TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

कृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग १०

श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.


प्रसंग १०
कवणे येके वेळी ॥ यशोदा नाहानींत होती सायंकाळी ॥ रक्षा लाविली कपाळी ॥ म्हणें तुज रावो नरसिंह जीउती ॥७७॥
तंव देवो म्हणे आवो माये ॥ कैचा नरसिंह जीवुती कोठे आहे ॥ आतां सावध होउनि पाहें ॥ म्हणौनि मुख पसरिलें ॥७८॥
जांभई देत असे हरी ॥ तंव नरासिंहु जीउती उदरीं ॥ मग देखीला मुरारी ॥ ते विस्मीतें जाली ॥७९॥
म्हणें हें कवणेपरीचे लेंकरूं ॥ येणें उपजतची मारिले माहासुरू ॥ काई हा होईल परमेश्वरू ॥ कीं दैत्य दानवीं मानवी ॥८०॥
कवणे येके दिवसीं ॥ नंदु बैसला देव पूजेसी ॥ तेथें नैवेदु देवासी ॥ समर्पिला ॥८१॥
तेथें धांवोनी आला (हरी) ॥ गुळ दे म्हणती मुख पसरी ॥ येरू म्हणें बा स्वीकारी ॥ म्हणौनि मुखाभीतरी घातला ॥८२॥
सवेची सकळ देवांच्या मूर्ती ॥ त्याहीं घातल्या मुखाप्रती ॥ नंद धरावया धांवती ॥ तंव तो पती पळाला ॥८३॥
धांवोनि धरुं जाये ॥ जवं तो अद्रुष्ट होये ॥ नंदु भोंवतें पाहे ॥ तंव उभा राहे पाठीसी ॥८४॥
पुनरपी धांवोनी धरी हातीं ॥ म्हणें बा कृष्णा देव डोळे फोडिती ॥ मुष्टी आंगोळिया घालिती ॥ तवं पसरी मुखातें ॥८५॥
येशोदा मुखी पाहिलें ॥ तव उदरी त्रिभुवन देखिले ॥ सकळ देव बैसले ॥ तपती चंद्र सूर्यो ॥८६॥
गण गंधर्व किन्नर ॥ आणिक ब्रम्हादिक सुरवर ॥ राजे भूपाळ नृपवर ॥ आणि अपार गिरी पर्वत ॥८७॥
तें देखोनि माता दचकली ॥ भोवडी येउनी पडली ॥ नंदु म्हणें देवतें गिळीली ॥ ऐसें अपसर लेंकरु हें ॥८८॥
तो म्हणें काय जालें ॥ मुखाभीतरी नंदें पाहिलें ॥ तंव तैसेचि देखिलें ॥ मग लागला चरणासी ॥८९॥
म्हणें हे लेंकरू ॥ आणि हा अवतरलासें परमेश्वरू ॥ तंव दीधला हास्ये करु ॥ देवे उगळोनियां ॥९०॥
आणिक येके दिवसी ॥ नंदु निघाला आंगोळिसी ॥ दूत होतें येमुनेसी ॥ ते वरुणाचे राखणाईत ॥९१॥
नंद अरुणोदईं गेला ॥ तो दूतासी वरपडला ॥ तो धरूनी नेला ॥ वरुणाजवळी ॥९२॥
वरुण सकळ उदकाचा राजा ॥ तेणें नंदु राखिला बरविया वोजा ॥ मग वोभाट त्याचा ॥ जाळा गोकुळीं ॥९३॥
म्हणती नंदु गेला येमुनें ॥ तेथुन नेला कवणें ॥ व्याग्र जाली मनें ॥ करिती रोजना ॥९४॥
नंद गोकुळींचा रावो ॥ आता कवण करील तयाचा ठावो ॥ या कृष्णाचा गुण पाहा हो ॥ मुदल धुरुची बुडाली ॥९५॥
तेचि मांभळभटु बोलिला ॥ जो हा मुळीं लागला तो बोल साच जाला ॥ तंव हांसत धांतीनला ॥ तो कृष्णनाथु ॥९६॥
म्हणें तुम्हीं बोलतां समस्ते ॥ आतां आज्ञा द्यावी माते ॥ मीं आणिन राया नंदाते ॥ तुम्ही येथेंचि असिजे ॥९७॥
यैसें बोलोनि उडी घातली ॥ ते डोहीं बृडी दीधली ॥ वरुणाची नगरी टाकिली ॥ तंव धनवटली सभा तयाची ॥९८॥
च्यारी लक्षे मेघ माळा ॥ आणि सागर सरिता सकळा ॥ जळींची जळ देवता विशाळा ॥ बैसले तेथें ॥९९॥
सकळीकीं कृष्ण देखिला ॥ म्हणती हा परमेश्वरू केवीं आला ॥ मग रायें नमस्कारू केला ॥ बैसविला रत्नसिंहासनी ॥४००॥

मग चरण प्रक्षाळुनी वंदीती ॥ गंधाक्षता समर्पिती ॥ नाना पुष्प याती आनीती ॥ यैश्या श्रीपती पूजिला ॥१॥
मग वरुण देवो पुढें उभा राहे ॥ कर जोडुनी विनवितु आहे ॥ तु सकळांचा पिता मायें ॥ कवणा कार्यीं बीजें केलें ॥२॥
तंव कृष्ण बोलता ॥ मी परमेश्वरू अवतरलों मृत्यलोकांत ॥ वसुदेव देवकी माता ॥ तीहीं गोकुळीं ठेविलों ॥३॥
नंद आम्हीं मानिला पिता ॥ यशोदा धर्ममाता ॥ तो आंगोळी करितां ॥ सांपडला दूतां तुमचिया ॥४॥
त्या कारणें येणें जालें ॥ येरू म्हणे तरि माझें दैव उदैले ॥ तुं देवा न सांषडेसी कवणें बोलें ॥ तो तुं घर पुसत आलासी ॥५॥
साहीं शास्त्रां अठरा पुराणा ॥ चतुर्वेदा साही दरुषना ॥ तीर्था व्रता दाना ॥ तुं कवणाही न भेटसी ॥६॥
तुं परमेश्वरू निराकारू ॥ तो तु जालासी मनुषवेषधरू ॥ तुवां केला अवतारू ॥ भगत उधरावया ॥७॥
तुज गोकुळा येणें जाले कंसा कारणें ॥ दैत्यें राक्षेस वधणें ॥ राखणें साधुसंतातें ॥८॥
देवा तुं व्यापकु सर्वीस्वरू ॥ पाहतां तरि निराकारू ॥ तुबा केला अवतारू ॥ भक्ताकारणें ॥९॥
एवा तुझिये घरीची कामारी ॥ ते अनंते ब्रह्मांडे आकारी ॥ आणि ब्रह्मा आनतें त्रिपुरारी ॥ तेणें अपमानिलें ॥१०॥
देवा तुवा धुरूं अढळपदी बैसविला ॥ आणि अळर्काचा ताप दूरी केला ॥ द्वारपाळा श्राप दीधला ॥ येणें महादेवें ॥११॥
त्यासी उद्धरावया कारणें ॥ आणि कंसासुरा मुक्ती देणे ॥ पांडवांचा प्रतिपाळ करणे ॥ स्थापने ऋषी आश्रम ॥१२॥
दैत्यीं गांजिली वसुंधरा  ॥ तीवरी दुष्टा दुर्जनाचा भारा ॥ म्हणउनी आवतारा ॥ केल देवराये ॥१३॥
तुं भक्ती मुक्ती दायकु ॥ आणिया येकवीसां स्वर्गांचा नायकु ॥ आम्हा सकळांचा पाळकु ॥ तुंची देवा ॥१४॥
म्हणउनी येणे जाले ॥ आतां करी विंदाणे ॥ राक्षस दैत्ये निर्द्राळणे ॥ उद्धरणे यादवकुळ ॥१५॥
मीं देवा तुझाची स्थापिला ॥ आणि तुं देवा सकळ देवांचा बापुला ॥ सकळ जीवासी येकला ॥ तुंची मातापिता ॥१६॥
देवा तुवां मनुष्येरूप धरीले ॥ जन नोळखेची भुळले ॥ माझे अनुचित जाले ॥ ते क्षमा करावें जीं ॥१७॥
त्राहे त्राहे गुणनिदाना ॥ म्हणौनि वरुण लागला चरणां ॥ तैसेची नंदाची संमोंरवना ॥ केली वरुणें ॥१८॥
नंदा राया तुवां पूर्वीं कवण दैव केले ॥ जे परब्रह्मे पुत्रत्वें स्वीकरिलें ॥ येणें कोटी कुळे उत्धरिलें ॥ जगीं तुंची धन्यें ॥१९॥
हे त्रिभुवन जयांचा उदरीं ॥ तों लेंकरूं होउनी खेळे घरी ॥ आतां मजवरी कृपा करीं ॥ कोप न धरावा ॥२०॥
मग उठिले कृष्णनाथु ॥ तंव समस्ती केला प्रणिपातु ॥ तेथे क्षण येक न भरतु ॥ आले गोकुळांसीं ॥२१॥
तेथे नगरीच्या लोकांसीं उछावो जाला ॥ म्हणती नंदु कृष्णे आणीला ॥ जनु विस्मित जाला ॥ नंदासी कळदा हा परमेश्वरू ॥२२॥
मग नंदु म्हण येशोदेप्रतिं ॥ मज नेले वरुणाचा दूतीं ॥ यैसा कवणु आहे क्षितीं ॥ जो मज सोडविल ॥२३॥
तेथें कृष्ण आला ॥ वरुणें स्वकरीं पुजीला ॥ चरणा लागोनी संतोषविला ॥ मग वर्णिला बहुवसु ॥२४॥
आमतें हीं बहुतां रीतीं ॥ वरुणें केली विनंती ॥ हा अवतरला कैवल्यपती ॥ कवणाप्रति न सांगावा ॥२५॥
आणिक येके वेळी ॥ दुध उतलें प्रात:काळीं ॥ ते न सावरेची उकळीं ॥ तेथें वनमाळी धांवीनला ॥२६॥
दूध वोरपे जळत जळतां ॥ बा पोळसी म्हणौनी धांवे माता ॥ तंब तो न र्‍हाहे वारितां ॥ उचलुनी तोंडी लावीयेलें ॥२७॥
मग चुलीवरी भांडे ठेविलें गोपीनाथें ॥ तंव तें भरलें असे मागतें ॥ यैसें पवाडें अनंतें ॥ गोकुळीं केलें ॥२८॥
गुसलितां धांबें जवळीकें ॥ तंव माता भेडसावी कवतीकें ॥ जातां देखिलें. पानीयां मातेतें ॥ मग कृष्ण रीगाला डेरीयांतु ॥२९॥
कृष्ण बाहेरी गेला म्हणोनी तांतडी ॥ येशोदा गुसळी लवडसाडी ॥ तवं नवनीताचिया कोडी ॥ अगनीत सांचीनलीया ॥३०॥
मग सकळां मिळोनि गौळणी ॥ भरील्या असती रांजणी ॥ वीस्मो करिताती मनी ॥ आजी ऐसें केवीं जाले ॥३१॥
तंव तो मुरारी ॥ निघाला डेरिया बाहेरी ॥ माता विस्मो करी ॥ सीनलासी बा म्हणोनीयां ॥३२॥
आतां खेळों जाईल बाहेरीं ॥ चोरी रीघें घरोघरी ॥ राखन बैसती घरोघरी ॥ कोंडीती नारी घरामाजी ॥३३॥
म्हणती सांपडला गे हरी ॥ तंव तो बैसला सींकीयावरी ॥ दही दूध कवणेपरी ॥ दोहीं करी खातु असे ॥३४॥
येकी धांउनीं धरिती चरणी ॥ आफळीती धरणी ॥ तो उठोनि जाय पळोनी ॥ घराबाहेरी ॥३५॥
येकी म्हणती जाउ द्या गे परता ॥ तंव दुसरा देखती खाता ॥ अगे हा कवण्या वाटा मागुता ॥ आला असें ॥३६॥
तोहीं धरुनियां मागुता आफटीला ॥ तंव तीसरा देखिला ॥ तोही उत्तरिला ॥ तंव देखिला चौथा ॥३७॥
यैसा कृष्णची विस्तारला ॥ त्याचा बोभाट येशोदेपासी नेला ॥ तंव तो पालखांत निजैला ॥ परिये देत येस्वदा ॥३८॥
म्हणती दहीं दूध नवनीत ॥ माय खादलें गे बहुत ॥ तंव येशोदा म्हणे पाळनीयांत ॥ निजैला पाहीं ॥३९॥
त्या मागंत्या घरा जाती ॥ तंव दही दूध तैसेंचि देखती ॥ मग म्हणती हा श्रीपती ॥ कौसाल्येमलु ॥४०॥
यैसाची घरोघरीं ॥ बोभाट आणीती नगरनारी ॥ मग येशोदा बांधे हरी ॥ दावयानें ॥४१॥
त्याचा पावो बांधोनि करें ॥ तंव ते दावें पायासी नुपुरें ॥ मगा आणि दुसरों ॥ तेहीं नुपुरे वोढ पावो ॥४२॥
आनीक दावीं मेळउं जाये ॥ तंव तो पावों वाढतुची आहे ॥ मग दामोधर नाव होये ॥ या पासुनियां ॥४३॥
ऐसा गोकुळी खेळीनला लीळा ॥ तंव नंदु म्हणे हा नव्हे भला ॥ म्हणोनियां वासुरवांसांगातें दीधला ॥ गोवळे सांगाती दीधले ॥४४॥
तंव कंसें म्हणितले वीरांसी ॥ कृष्ण असे तो वासुरवांपांसीं ॥ कांहीं चींता रे तयासी ॥ जेणें मरण पावें ॥४५॥
तंव म्हणें पावक वीरू ॥ मीं करीन त्याचा संव्हारू ॥ बहत नोबलें बडीवारू ॥ म्हणोनि तेणें विडा घेतला ॥४६॥
तो येमुनेचे पाबळीं ॥ खेळत होता वनमाळीं ॥ वासुरवें आणि गोवळी ॥ सवें असती ॥४७॥
तेथें पावक प्रज्वळला ॥ तो वोनवा आकाशीं लागला ॥ वन जाळित निघाला ॥ कृष्ण रायावरी ॥४८॥
वत्सें गोवळीं सकळी ॥ त्यांची करावी जव होळीं ॥ तंव कृष्णें पीटुन टाळी ॥ ना भी म्हणतो सकळांसी ॥४९॥
मग कृष्णें मुख पसरौनी धांवीनला ॥ बोनवा समग्री गिळिला ॥ गौळिया बीस्मों जाला ॥ म्हणती हा कान्हों भला सांगाती ॥५०॥
यैसा पावकु गिळिला ॥ तंव कंसासुरा दचकु पडीला ॥ आतां हा नव्हे भला ॥ चिंतावला तो रावो ॥५१॥
तंव बगासुरें माहावीरें ॥ बोलिला प्रतिवादाचीं उत्तरे ॥ उडी घातली येकसरें ॥ बाहे आफळुनी धांवतु असे ॥५२॥
म्हणें मज कोपल्यां बगासुरा ॥ गिळीन सप्तांहीं सागरां ॥ फुटाने करीन डोंगरा ॥ तेथें त्या लेंकुरा कैचा ठावो ॥५३॥
मग म्हणें कंस केसिया ॥ तु आमचां गा बाहीया ॥ (मग म्हणे) हे कार्य सखया ॥ करी आतां ॥५४॥
हात विडया वोडवीला ॥ येरें आदरेंची दीधला ॥ मग आज्ञा घेउनी निघाला ॥ तो आला यमुनातीरासी ॥५५॥
तेथें वत्सें गोपाळांसी ॥ खेळतसें रुषीकेसी ॥ बगु ध्यान धरुनी जाला तापसी ॥ निश्चित निर्मळ ॥५६॥
नेत्र उघडुनि पाहे वास ॥ म्हणें जवळी येतांची करीन ग्रास ॥ तंव वोळखिले त्या कपटियास ॥ तेणें कृष्णनाथे ॥५७॥
म्हणें हा बगासुरू ॥ आला असैल आमचा संहार करूं ॥ म्हणें हे बापुडें पाखरुं ॥ कां मरणा धरणे बैसले असे ॥५८॥
तंव श्रीकृष्ण जवळी गेला ॥ तंव तो मुख पसरोनि धांविनला ॥ येरें येतांची लक्षीला ॥ तो हाणितला चपेटघोंत ॥५९॥
तेणे  गेला तो चांचरी ॥ तंव कृष्णें मागुता धरिला झडकरी ॥ चांचु धरुनी उभा चिरी ॥ करी दोन सकलें ॥६०॥
बगासुर मारिला देखोन ॥ कंसासुरें झाडीलें दोन्ही कान ॥ आतां मांडले निर्वाण ॥ यातें कवण आकळील ॥६१॥
मग कंस म्हणें वीरांप्रती ॥ वीरश्रीया कोठें न माती ॥ देसवळी ते खाती ॥ आंती कवणी न येति कामासी ॥६२॥
अरे या गवळियाच्या लेंकरू ॥ याचें माथाचा वाळला नाहीं जारू ॥ तेणें मारिले सकळ वीरु ॥ कवणा संव्हार याचा नव्हेंची ॥६३॥
गाडीये भ्याड जीतुके असती ॥ ते लटिंकाची मठारा धरिती ॥ मज ठकुनी खाती ॥ आतां येकुही कामा नये ॥६४॥
हा शब्द कंस बोलिला भेदकु ॥ तंव जलपला तो धेनुकु ॥ म्हणे मज कोपला या मृत्यलोकु ॥ आहारा न पुरें ॥६५॥
मीं शिंगें रोउनियां क्षिती ॥ करीन पृथ्वी पालथी ॥ कीं मेरु शिखरें परती ॥ दूरी सांडुं ॥६६॥
कीं भरू सागराचा घोटुं ॥ किं काळ महाकाळाते अपटु ॥ कीं सकळांतें लाटु ॥ निवाड न करितां ॥६७॥
तंव कंसासुर म्हणें भला रें भला ॥ तुझा प्रतिबाद आतां कळला ॥ तो बहुता रीती सन्मानिला ॥ मग तो पाठविला गोकुळासी ॥६८॥
तंव धेनुकु विचारी मानसीं ॥ नवलक्ष गोधनें या नंदासी ॥ मीं असैन त्या कळपेंसीं ॥ बसवा होउनी ॥६९॥
मग नंदाचे राउळीं ॥ प्रवेशला साईंकाळीं ॥ तवं देखिला वनमाळी ॥ खेळतां अंगनीं ॥७०॥
कुरुळा करावयालागुनी ॥ वरी मान घाली जाउनी ॥ येरे वोळखिला ततक्षणीं ॥ तो दूरुनीची हाकीला ॥७१॥
येउ धांवीनला वरी ॥ आणि थडका हानीतला उरावरी ॥ तेणें दणदणाट उठिला अंबरी ॥ नादें धरत्री थरारिली ॥७२॥
आणि शिंगाचेन चपेटघातें ॥ काढुं पाहे कृष्णाची पोटीचीं आतें ॥ तंव देवराये हाणितलेंनी घातें ॥ तेणें त्यासी मृछेना आली ॥७३॥
पुनरपी हाणितला वर्मी ॥ पुसीं धरूनी उचलीला गगनीं ॥ घडी येकी भोवोंडोनी ॥ धरणीयेवरी आफटिला ॥७४॥
वधुनी धेनुकु वीरु ॥ तंव नंदु म्हणें अपघातु चुकला थोरू ॥ हा बळिया नंद कुमरु ॥ धेनुकु वीरु सामान्य नव्हे ॥७५॥
तंव कंसें ऐकिली मातु ॥ विजया जाला नंदसुतु ॥ सकळ जन विस्मों करितु ॥ थोर पुरुषार्थ या बाळकाचा ॥७६॥
कंस पाहे जवं वास ॥ तंव क्रोध आलासे सकटासुरास ॥ कृष्ण मारितां प्रयास ॥ कायसेया लागती ॥७७॥
तो खेळतो गाडीयाचा खेळू ॥ मेळउनी गोबळांचा मेळु ॥ तयां मीं होईन चक्रतळु ॥ मग तो भुपाळु सींतरीन ॥७८॥
यैसीं पैजा बोलोनीं निघाला ॥ गोकुळी (गाडा) होउनी राहिला ॥ तेथें श्रीकृष्ण खेळतु आला ॥ तंव तो वोळखिला सकटासुरु ॥७९॥
विचारी मनाभीतरी ॥ हा कृष्ण बैसला मजवरी ॥ मीं उलथोनीं त्याची करीन चुरी ॥ काय करील त्याचें बळ ॥८०॥
त्याची कृष्णें माव जाणोनि ॥ वरी बैसला धांवोनी ॥ भारे कडाडीली मेदनीं ॥ चक्रे दोन्ही चूर्ण जाली ॥८१॥
उदरीं पृथ्वीसारिखि अपारें ॥ तेथें कैसेनी तरावें सकटासुरें ॥तो चरणघोंत करूनी पुरें ॥ मात मथ्रुरे गेली देखा ॥८२॥
भारे फुटला सकटासुरु ॥ मग चिंता करी कंसासुरु ॥ इतुका आमचा परिवारू ॥ परी येकुही धडु नाहीं ॥८३॥
तंव प्रळंब म्हणें कंसासुरा ॥ मीं आंत्राळीचा प्रळंब दुसरा ॥ माझ्या धुधुदकारा ॥ पुढें न धरती कवणी ॥८४॥
मज आज्ञा दीजे ॥ आणि माझें कवतीक पाहिजें ॥ तंव मानवलें कंसराजे ॥ येणें काजें बहुते केली ॥८५॥
तो प्रवेशला गोकुळामाझारीं ॥ तंव नंदे बळीभद्र केला सा (हा) कारीं ॥ या कृष्णाचा कंसु वैरी ॥ याजवळी तुवां असावें ॥८६॥
मग रामकृष्ण दोघेजन ॥ वडजा वांकुडा सुदामा जाणा ॥ वत्सें राखती येमुना- ॥ तटीं खेळत होते ॥८७॥
प्रळंब विचारी मनीं ॥ यासी पाठीराखा बळीभद्र होउनी ॥ हे दोवे क्षत्रियां सिरोमणीं ॥ आतां येकुची वुडोनी नेउं गगनां ॥८८॥
अवचिता पडिला वरी ॥ वाहांटुळी भोंवें चक्रांकरी ॥ सीळा सीखरें गगनावरी ॥ उडौनी जाती ॥८९॥
म्हणती बळीमद्र गेला रे गेला ॥ तो वायोचक्रीं पडिला ॥ तंव कृष्णनाथु उडाला ॥ तेणें धरिला धांवोनीं ॥९०॥
मीठी पडिली प्रळंबाचे कंठी ॥ मग कुंडी नीर्जीउ होउनी पडिली हंटी ॥ (?) ॥ बलिमद्र जगजेठी ॥ विजया जाला ॥९१॥
सांगीतलें कंसाप्रति ॥ आणि दु:ख प्रर्वतलें त्यांचा चित्तीं ॥ जे जे नांवांचें सूर जाती ॥ तितुकें गती पावलें ॥९२॥
आतां कवणु आहे जुंझारू ॥ तेणें मारिले नांवनीगे वीरू ॥ आतां उरला नुसधा केरू ॥ मुदले धुरेवांचौनिया ॥९३॥
हे वचन ऐकिलें ॥ जैसे अग्निवरि तेल पडीलें ॥ तैसे देह धडाडिलें ॥ आघासुराचें ॥९४॥
म्हणें राया बोलिलासी उणे उतरा ॥ सरी करितोसी सिंहा आणि कुंजरा ॥ नखा आणि हातीयेरा ॥ केवि सरी पडु होये ॥९५॥
डोंगरा आणि वारुळा ॥ शेषा आणि विरुळा ॥ येकु सागरू ना नदी सकळा ॥ काय करावी या राया कंसा ॥९६॥
मीं येकलाची आघासुरू ॥ सकळ तुझा परिवारू ॥ आतांचि नंदाचा कुमरू ॥ गिळीन पां गौवळयांसहित ॥९७॥
ऐसें बोलोनि निघाला ॥ वृदावनीं मार्गीं राहिला ॥ मग महा पर्वतु वाढींनला ॥ देखिले तेणें कृष्णनाथें ॥९८॥
तेणें मुख पसरिलें विशाळ ॥ पाठी दिसे पर्वतमाळा ॥ डोंगरु कडा फांपत मौंजाळ ॥ तैसें उदर दिसत असे ॥९९॥
तंव वांसुरवांची मोहोरी आली ॥ ती आगासुराचा मुखी प्रवेशली ॥ तंव गोवळी देखोनि भुळली ॥ म्हणती हा सर्प की डोंगरू ॥५००॥

नवलक्ष व सुरवें भीतरी गेली ॥ त्यासवें पांचशतें गोवळेंही रीगाली ॥ तवं कृष्णानाथें माव देखिली ॥ माझी गिळीली वासुरवें ॥१॥
तो कृष्णरायाची वाट पाहे ॥ मुख पसरीलेची आहे ॥ मग देवे पीटोनी बाहे ॥ म्हणें राहे रे राहे कपटिया ॥२॥
जरी तुज लात हाणोनी मारूं ॥ तरी माझयांचा होईल संहारू ॥ ऐसे विचारुनी सर्वेश्वरूं ॥ उदरीं प्रवेशला ॥३॥
जैसे संसारामाजी अवत्रोनु ॥ उद्धरील भक्तजनु ॥ तैसे तया सर्पमुखामाजा रीगोनु ॥ आपुली रक्षिता जाला ॥४॥
तंव आघासुरें मुख बैसविलें ॥ तेथें गोपाळी कृष्णातें देखिलें ॥ म्हणती देवा हे काई जाले ॥ काकुळिती झोबीनली गळीयासी ॥५॥
तंव कंसु थोर हरिकेला ॥ म्हणें कृष्ण आघासुरे गीळीला ॥ दैत्या मनी हरीकु जाला ॥ म्हणें हा बुद्धीया भला आघासुरू ॥६॥
देव पाहती अंतराळी ॥ तेही पीटली येकी टाळी ॥ आतां दैत्यातें आकळी ॥ येसा कवणु असें ॥७॥
म्हणती हा पूर्ण अवतारू ॥ करावया दैत्यांचा संहारू ॥ अवतरला सर्वेश्वरू ॥ तो या आधासुरें गीळिला ॥८॥
ऐसी देवासी चिंता करितां ॥ तंव गोवळे म्हणती जी कृष्णनाथा ॥ (आता आम्ही न वाचो समर्था) ॥ तुजकरितां गेलों जीवें ॥९॥
देखत देखतांची आम्हीं आंधळें जालों ॥ तुझिये संगती बुडालो ॥ आजी ठकलो ॥ बहुता दिसा ॥१०॥
येक म्हणती तुं बळीयाडा ॥ म्हणोनि निघालों या सर्पमुखांपुढां ॥ कृष्णाभोंवता वेढा ॥ पढिला गोपाळांचां ॥११॥
येक म्हणती बा तुज असतां ॥ कासया लागैल चिंत्ता ॥ तुंची राखता मातापिता ॥ आमचा तुं ॥१२॥
यावरी हांसोनि देवो म्हणें ॥ नाभी नाभी क्षण एकु राहणें ॥ मग काय केलें तेणें ॥ तो आईक पां ॥१३॥
भीतरी वाढीनली कृष्णमूर्ती ॥ तेणें दैत्यांचीया कडाडीलीया अस्थी ॥ खुंटली मनपवनाची गती ॥ श्वास उश्वास कोंडला ॥१४॥
करूं जाये चळण वळण ॥ तंव जड जाला पृथ्वीहुन ॥ उदरीं जाला अती गहण ॥ उदर तडाडुनी उतटिलें ॥१५॥
आघासुरें आत्मा सांडिला ॥ कृष्ण परमात्मा बाहेरी निघाला ॥ वत्छे गोपाळां आनंदु जाला ॥ देखिला आघासुरू ॥१६॥
प्राण त्याचा असे गेला ॥ परी न पहावें गोपाळां ॥ पुसांपासोनी माथा मोवीला ॥ तंव सत योजनें ॥१७॥
उंच योजनें एका ॥ कोस तीन पसरलें मुख ॥ दांत कोस कोस विभ्रंश ॥ डोळे आरक्त विशाळ देखा ॥१८॥
यैसा भयानक रूप देखौनी ॥ देव आनंदले गगनीं ॥ विजया जाला चक्रपाणी ॥ पुष्पें वरीसौंनी नमियेला ॥१९॥
देवांसी उछावो जाला ॥ दैत्यांसी वचकु पडीला ॥ येव्हढा दैत्यें जेणें उतटिला ॥ तो सामन्य नव्हे ॥२०॥
तंव कंसें पीटीले लल्हाटु ॥ सकळीक करिती बोभाटु ॥ (म्हणती) कृष्ण आदटु ॥ नागवे आंम्हां ॥२१॥
मग कृष्णाचें सामर्थें पाहावया ॥ पाठविलीया नंद राया ॥ वेंठी वळावया ॥ वाळूवेचिया ॥२२॥
घागरीये कोहळे ॥ न फोडीता काहाडीजे घागरीवेगळे ॥ नातरी पैज हरविली गोपाळे ॥ ऐसे जण पां ॥२३॥
ते देखोनी चिंतावला नंदुराज ॥ हे कोडें न नुगवे मज ॥ ऐकोनी बोलिला पैजा ॥ तो कृष्णनाथु ॥२४॥
नंद मोवी कोहाळें ॥ तंव ते केलें घागरीवेगळे ॥ वेंठी वळुनियां गोपाळें ॥ वाळुवेचीया पाठीविलीया ॥२५॥
तंव कंसु जाला चिंताग्रस्तु ॥ पवाडे करुनी अनंतु ॥ प्रकटली हे मातु ॥ त्रिभुवनामाझारी ॥२६॥
आतां गाई चाराबया ॥ जात असें नंदाचा कान्हया ॥ पांच शतें गोपाळ मिळोनियां ॥ जात असें वासरूवें चाराबया ॥२७॥
कृष्णातें विनविलें गोपाळी ॥ या खेळों चेंडू फळी ॥ गाई सोडु यमुने पाबळी ॥ चेंडुफळी खेळों आदरिली ॥२८॥
वडजा वांकुडा पेंधा सुदामा ॥ ते म्हणती तुं नागवेसी आम्हां ॥ आम्हा समस्ताचा समा ॥ तुं येकलाची होयें ॥२९॥
तरि देवो म्हणें आधीं डावो आमचा ॥ गोपाळ म्हणती चेंडू झेळुं तुमचा ॥ तरि होई रे सावचिता ॥ टोंला झेला रे गोपाळ हो ॥३०॥
मग हाक देऊनी गर्जिनलें ॥ येक बाहे आफटोनी मांडले ॥ येक डागा झेलीत पावलें ॥ राहिलें ठाई ठाई ॥३१॥
टाकिती कांबळी ज्ञेळिती डागा ॥ म्हणती हाण हाण गा रंगा ॥ फळी धरुन वेंगा ॥ वोथरलें समस्त ॥३२॥
तंव चेंडु सत्राणें हाणितला ॥ त्या टोल्याचा तडकु गर्जिनला ॥ तो चेंडू गगना उसलला ॥ आकाशमार्गें जातुसें ॥३३॥
चेंडुवाचा झुंजकारू ॥ तेणें कान जालें बहिरू ॥ तो नाद येक पाहरु । यैकतचि होतें ॥३४॥
चेंडु गेला आकाशमार्गें ॥ तंव गोपाळ धांवती वेगें ॥ चेंडुवाचेनी मार्गें ॥ तंव चेंडु वेगा गेला देखा ॥३५॥
चेंडु अडकला कळंबाचे डाहळी ॥ यमुनेचा डोहो भोवे तळी ॥ तो भोंवरा खळाली ॥ (महा) भयासुर ॥३६॥
तंव ते वृक्ष अपार ॥ दिशा पडिला अंधकार ॥ ते डोही विखार ॥ काळया असें ॥३७॥
तो सहस्त्रमुखी महाकाळु ॥ तो डोहीचें केवळु ॥ लोक उपद्रवीले सकळु ॥ त्याचिया परिवारें ॥३८॥
ते डोही श्वापदे न (जाती) जाली ॥ त्या काळयाते देखोनी पळाली ॥ मग अभये देउनि अस्वासीली ॥ त्या काळयानें ॥३९॥
गोवळें म्हणती हरी ॥ चेंडु आडकळा कळंबावरी ॥ आणि हा डोहो वीखारी ॥ भरला असे ॥४०॥
तेथें काळया विखारु ॥ ये डोही नांदतो राज्यधरू ॥ हे उदक नये स्वीकारु ॥ धुदकार नाईकवें जी ॥४१॥
तंव कृष्ण म्हणें सवंगडयांप्रती ॥ येणें उपद्रविले क्षिती ॥ याचा पराक्रम किती ॥ सांडुनी जावों ॥४२॥
म्हणोनि देव वेघला वरी ॥ चेंडु न पावे त्याचें करीं ॥ मग तो पडिला भोंवरी ॥ येमुनेचा ॥४३॥
चेंडुबासरीसी उडी घातली ॥ तंव चेंडु जात देखिला पाताळी ॥ तंव तेणेंचि मार्गे वनमाळी ॥ जातो नि:संग परियेसा ॥४४॥
चेंडु पडिला काळाचे भुवनीं ॥ तेथें वरपडल्या सेखाचिया नागीनी ॥ तंव त्या विस्मो करिती मनी ॥ चेंडु नवरत्नीं शोभतसें ॥४५॥
तंव मागाची देखिला नंदकुमरू ॥ म्हणती तूं कवणाचें रें लेंकरू ॥ येथें काळया विखारू ॥ त्या वरपडा होसील तुं ॥४६॥
तंव म्हणती सेखाचिया राणीया ॥ वेगी पळ रें तान्हया ॥ तों तुज न सोडी देखिलिया ॥ पळ वेगीं ॥४७॥
तंव देव म्हणें सुंदरी ॥ माझा चेंडु देई कां वो झडकरी ॥ नेंदी तरी मुखें चीरी ॥ काळयाची ॥४८॥
तंव हांसोन बोलती बाळया ॥ म्हणती अरे मूर्खां गोवळया ॥ मरावया ॥ कां धरणें बैसलासी ॥४९॥
अरे तुं मानवीयाचें लेंकरुं ॥ धाकुटेंची आणी सुकुमारू ॥ आणि हा विष्णुचा अवतारु ॥ क्षीरसागरीचा ॥५०॥
हा महाकाळ ॥ याचे मुखीहुनी निघती जाळ ॥ वीखाचे कलोळ ॥ मुखें सहस्रें ॥५१॥
तंव कृष्ण म्हणती आलों याचि कारणें ॥ मज त्यासी संव द्दष्टी होणें ॥ सरन आलीयां राखणें ॥ कां सीक लावणें दुष्टासी ॥५२॥
ऐसा शेषे शब्द आइकीला ॥ तंव काळया तेथुनी बोलिला ॥ आतां जीवदान तुजला ॥ दीधलें पळ वेगी ॥५३॥
अरे चेंडू देई कां संग्राम करी ॥ आसरा धरूनी बोलती थोरी ॥ धड शब्द नाहीं मुखाभीतरी ॥ उदरीं वीसें वसे ॥५४॥
ऐसे तुं बाहें अभ्यंतरी खोटें ॥ तुझें उदरी भरले काळकुटे ॥ हात पांयें नुसधे थोटें ॥ तोंडें लाठें दुजीभें तुं ॥५५॥
तुं तोंडीचे रे बासर ॥ आणि दुजींभों रे अपसर ॥ स्त्रीयाचेनी आसर उतर ॥ बोलसी चावटा ॥५६॥
अरे माझा चेंडू राखसी ॥ आणि मजच मारीन म्हणतोसी ॥ आतां कळेल रे आम्हासीं ॥ तुं जीवासीं मुकसील रे मुर्खा ॥५७॥
अरे तुज सीक लावया वीखारा ॥ मजहुनी नाही रें दुसरा ॥ मग तो खवळला या उत्तरा ॥ म्हणे रे धरा रे धरा गीळीन सगळाची ॥५८॥
सहस्रमुखें पसरोनी ॥ प्रजळला मुखीचा अज्ञी ॥ हाणत असें सहस्रफणी ॥ येरे धरूनी आफटिला ॥५९॥
मग खवळला महाकाळु ॥ पुनरपि गीवसीला गोपाळु ॥ सेष उचलोनी अंत्राळु ॥ पुनरपी आपटिला ॥६०॥
परी तो न दाटें आदटु ॥ सहस्रमुखी वसें काळकुटु ॥ कृष्ण वज्रस्वरिरी चोखटु ॥ न चलें कांहीं तयाचें ॥६१॥
झोंबताती वर्मा वर्मीं ॥ दोघै कोंदले धुर्मी ॥ तो सेवक तो स्वामी ॥ दोघां सरी केवी होये ॥६२॥
सेषु धांवोनी हाणें मुगुटीं ॥ येरें नखें रोउनी कंठी ॥ भोवंडौनी आपटी ॥ पुनरपी उठी मागुता ॥६३॥
न कळेचि तो मुरारी ॥ मग वेठीला समस्त विषारीं ॥ नखी:बोटी: कंठी: उरीं: सीरीं ॥ कानी झोंबीनला ॥६४॥
हातीं पाईं पडिली मीठीं ॥ सेष झोंबे कंठीं मुगुटी ॥ सर्वांगी पडली वेंठीं ॥ नेत्रीं कानीं सीरताती ॥६५॥
तंव कृष्ण म्हणें काळयातें ॥ तुज मज जुंझ होतें ॥ ते धांवीनली समस्तें ॥ मीं यातें न मारीं जाण ॥६६॥
पळों दे परिवारें परिवारू ॥ तुं मीं मुदल धुरू ॥ मीं न मारीं हा केरू ॥ येईल आतां गरुड माझा ॥६७॥
म्हणौनी नांवेंक उगाची राहिला ॥ मनीं गरुड आठविला ॥ तंव येरू पवनवेगें आला ॥ वारा पडिला गरुडाचा ॥६८॥
सर्प होते ते पळोनी गेले ॥ येक भूमीमाजि रीगाले ॥ जै सांपडले ते धरिलें ॥ मग धरिलें काळयातें ॥६९॥
तो चीरौनी टाकावा जवं वरी ॥ तंव वारीता जाला मुरारी ॥ कृष्णरावो पुंसी घरी ॥ मग मुखें करी वेगळाली ॥७०॥
देवराये दपटीले कंठनाळा ॥ तंव तो म्हणें हरी गोपाळा ॥ मग सोडौनी जाला वेगळा ॥ स्मरण करित असें ॥७१॥
नेर उघडुनि पाहिलें ॥ तंव रूप प्रकाशवंत देखिलें ॥ मग म्हणें म्या वोळखिलें ॥ रूप तुझें ॥७२॥
जी जी देवा जेधवां गरुड आला ॥ ते संगें मीयां वोळखिला ॥ मीं सेषु तुमचा कीं आथीला ॥ देवा मीं भुललो संसारा येउनी ॥७३॥
गरुडा शेषा आईक्य जालें ॥ मग कृष्णातें विनविलें ॥ मज तुवां खेळविलें ॥ लेकरूंपणें ॥७४॥
तुं सकळांचा दातारू ॥ ब्रह्मा जाणें सृष्टी करूं ॥ तो तुझें लेंकरूं ॥ तेथें पाडु कवणांचा ॥७५॥
अगा तुं अविनासु अपरांपरू ॥ तुझेंया रूपाचा नकळे निर्धारू ॥ रूसी मुनी दिगांबरू ॥ निर्धार नेणतीची पैं ॥७६॥
देवा शास्त्रा पुराणा ॥ वेवादु लागला साही दरुषणा ॥ आपलालीया मती प्रमाणा ॥ आनु पाहाती ॥७७॥
येकवीस स्वर्गैं पाताळें ॥ तुझें रूप या वेगळें ॥ कवणें दैवं केलें गोकुळे ॥ रूप सांवळें खेळवीताती ॥७८॥
धन्य धन्य ते गोकुळु ॥ जेथें पर दैव रांगें तें बाळु ॥ म्हणें मीं पापीया अमंगळु ॥ तुं कनवाळु देवराया ॥७९॥
माझिया पुण्या नाहीं भिती ॥ तुं घर पुसत आलासी श्रीपती ॥ यैसी करितां आस्तुती ॥ पुरें म्हणें भागलासी ॥८०॥
तंव कृष्ण म्हणें काळया वीषारा ॥ मीं जरीं तोंडे फुंकीन वारा ॥ उडोन जाईल वसुंधरा ॥ तेथें तुझा पाडु कवणु ॥८१॥
जारे जयांचे जैसे बळ ॥ तैसाची खेळें खेळ ॥ ये सृष्टीसी न पुरे माझे करांगुळ ॥ तुं वृथ्या भुळलासी ॥८२॥
तुं जुंझता भागलासी ॥ तंव येरु म्हणें मीं नेणेचीं ॥ जगन्नाथे मज न्यावें जीं ॥ आपुलया गोकुळा ॥८३॥
यैसें येथें वर्तलें ॥ तंव येरीकडे काय झाले ॥ गोवळे सांगावया गेलें ॥ नंदा येशोदेसी ॥८४॥
हे आईकोनी येशोदेनें (आंग) धरणीवरी घातलें ॥ म्हणें माझे माझे तारू बुडालें ॥ जीवाचें जीवीत्व गेलें ॥ आजी माझें ॥८५॥
नंदें पीटीलें लल्हाट ॥ गौळीया जालें वाईट ॥ मग लागलें वाट ॥ येमुने डोहाचिये ॥८६॥
तया डोहाचीये कांठी ॥ येशोदा लल्हाट पीटी ॥ नंदे घातली मिठी ॥ उडी धालील म्हणोनियां ॥८७॥
ऐसा मांडला कोल्हाळ ॥ तंव देखिला गोपाळ ॥ नाथुनी माहाकाळ ॥ वरी बैसला ॥८८॥
तेथें काळयातें देखिलें ॥ तंव समस्ताचें मन कांटळलें ॥ म्हणती थोर अर्चियें जालें ॥ मग भेटले नंदा येशोदेसी ॥८९॥
समस्तासी क्षेमा अळींगन जाली ॥ मग गोकुळाप्रती आली ॥ मथुरेसी मात गेली ॥ जे काळया नाथीला गोविंदे ॥९०॥
राव सभामंडपासी आला ॥ तंव बंधु केसीया असे बैसला ॥ अक्रुरासी पुसता जाला ॥ आतां कवण वुद्धी करावी ॥९१॥
हा कृष्ण बळीवंत ॥ वीरांचा केला निपात ॥ राया तुम्हीं जावें त्वरित ॥ देवा इंद्रासी शरण ॥९२॥
तुमची न चले करणी ॥ तुम्हीं जावे ततक्षणी ॥ कुढावा करील वज्रपाणी ॥ तयावांचुनी नागवें हा ॥९३॥
मग कंस विमानी बैसला ॥ इंद्रावती प्रवेशला ॥ तंव येरें सन्मानिला ॥ म्हणें कवण्या कार्या बीजें केलें ॥९४॥
कंस म्हणें तुं आमचा कोवसा ॥ चींतलिया पावसी हा भरवसा ॥ येव्हडा केला वळसा ॥ ये नंदकुमरें ॥९५॥
सकळ वीर मारीले ॥ आणि येक राज्य करूं आदरिलें ॥ आम्हासी नव्हे भले ॥ म्हणोनि सांगावया आलों ॥९६॥
आतां स्वामी जानसी तें करी ॥ हा आम्हासी नागवे वैरी ॥ आतां भलतया परी ॥ नीर्दाळी हा ॥९७॥
तंव इंद्र म्हणे हा अवतारू ॥ त्यासी मीं विरोध कैसा करू ॥ हा अवतरला सर्वेश्वरु ॥ तो केवि आकळैल ॥९८॥
तंव कंस म्हणे देवराया ॥ हा शब्द बोलिलासी वाया ॥ हा दैत्य अतुर्बळीया ॥ यातें देवों झनीं म्हणाल ॥९९॥
तंव इंद्र म्हणें यैसें करुं ॥ याचा पाहो निर्धारु ॥ हा असैल परमेश्वरू ॥ तरी अपश्याच जाणवैल ॥६००॥

गोवर्घनाचा पाठारी ॥ तेथें तो गोधन चारी ॥ मीं वरसैन सीळाधारी ॥ तुझा वैरी मारीन मीं ॥१॥
म्हणोनि मस्तकी हात ठेविला ॥ कंस मागुता मथुरेसी आला ॥ तंव कृष्ण निघाला ॥ गोधनें चारुं ॥२॥
गोधनें सोडिली गोवर्धनावरी । आपण खेळें हमामा हुंबरी ॥ पावे तारफी मोंहरी ॥ वाजवीते जाले ॥३॥
यैसा खेळतु नानापरी ॥ तंव तडकु फुटला अंबरी ॥ मेघ वर्षले सीळांधारी ॥ तेणें धरत्री थरारिली ॥४॥
जंव वरुते गोपाळ पाहाती ॥ तंव आकाशमार्गे सीळा येती ॥ हात पांयें चुरा होती ॥ फुटती टांगी गोपाळाची ॥५॥
गाई पळोनी आलीया ॥ असुद्धे बोंबाळलीया ॥ वरीला घाईं भुळलीया ॥ तैसेंची जाले गोपाळांसी ॥६॥
गोपाळ म्हणती धांव धांव कान्हा ॥ वरुन पडती पाशान ॥ आंगी आदळती दारूण ॥ येकासी मूर्छना येती ॥७॥
येक येताती काकुळती ॥ असुधें भडभडा वाहाती ॥ येक गळ्या झोंबती ॥ तंव (श्री) पती बोलिला ॥८॥
ना भी ना भी रें अन करू ॥ धांवां रे हा डोंगर वरी धरू ॥ सीळांचा वरुषे पुरुं ॥ मग समस्त डोंगरू उचलिती ॥९॥
नुचलेचि गोवर्धनु ॥ दणदणा आदळती पाषानु ॥ मग हांसीनला मदसूदनु ॥ मीच गोवर्धन उचलेन ॥१०॥
परतें रें परतें म्हणें गोपाळां हरी ॥ गोवर्धनु उचलिला वामा करीं ॥ गाई गोवळे तयाभीतरी ॥ राखियेली देवें ॥११॥
इंद्र वरुषें सीळाधारी ॥ घाई दनानीतसे धरत्री ॥ तंव वरूषती गोकुळावरी ॥ माहा प्रचंड सीळा ॥१२॥
गौळीया जाली अपरांपरी ॥ इंद्र वरूषला सीळाधारी ॥ आंतु वरूषे घरोघरी ॥ तेथें कैची उरी गौळीयासी ॥१३॥
उपरिया धवळारें ॥ शतकूट होती दामोधरें ॥ पीठ जाळीत नघरें ॥ तंव नंदकुमरें कायें केलें ॥१४॥
गोवर्धनु उचलुनी वाम करी ॥ गोकुळ राखीलें तयाभीतरी ॥ तंव इंद्र मनी विचारी ॥ हा हरी रक्षेपाळु ॥१५॥
देव पाहाती आकाशपोकळी ॥ तंव कृष्णरायें लाविली डावी करांगुळी ॥ पर्वत उचलिला अंत्राळीं ॥ तया तळी सकळ गोकुळ राखिलें ॥१६॥
तंव इंद्र म्हणें अनुचित जालें ॥ आम्हीं विरोधु केला कंसाचेंन बोलें ॥ हे परब्रह्म अवतरलें ॥ मग वरुषले पुष्पवरूषाउ ॥१७॥
नाना पुष्पजाती ॥ देव कृष्णरायाची पुजा करिती ॥ मग संतोषले श्रीपती ॥ ठेविला गोवर्धनु ॥१८॥
गोकुळ राखिले हा प्रतीवादु थोरु ॥ नाव पावला गोवर्धनधरु ॥ मग चिंतावला कंसासुरू ॥ आतां विचारू काये कीजे ॥१९॥
नंद यशोदा म्हणें हरी ॥ भागलासी बा उचलितां गिरी ॥ गोकुळ राखिले सीळाशिखरीं ॥ विस्मो करी सकळ गोकुळ ॥२०॥
मग देवो वंदिला सकळ जनी ॥ ऐसें बोलती सकळ पुराणी ॥ देव बैसोनि विमानी ॥ करिती पुष्पवरुषावों ॥२१॥
मग या नंतरें काय केलें ॥ नंद मथुरेसी आले ॥ तें कंसासुरी पूजीलें ॥ षोडश उपचारी ॥२२॥
तेथें कृष्णरायाचा वृत्तांतु ॥ कंस पूर्व कथा असे सांगतु ॥ हा पराक्रमी असे समर्थु ॥ येणें घात केला सकळाचा ॥२३॥
यासी कांहीं न चले करणी ॥ तुम्हीं नारदा जावें ततक्षणी ॥ सांघावे ब्रह्मयालागुनी ॥ माझी धांवणी कर वेगीं ॥२४॥
मग नारद सत्यलोकास गेला ॥ सर्व वृत्तांत सांगितला ॥ गोकुळीं कृष्णरावों जन्मला ॥ हा कवणु पाहिइजे ॥२५॥
तंव ब्रह्मा म्हणें नारदमुनी ॥ आम्हीं पाहात असों ज्ञानी ॥ सकळ सृष्टी जाली मजपासुनी ॥ हा कवणी जन्मी घेतला ते न कळे ॥२६॥
हा आम्हा विरहित ॥ आणि माया विवर्जित ॥ हे पुसावी मात ॥ महादेवासी ॥२७॥
मग नारद कैळासा गेला ॥ तंव शंकर नारदें देखिला ॥ अर्ध सिंहासनी बैसविला ॥ मग पूजीला समस्ता गनीं ॥२८॥
मग नारदे शंकराते पुसिलें ॥ जी गोकुळी अपूर्व जाले ॥ अनंत पवाडे केलें ॥ येणें कृष्णनाथें ॥२९॥
तुम्हापासी पाठविले चतुराननें ॥ तो अवतारू धरिला त्रिनयनें ॥ हे तुम्हासी पुसणें ॥ म्हणोनि येणें जाले मज ॥३०॥
यावरी म्हणें शंकरू ॥ आम्हीं धरिला नाहीं अवतारू ॥ आम्हा कळला नाहीं निर्धारु ॥ मानवी कीं सुरु तुम्हीं पाहिजे ॥३१॥
तंव नारदु म्हणें त्रिपुरारी ॥ जैं इंद्र वरुषला सीळाधारी ॥ तेणें गोवर्धनु उचलीला वाम करी ॥ गोकुळ राखीलें पराक्रमें ॥३२॥
यावरी म्हणें शूळपाणी ॥ हे नव्हे मानवियाचीं करणी ॥ अवतरला असैल सारंगपाणी ॥ तुम्ही झडकरुनी पाहिजें ॥३३॥
मग नारदु आला सत्यलोका ॥ जाणविलें चतुर मुखा ॥ हा कळला नाहीं महेशादिका ॥ तुम्हींची ठांई घालिजे ॥३४॥
यावरी बोलिला चतुराननु ॥ याचा पाहो अनुमानु ॥ मागे अवतारू जाले महनु ॥ परि ऐसें सामर्थ्यें कवणा नाहीं ॥३५॥
आतां एक ऐसें करुं ॥ त्याचि वासुरवें गोपाळ चोरू ॥ जरी हा होईल परमेश्वरू ॥ तरि अपयशाच कळैल ॥३६॥
म्हणोनी ब्रह्मा मृत्यलोकासी आला ॥ कपट रूपें गोकुळीं राहिला ॥ तंव कृष्ण निघाला ॥ गोपाळांसहित ॥३७॥
नव लक्ष गोधनें नंदाचा घरी ॥ या वेगळी घरोघरी ॥ त्याची मोहर आली बाहेरी ॥ मग गाईं पाठारा चढलीयां ॥३८॥
वासुरवांचा मेळावा ॥ तो केला येकीसवा ॥ गोपाळ आणि बळीमद्र देवा ॥ जाणे जालें गोवर्धनावरी ॥३९॥
गाई वछें पसरें ॥ तवं पावा वाईला नंदकुमरें ॥ वेदध्वनीच्या उच्चारें ॥ वाते जालें ॥४०॥
सुस्वर नाद मुंजुळ ध्वनी ॥ ऐसा वेणु वाजविती चक्रपाणी ॥ तो ऐकोनि ॥ गाई धांवीनलियां ॥४१॥
त्या नादाचा ॐ कारू ॥ तेणें गाईचा चालिला भारू ॥ जैसें रणी बावन वीरु ॥ न संभाळीत धांवताती ॥४२॥
देव्हाडें चरणी उभा हरी ॥ वेणु वातसें दोही करीं ॥ तेयें देवो पाहो आले अंबरी ॥ खेळु राया मुरारीचा ॥४३॥
वेधें गाईवरी घातल्या माना ॥ गाईस न धरें पान्हा ॥ धारा सुटलीया गहना ॥ वोळला क्षीर सागरु ॥४४॥
खीरें उचंबळली मेदनीं ॥ तेणें गाई रुतलीया गुढघयापासुनी ॥ देवे विचारिलें मनीं ॥ जाला वासुरवें ॥४५॥
जयाचा जैसा वानू ॥ तैसाची जाला मदसूदनु ॥ दुधापान करुनु ॥ पुनरपी येकलाचि राहिला ॥४६॥
बळीमद्र विस्मो जाला ॥ म्हणें हा परमानंदु प्रकट जाला ॥ हा मनुषरुपें आला ॥ गोकुळामाजी ॥४७॥
देवीं केला पुष्पवरुषावों ॥ तंव ब्रह्मयानें केली मावों ॥ म्हणे आतां घेउनी जावों ॥ वासुरवां गोपाळातें ॥४८॥
मग तिये नेली सत्यलोका ॥ कांहीं न धरिच संका ॥ वछें गोपाळ नेली देखा ॥ घेउनी गेला ॥४९॥
तियेकाळी सिदोरिया ॥ मोटा सोडवी कान्हया ॥ सकळांतें वाटुनियां ॥ जेवितें जालें ॥५०॥
अग्नें नाना परीकरे ॥ परिमळें लाजिलें मोगरें ॥ कानवलें घृत साखरें ॥ दधीभात काळउनियां ॥५१॥
घारीया पुरीया तेलोरीया ॥ इडोरीया मांडे पुरीया ॥ अमुर्त फळें कठीया ॥ सुपरिमळा ॥५२॥
लोंणची रुचिकरें ॥ आंबे करवंदें भोकरें ॥ आली बेलें नींव आणिकें अपारें ॥ नाना परिची ॥५३॥
आरोगीतसे सवेश्वरू ॥ प्रसाद वाटीं मोक्षाकारु ॥ अमृतवरुषावो पडीभरु ॥ तेथें जाला ॥५४॥
तेथें क्षण येकु जाला ॥ तंव ब्रह्मा वत्सें गोपाळ घेउनी गेला ॥ वस्ते गोपाळ सांभाळुं गेला ॥ तंव तीये न देखेची ॥५५॥
वडजा वाकुडा पेंधा सुधामा ॥ बळमिद्र आणि कान्हा ॥ तव दीस गेला अस्तमाना ॥ गाई गोकुळां मोहरलियां ॥५६॥
बळीमद्र चौघांसहित ॥ पुढें गेला वाट दाखवीत ॥ मागे येकला राहिला गोपीनाथा ॥ मग विचारी मानसीं ॥५७॥
वत्से गोपाळ काय जाली ॥ तंव जाणितलें ब्रम्हे नेली ॥ मग सर्वज्ञरायें नटना केलीं ॥ आपण जाला वत्सें गोपाळ ॥५८॥
जयाचें जैसें लेंकरूं ॥ तैसेचि जाला सर्वेश्वरू ॥ जे जियेचें वासुरू ॥ वर्णु आकारू तैसाची ॥५९॥
मोरी तांबडी सावळी ॥ हरनी कोसीं सुद्ध काळी ॥ पुंडी लाखी बाहाळी धवळी पीवळी ॥ जाला कृष्णनाथु येकवेळें ॥६०॥
पांचशतें गोवळें ॥ येक काळें सावळें ॥ येळ गोरें भुरळें ॥ येक उंच खुजे वामन ॥६१॥
यजाचें जैसें बोलणें ॥ (जैसे) चालणें खेळणें ॥ जैसें पाहाणें (हंसणे) ॥ तैसाची नटला ॥६२॥
ऐसा गोकुळामाजि प्रवेशला ॥ आपुलाल्या घरासी गेला ॥ जें जें खुणे होत पहिला ॥ ते तैसेंची जाला येकवेळें ॥६३॥
जयाचें जैसें काम ॥ जयाचा जैसा आहार व्याम ॥ घेतें जाले मेघश्याम ॥ क्षीनामाजी ॥६४॥
ऐसयापरी प्रतिदिनी ॥ देवोंखेळें गोकुळी वृंदावनी ॥ परी नेणती कवणी । ऐसी माव केलीं ॥६५॥
ब्रह्मयाचा क्षण येकु भरला ॥ तंव येथेंचा संवस्छरू पालटला ॥ मग आपुले केलें पाहो आला ॥ मृत्यलोकासी ॥६६॥
गोकुळा येउनि पाहिले ॥ तंव वस्छें गोपाळ देखिलें ॥ म्हणें कव्हणी असैल आणीलें ॥ मज मागे जाउनियां ॥६७॥
जंव ज्ञानद्दष्टी पाहें ॥ तंव तेथेचि देखत आहे ॥ म्हणें हे नवल जाले काये ॥ म्हणोनि भुळला ब्रह्मा ॥६८॥
मग नारद म्हणें ताता ॥ आतां सरन रीघै अनंता ॥ हा अवतरला संपूर्णता ॥ सर्व सामर्थेसीं ॥६९॥
म्हणें हा होये परमेश्वरू ॥ याचा पाहावा नलगे निर्धारू ॥ येर म्हणिये येक करू ॥ ऐसें निरुतें जाण ॥७०॥
मग वत्सें गोधनें नीवडीली ॥ तीये वेगळाली चरो गेली ॥ मग कृष्णराये करी मोहरी घेतली ॥ आळविला पंचम वेदु ॥७१॥
वेद शास्त्र पुराणे ॥ वाजवीता छंद म्हणें ॥ गाईस आले पान्हें ॥ त्या धांवती देवावरी ॥७२॥
तेथें वासुरवाचा वेष धरी ॥ देवो आपण स्थानपान करी ॥ मुदल रूप मोहोरीं ॥ वाजवीते जालें ॥७३॥
यसा क्षण येकु जाला ॥ तंव नवलाव येक देखिला ॥ सकळ गोपाळ करिता जाला ॥ चतुरमुख ॥७४॥
आणि सकळ गोपाळ ब्रह्मेची देखता ॥ तेणें भुळला सत्यलोकीचा पिता । येक येक चुतुर्वेद पढता ॥ आणि घडिती अनंत ब्रह्मांडे ॥७५॥
ब्रह्मा पाहे आपुली मूर्ती ॥ तैसेची सकळ गोपाळ दिसती ॥ तेथेंहीं भुळला ब्रह्ममूर्ती ॥ नेणो हा कवण ठावों ॥७६॥
अवघे चतुर्मुख पटवर्धन ॥ ते करिंती चतुर्वेंद पठण ॥ ब्रह्मा विसरला आपुलेपण ॥ म्हणें आपुलीयाहुन सामर्थ्यें आगळें ॥७७॥
मग ब्रह्मा विचारी आपुले मई ॥ कवण बैसविला असैल माझे भुवनी ॥ तरि मज त्रिभुवनी ॥ ठावो नाहीं ॥७८॥
हा होये आत्मागमु ॥ आवतरलाते मेघश्यामु ॥ आतां सांडु आपुला भ्रमु ॥ रिधों शरण यासीच ॥७९॥
आतां पाहतां नीर्वाण ॥ येखादें उद्भवैल विघ्न दारुण ॥ जरी घेतले असैल माझे स्थान ॥ तरी तृनासमान मीं जालों ॥८०॥
मग म्हणें नारदमुनी ॥ आतां विचाराल झणी ॥ म्हणोनी लागले चरणी ॥ श्रीकृष्णरायाचीये ॥८१॥
तंव धरिला वरिच्यावरी ॥ म्हणें तुम्हीं पवित्र ब्रह्मचारी ॥ तुम्हीं काईसयावरी ॥ केला नमस्करु ॥८२॥
आम्ही विप्राचे चरण वंदुं ॥ तुम्हीं द्यावा आशिर्वादु ॥ या वचनावरी म्हणें नारदु ॥ आतां क्षमा करी देवराया ॥८३॥
नारदाचिया बोला हांसीला ॥ म्हणे म्हातारपणें भुलला ॥ मग अपराध उपसाहिला ॥ कृपावंतें ॥८४॥
तंव पुढें ब्रम्हा देखिला ॥ साष्टांगी नमस्कारु घातला ॥ मग कृष्णरायें आदरेंची आळंगिला ॥ उठोनि ब्रह्मयातें ॥८५॥
तंव हास्यें करुनि बोले मुरारी ॥ कवण भावेंसि तुझा शरीरी ॥ तुवां सांडुनीं आपुली नगरी ॥ कां येथवरी येणें जालें ॥८६॥
तुं सत्य लोकीचा दातारू ॥ मीं नंदाचा कुमरु ॥ मानवीया नमस्कारू ॥ कां करितां ॥८७॥
आमचें ब्राह्मण देवत ॥ वीसेष तुम्ही चतुर्मुख ॥ तुमचा नमस्कारू घेत ॥ दोष लागती आम्हां ॥८८॥
यावरी ब्रह्मया म्हणें ॥ जी तुम्हासी म्या ओळखिले खुणें ॥ तुं अवतरलासी जया कारणें ॥ ते मज कळले दातारा ॥८९॥
जें म्या अपराध थोर केले ॥ नेणोनि वत्सें गोपाळ नेले ॥ या शब्दा हांसीले ॥ परमानंद परियेसा ॥९०॥
पुनरपी घालुनी दंडवत ॥ देवो ब्रह्ययाकडे पाहोनी हांसत ॥ वृद्धपण येत येत ॥ हीन बुद्धि होतसे ॥९१॥
तंव ब्रह्मा म्हणें सर्वेश्वरा ॥ हा माझा अपराध क्षमा करा ॥ मग कृपा आली सारंगधरा ॥ आतां बीजें करा म्हणितलें ॥९२॥
म्हणें जय जये आनंदघना ॥ अपरांपरा मदुसूदना ॥ त्रिलोकेनाथा जनार्दना ॥ कृष्ण कृपाळुवा ॥९३॥
जयजयें अनंतमूर्ती दातारा ॥ जयजये अनंतअवतारा ॥ अव्यक्ता श्रीचक्रधरा ॥ नमन माझे ॥९४॥
जय यादवकुळटिळका ॥ जये भक्तीजनादायका ॥ सकळ देवद्विजनायका ॥ नमन माझें ॥९५॥
जयें जयें तुं बा मुरारी ॥ चौदा भुवने तुझा उदरी ॥ तुझीये घरची कामारी ॥ ते आकारी अनंत ब्रह्मांडें ॥९६॥
तीयेची आंगीची दीप्ती ॥ तेणें द्वादश सूर्यो लोपती ॥ त्याहीं शक्ती नेणती ॥ तुझा स्वरूपनिर्धारू ॥९७॥
पूर्वीं तुवां हंस अवतारू धरिला ॥ तैं मज ज्ञानाचा ठसा उमटला ॥ तेणें करितां मीं पातला ॥ स्वरुपनिर्धारु ॥९८॥
तेणें मीं जालो सरता ॥ आणि तुवाची मज स्थापिले अनंता ॥ तेणेंचि ज्ञानें अद्वैता ॥ गणित केलें ॥९९॥
तेचि ज्ञान सूर्यासी ठसावलें ॥ म्हणोनी दिव्य शरीर जालें ॥ तेची ज्ञान म्या उपदेसिलें ॥ मनुष्यादिकांसी ॥७००॥

तेथौनी हळुहळु मृत्यालोकां ॥ ते ज्ञान गेले जी विश्वव्यापका ॥ तेथीची वोळखी आईका ॥ नामेंची चाड ॥१॥
ते भावसहित जपीजे ॥ तरि तीर्थेंव्रतें कासया कीजे ॥ येके नामेची उद्धरिजे ॥ ते नाम पाहिजें ब्रह्मादिकांपासीं ॥२॥
तेची ब्रह्मविद्या कवण ॥ तीची वेदां न कळे खूण ॥ भुलली शास्रे पुराणे ॥ बोलती भलतेउतें ॥३॥
हे नामरूप तुझें ॥ तेची भूषण माझें ॥ मग आणीली गोपवछे ॥ त्या देवरायाचीं ॥४॥
म्हणें मीं नेणेची जी दातारा ॥ जो तुं परत्रीचा सोईरा ॥ आतां क्षमा करा ॥ देव देवा ॥५॥
वत्सें गोपाळ आणोनी ॥ ब्रह्मया जाली पेठवनी ॥ तो बैसोनि विमानी ॥ गेला सत्यलोकासी ॥६॥
मग गोकुळा जाती जाली वेळ ॥ पुढें गोधनें लाउनी सकळ ॥ मागे नृत्य करिती गोपाळ ॥ वाती मोहरी पावे ॥७॥
येक घालिती हंमां हुंमरी ॥ येक नटती नानापरी ॥ म्हणती देखिला मुरारी ॥ वरुषा येका ॥८॥
आतां अपुळालेया मायेबापासीं ॥ भेटो जाती गोकुळासी ॥ वरिसा येका आम्हासी ॥ राखिले ब्रम्ह्यानें ॥९॥
यैसे बोलत नाचत गेले ॥ आपुलाले मंदिरीं प्रवेशेलें ॥ मग धांवोनी गळीया झोंबीनले ॥ आम्हा सुंदरा संसारु म्हणौनियां ॥१०॥
तंव मायेबापें म्हणती काय जाले ॥ आवो आम्हासी ब्रह्मयानें चोरुनी नेले ॥ वरीष येक राखिले ॥ सत्यलोकीं ॥११॥
वछें आणी आम्हासी ॥ सोडिले आजीचा दिवसी ॥ मागील वेवस्ता कैसी ॥ ते आम्हीं नेणो ॥१२॥
तंव माय बापें म्हणती पुत्रासी ॥ आरे तुम्हासारीखे प्रतीदिवसीं ॥ वांसुरवें गाई सरींसीं ॥ आणी कृष्णनाथु ॥१३॥
तंव गौळीया वीस्मो थोरु जाला ॥ म्हणती हा परमेश्वरुची अवतरला ॥ यादववंशु उद्धरावयाला ॥ पुढें काईं होईल तें नेणीजे ॥१४॥
आतां येथौनी पुढे कथा ॥ सांग रे कृष्णदासा आता ॥ अवधान द्यावे स्त्रुतां ॥ पुढील कथा परियसा ॥१५॥

॥ प्रसंग ॥१०॥ दाहावा प्रसंग ॥

Translation - भाषांतर

Last Updated : 2016-11-11T12:53:05.0470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

sociotype

  • स्त्री. साचेबंद धारणा 
  • (also stereotype) 
RANDOM WORD

Did you know?

चतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.