अवतारवाणी - भजन संग्रह ३

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


एक तूं ही निरंकार (२१)

सारी सृष्टी बनली येथे तुझ्याच एक इशार्‍याने ।

पाऊस धारा पडती येथे तुझ्याच एक इशार्‍याने ।

ना हिम्मत मजमध्ये काही महिमा तव जाणून घेण्या ।

मजमध्ये इतुके बळ नाही करुं समर्पण मी आपणा ।

सत्य कार्य तेची जगती ज्याचा तुं करीसी स्वीकार ।

'अवतार' तूं आदि अंती आहे एक तुही तूची निरंकार ।

*

एक तूं ही निरंकार (२२)

लाखो जन हे तप आचरिती लाखो करीती स्नेह अपार ।

लाखो करीती पुजा तुझी लाखो करीती तव सत्कार ।

लाखो पंडीत वाचूनी पोथी पाठ तुझेची ऐकविती ।

उदास होऊन लाखो जनही वनांतरी तप आचरिती ।

लाखो जन लावुन समाधी चिंतन ध्यान तुझे करीती ।

केक असे धन दौलतवाले दानपुण्यही करताती ।

परी मजपाशी नाही शक्ति करावया तव महिमा गान ।

प्राणही सुद्धां तुझी देणगी प्राण कोणता करु मी दान ।

कार्य तेच उत्तम या जगती मानशील उत्तम तूची ।

आदि मध्य अंती राहणारा एक तू ही निरंकार तूची ।

*

एक तूं ही निरंकार (२३)

असंख्य असूनी तुझी मंदिरे शत कोटी नामे तुजला ।

मन बुद्धीही जिथे न पोहचे ऐसी जगती तव लीला ।

नानारिती तुला आळवुनी व्यर्थच भार असे घेणे ।

शब्दाची ही हेरा फेरी फिरवा फिरवी उगा करणे ।

खेळ अक्षरी आहे सारा गुणवंताचे गुण गाती ।

अक्षरातुनी बोल जाहले लिहिले अन् बदले जाती ।

देणारे लाखो या जगती दाता नाही गुरु समान ।

आजवरी 'अवतार' गुरुवीण कुणा न झाले याचे ज्ञान ।

*

एक तूं ही निरंकार (२४)

अंत न काही तव रचनेचा नसे अंत विस्ताराचा ।

सीमा तुझी न पाहता येई नाही अंत किनार्‍याचा ।

जाणु न शकले तिळभर तुजला नाना यत्‍ने आळवूनी ।

सारे कर्म करोनी थकले पंडितही गेले थकूनी ।

कळला नाही अंत परी तव नाही कळला थांग कुणा ।

असे करावा तितुका थोडा मान तुझ्या अन मोठेपणा ।

कुणी न जाणे कुणी नं समजे पावन उत्तम धाम तुझे ।

पवित्र सर्वाहुनही उत्तम निरंकार हे नाम तुझे ।

बुद्धीमान इतुका ना कोणी जो या तत्व रूपा जाणी ।

थेंब जळाचा होईल सागर मिळतां सागरी येऊनी ।

करी कृपा जर स्वयेची आपण तुष्ट आपणा करु शके ।

'अवतार' गुरु जर मिळेल पुरा क्षणी राम दाखवु शके ।

*

एक तूं ही निरंकार ( २५)

शुरवीर असो महाराजा ते ही मागती तुजपाशी ।

जीवजंतु विश्‍वातील सारे याचक ते याच्यापाशी ।

भाग्यहीन हे लाखो प्राणी दुर्जनही तैसे असती ।

रात्रंदिन दुःखान लोळूनी जीवनही हारूनी जाती ।

लाख करोडो खाऊन याचे दिले वचन विसरुन जती ।

मुर्ख क्षुद्र खाऊनी याचे उलटे याच्यावर फिरती ।

कैक हजारे ज्गतामाजी याचे यश अपयश करीती ।

बंदीवास ही तुझीच इच्छा तव इच्छेवर स्वायत्ता ।

म्हणे शके ना कोणी ऐसा ही इच्छा माझी इच्छा ।

मूर्ख कुणी दुष्टीचे दोषी दोषी तुजला ठरविती ।

काळाचा वर फटका पडतां तेव्हां शुद्धीवर येती ।

दया दृष्टी तव होई ज्यावर तयास करीशी जगी महान ।

मिळे जरी 'अवतार' सदगुरु होईल भिक्षुकही धनवान ।

*

एक तूं हि निरंकार (२६)

गुण तुझे आहेत अमोलक अमोल आहे तव भंडार ।

तब ग्राहकही अमोल असती अमूल्य आहे तव व्यापार ।

मोल तुझे हे पूर्ण सदगुरु कोण असा जो करु शके ।

अरस्तु वा लुकमान कुणीही भेद तुझा ना जाणु शके ।

लिहूनी ठेविले लेखही लाखो लाखो वेद पुराणांनी ।

कीर्ति गाता हार मानीली काखोही विदुवानांनी ।

ब्रह्मा विष्णु इंद्र देवही तुझीचा गाती यंशोस्तुती ।

तीर्थ दान दया तप संयम तुझेच ते पाणी भरती ।

तुच्छ असा जलबिंदु कधीही सागरास ना भरु शके ।

सर्व जगाची शक्ती मिळूनी यशोगान ना करु शके ।

अनंत आहे स्वामी माझा महिमा गाईल कोण कसा ।

'अवतार' म्हणे या संत कृपेने क्षणात भरेल रिक्त असा ।

*

एक तूं ही निरंकार (२७)

काय दखवु ठाव ठिकणा करु शके ना जिव्हा गान ।

अगणीत वाद्ये नाद असंख्य तुझीया द्वारी करीती गन ।

राग भैरवी ताल धरीतो गान गात नावे मल्हार ।

देवी देवता सारे गाती धर्मराज छेडितो तार ।

अडुसट तीर्थे साध करीती पर्‍या छेखती सुर व तान ।

सिद्ध समाधी लावून गाती गाती पंडित अन् विदवान ।

सत्य असा तूं स्वामी माझा नाम तुझे आहे सत्य ।

पूर्ण सदगुरु ज्यास मिळाला कळेल हे त्याला गुपित ।

जे आहे ते सर्व तुझी तू सृष्टीची तुंची रचिता ।

'अवतार' दास मी सकल जनांचा तुझी प्रभु ही महानता ।

*

एक तूं ही निरंकार (२८)

धीर भरोसा अंगी यावा राहो एक तुझा आधार ।

जगतामाजी राहून साधु अलीप्त कमलापरी आचार ।

खाणे पिणे तुझ्यामध्ये अन निवास माझा तव सदनी ।

गंगोदका परि निर्मलता दुजा भाव ना येवो मनी ।

हिंदु मुस्लीम भेद नसावा शिख इसाई मानी समान ।

महान असूनी लहान समजे उदारतेचा नकोच मान ।

धीर सबुरी अन समदृष्टी अलंकार हा संताचा ।

आणि प्रभु इच्छेत रहाणे साज हाच हरि भक्तांचा ।

संत हरीचे जिवलग माझे सदैव मजसंगे असती ।

'अवतार' म्हणे या संतजनांना नमन करू कोटी कोटी ।

*

एक तुं ही निरंकार (२९)

तीन देवांना मिळून म्हणती सृष्टी सारी बनविली ।

ब्रह्मा विष्णु महेश यांनी रचना सारी असे केली ।

एक बनवितो सृष्टीला अन एक देई खाण्या पिण्या ।

लेख करी कर्माचे तिसरा मृत्यु लोकी पोहचविण्या ।

खरे पहाता सर्व जगाचे एकची हा पालन करीतो ।

तैसे तैसे घडते येथे हुकुम ज्यापरी हा करीतो ।

देखरेख सर्वांची करुनी सर्व जीवांचे करीतो ध्यान ।

स्वये बसूनी पडदुयामागे बुद्धीला करीतो हैराण ।

नमस्कार हा माझा याला शीस झुकवूनी वारंवार ।

असे धारणा एकची याची पावन हाच म्हणे 'अवतरा' ।

*

एक तूं ही निरंकार (३०)

त्रैलोक्याचा मालक स्वामी युगे युगी भंडार भरी ।

दया उपजता येऊनी जगती पतीतांना भवपार करी ।

आपण पाहे आपण सजई जगताचा हा सृजनहार ।

हा राजा या नभ धरतीचा आणि हाच खरे सरकार ।

नत मस्तक होऊनी सदैव नमस्कार याला माझा ।

'अवतार' न मरे न जन्मे एकची वेष असे याचा ।

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP