सर्व सामर्थेसी ईश्वरू ॥ अवतरला म्रुत्युलोकी ॥२३॥
तयासी विरोधितां ॥ मोक्ष होईल नीभ्रांतां ॥ मागुतें त्वरिता ॥ जालें हिरण्याक्षा हिरण्यकसीपु ॥२४॥
तयासी प्रसन्न महेश्वरू ॥ तुझीया बळा ठेंगणा मेंरू ॥ ऐसा हिरण्याक्ष वीरू ॥ महाबळिया ॥२५॥
हिरण्यकशपु धाकुटा ॥ तयासी मरण नाहीं अपघाता ॥ रात्री ना दिवसा ॥ सर्वथा मरण नाहीं ॥२६॥
सजीवें ना नीर्जीवे ॥ मरण नाहीं अज्ञीभावें ॥ ऐसें माहादेवें ॥ जन्मी घातलें ॥२७॥
ऐसा महादवो प्रसन्न जाला ॥ तयासी अभीळासु कां संचरला ॥ श्रृष्टी घेउनी पळाला ॥ हिरण्याक्ष ॥२८॥
सातै पाताळे घेउनी निघाला ॥ तंव पृथ्वीनें धावां केला ॥ तीचया धांवया पावला ॥ वेषु धरुनी वराहाचा ॥२९॥
हिरणाक्ष वधुनी ॥ श्रृष्टी राखिली मेदनी ॥ कपट करितां कवणी ॥ राहिला नाहीं ॥३०॥
दुसरा हिरण्यकशिपु वीरू ॥ तेणें माझा केला अव्हेरू ॥ वांचुनी कर्पूरगौरू ॥ अणु न म्हणें वाचेसी ॥३१॥
हे कपट अविद्या काईसया ॥ करावी सुखें असें तया ॥ प्रल्हादा उद्धरावया ॥ काय कारण ॥३२॥
तो माझेची स्मरण करी ॥ येरू तयाते वारी ॥ मग पुत्रत्वें वैरी ॥ जाला तयासी ॥३३॥
पुत्राकरितां अपमान ॥ नरसिंहु प्रवला हाक देउन ॥ शिव शब्द सत्यें करून ॥ हिरण्यकशपु विदारिला ॥३४॥
ऐसें विरोधोनी प्राण दीधलें ॥ परि मोक्षमुक्ती नाहीं पावलें ॥ कवीळासी रावो बोलिलें ॥ ते नव्हेती पूर्ण अवतारू ॥३५॥
बळी राज्ये करीं सकळ ॥ त्यासी कां बुधी आठवली अमंगळ ॥ गर्वें वसविलें पाताळ ॥ अद्यापीवरी ॥३६॥
फरशरामु रेणुकानंदनु ॥ तेंणें थापिलें ब्राह्मणु ॥ त्याचें व्रत मोडुनु ॥ राज्यें करिती राक्षेस ॥३७॥
तेथें ते द्वारपाळ जाले आपण ॥ रावण आणि कुंभकर्ण ॥ त्यासी शंभु प्रसन्न ॥ दीधलें सुवर्णाचें नगर ॥३८॥
त्यासी कुविद्या संचरली ॥ रामाची सीता कां नेली ॥ तेणें लंका विभ्रंसिली ॥ स्थापिला बीभीषणु ॥३९॥
बधुनी रावण कुंभकर्ण ॥ परी मोक्ष नव्हेंची त्यालागुन ॥ तो अवतारू नव्हे परिपूर्ण ॥ सामर्थ्यासहित ॥४०॥
तिसरे जन्म द्वारपाळा ॥ ते जन्मलें वक्रदंत सुसपाळा ॥ त्याच्या मोक्षाची वेळा ॥ त्या मीची जाणें ॥४१॥
कैसें विरोधोनी फळ जोडिलें ॥ तें तुम्हासी अवघड कां वाटलें ॥ ऐसें उपदेशिलें ॥ उग्रशेनाप्रती ॥४२॥
मग उग्रशेनें केला नमस्कारु ॥ बोलविला अक्रूरु ॥ राजपाट वेगवगत्रु ॥ दीघला पाहिजे ॥४३॥
मग पुजीला उग्रशेनु ॥ आपलेनी स्वहस्तें स्थापुनु ॥ समस्ता अभये देउन ॥ मग गोकुळा निघते जालें ॥४४॥
रथीं आरूढलें राम रुषीकेशी ॥ अक्रुर उग्रशेनु पाठीसी ॥ तेजी वाटीले गोपाळांसी ॥ ते द्दष्टीसी चमकताती ॥४५॥
सकळु दळभारू चालिला ॥ नगर लोक बोळवित आलें ॥ भाटी बंदीजनी केला ॥ पुढा गजरू ॥४६॥
अहो जी कान्हा जगजेठी ॥ पवाडे वर्णिले भाटी ॥ चरणी ब्रीदाचिया वेठी ॥ अरीरायावरी ॥४७॥
ठांई ठांई राहाती ॥ कळापात्रें नृत्य करिती ॥ तेथें वोवाळणीया षडती ॥ पसाये दानें ॥४८॥
टाळ मांदळ सु (स्वर) छेंदे ॥ आळाप दावीताती श्रुतीवेदें ॥ पदें बोलतीं आनंदे ॥ कृष्णचरित्रांची ॥४९॥
ऐसा समयो कृष्णापुढें ॥ भोवतें राजकुमराचें आखाडें ॥ जैसें (काशियाचें दंडे) ॥ उग्ररूप ॥५०॥
भोवता सैन्याचा भारू ॥ वाजंत्री गर्जें अंबरु ॥ पाहाती ब्रह्मादि सुरवरू ॥ कुमर नंदाचा ॥५१॥
तेतीस कोडी देवाचा धामी इंद्र ॥ पाहो ठाकला भानुचंद्रा ॥ पवाडमल राजींद्र ॥ पुजीते जालें ॥५२॥
तंव नंदु समग्र नगरासहित ॥ तो साउमा कृष्णरायासी येत ॥ गोकुळ आनंदभरित ॥ श्रींधारिलें असें ॥५३॥
हाट हाटवटीया चौबारें ॥ गुढीया तोरणें मखरें ॥ घरोघरी वाजंत्रे ॥ गर्जताती ॥५४॥
नगर श्रींघारिलें कुसरी ॥ जेवी लोपली अमरावती नगरी ॥ पाहों ठाकलीया नरनारी ॥ सप्त खणावरी वेघोनिया ॥५५॥
तंव नंदरावो साउमा आला ॥ सकळ गौळियांसी भेटला ॥ तो समारंभु पाहो ठेला ॥ देवासहित इंद्र ॥५६॥
वाजंत्राचा गजरी ॥ रणसिंगे काहाळा भेरीं ॥ दमामे ढोल निशानें अंबरीं ॥ गर्जीनली ॥ येकवेळें ॥५७॥
उपांगें गौमुखें टमकिया ॥ टाळमृदांग श्रुती लागलिया ॥ गुंबगुबीया पटीया ॥ मोहोरी पावें ॥५८॥
दोनी दळें येकजाली ॥ वाजंत्री ब्रह्मांडे बहीरावली ॥ येकवेळें गर्जिनली ॥ भेटीसवें ॥५९॥
बापापुत्रा आलींगण ॥ ते सुखस्नेहे नेणती कठिण ॥ प्रेमें सद्नदीत मन ॥ ते खूण ज्ञानीये जाणती ॥६०॥
वसुदेवो नंद नमस्कारूनी ॥ मग वंदिली जननी ॥ सकळा आलींगण देउनी ॥ गोकुळ प्रवेशलें ॥६१॥
प्रवेशता गोकुळ ॥ लोक आनंदे पाहाती सकळ ॥ दुरुनी वंदिती करकमळ ॥ नगरनारी ॥६२॥
घरोघरी देउनी कपाटें ॥ दाटती बीदिया चोहाटें ॥ नाद उमटती गोमटें ॥ अंतराळी ॥६३॥
नंदाचिये घरी ॥ मुडपघसनी चरणचारी ॥ आरतीया नगरनारी ॥ कुरवंडिया टाकित्याती ॥६४॥
वोवाळुनी निंबलोने ॥ भुळी पडली मदनें ॥ येकी पाहाती वदनें ॥ आपणयातें न सांभाळिती ॥६५॥
ऐसा समयो प्रवर्तला ॥ देवो जाणोनी मंडपी बैसला ॥ तेथें नटारंभ मांडला ॥ नानाविध ॥६६॥
क्षण येक पाहिला विनोदु ॥ पसायेदान देतुसें गोबिंदु ॥ तंव अवचिता पडीला नादु ॥ श्रवणी देवाचिये ॥६७॥
स्वर्गाचिये आकाशपोकळी ॥ देव उतरती सकळीं ॥ शंखाचिया नादें भूतळी ॥ दुमदुमीली ॥६८॥
इंद्र देवरावो आपण ॥ तेतीस कोडी देवतागण ॥ अंतराळीचे गंधर्व दारूण ॥ येते जाले ॥६९॥
तेहीं केला पुष्पवरुषावो ॥ पुजिला तो कृष्णदेवों ॥ कवण जाणे तेथीचा भावो ॥ गौळी तटस्त राहिले ॥७०॥
समस्तां क्षेमा आलिंगण जालें ॥ परी कवणी नाहीं देखिलें ॥ रामकृष्ण पूजीलें ॥ सकळ देवी ॥७१॥
आनंदे उचंबळला ब्रह्मकटावो ॥ पूजीला देवाचा रावो ॥ तेथील खूणेचा अनुभवो ॥ ते ज्ञानिये जाणती ॥७२॥
खुणेखुण बाणली ॥ देवासी आज्ञा जाली ॥ मग नृपकुळी मीळाली ॥ देशोदेशीची ॥८३॥
ऐसा श्रीकृष्णरावो विजया जाला ॥ नगर लोकां आनंदु प्रवर्तला ॥ देवांसी सुखानंदु थोर जाला ॥ म्हणती हा पूर्ण अवतारू ॥७४॥
सकळ सृष्टी आनंदली ॥ ब्रह्मवृंदे संतोषली ॥ यौगियासी वोळली ॥ अमृतगंगा ॥७५॥
आतां राज्य करिल मेदनीं ॥ सकळ दुष्टांतें नासुनी ॥ साधु संतांतें स्थापुनी ॥ उद्धरिता जाला ॥७६॥
जप तप याग दानी ॥ तीर्थव्रतें यागयजनी ॥ न जोडे नाना आचरणी ॥ ते ये मेदनी अवतरला ॥७७॥
गिरी भारती संन्यासी दंडाधारी परमहंसी ॥ न सांपडे सिद्धसाधकासी ॥ तो देखा गौळियासी ॥ आसनी भोजनी ॥७८॥
आघोरीये क्षप्नीक ॥ जंगम शिवभक्त ॥ साहीं दरुषणें नानावेश ॥ पाहातां नातुडेंची ॥७९॥
जो साहीं शास्त्रां अगोचरू ॥ अठरा पुराणा वेव्हारू ॥ चंहुवेदा परमेश्वरू ॥ नेणवेची ॥८०॥
तो गोकुळासी अकल्पित आला ॥ लेंकुरपणें खेळता जाला ॥ ऐसा वीरळा बुझला ॥ ये संवंसारी ॥८१॥
आतां हा बाळक्रीडा आईकतां ॥ क्षाळण होये मागीला दुरीतां ॥ मनोभावें आईकतां ॥ इछिले फळ होये ॥८२॥
अज्ञाना होये मतीज्ञान ॥ ज्ञानीयां भक्ती मोक्षसाधन ॥ निपुत्रीका पुत्रदान ॥ देईल श्रीकृष्णनाथु ॥८३॥
दुर्बळा संपती होये ॥ दाळिद्याचें दाळिद्र जाये ॥ कुबुद्धीयाते होये ॥ सुबुद्धी देता ॥८४॥
आधर्मीयाते होये धर्मवासना ॥ कठीणा ये कारूना ॥ विषयलंपटासी लक्षणा ॥ येक पत्नीयाचें ॥८५॥
म्हणोनि हा बाळक्रीडा आईकीजें ॥ आणि प्रतिदिनी अनुष्टिजें ॥ जरी काईसया कष्टी होईजें ॥ तीर्थें उपवासे ॥८६॥
भावें बाळक्रीडा परिसनें ॥ येक वेळा श्रवणी आईकणें ॥ तरी सकळ तीर्थे स्नानें ॥ घडती त्या नरासी ॥८७॥
या शब्दाचा विश्वासु ॥ न धरितो केवळ पसु ॥ अव्हेरू करीतया नासु ॥ कुळगोत्रासीं ॥८८॥
परीसें तया ईतुकें होया ॥ वाची तया मोक्ष विजयें ॥ संग्रहो केल्या जाये ॥ केले महापातक ॥८९॥
बापा यादवाचीया सुता ॥ उधरण होयें नागनाथा ॥ चिंतीता कृष्णनाथा ॥ ऐसे फळ होये ॥९०॥

इति श्रीमद्भाअगवतें माहापुराणें दशम स्कंदे ॥ बाळक्रिडा संपूर्ण समाप्ते ॥९९०॥

खर नाम संवत्सरे सके ॥१५७३॥ मार्गेस्वर सुद्ध सप्तमी वार रवीवार संपूर्ण समाप्त ॥ हस्ताक्षर गणोजीचें कांसार: ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP