मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तेरावा| श्लोक ६ वा अध्याय तेरावा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा एकनाथी भागवत - श्लोक ६ वा नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे. Tags : ekanathaekanathi bhagavatsantएकनाथएकनाथी भागवतसंत श्लोक ६ वा Translation - भाषांतर सात्त्विकान्येव सेवेत पुमान् सत्त्वविवृद्धये । ततो धर्मस्ततो ज्ञानं यावत् स्मृतिरपोहनम् ॥६॥ सात्त्विक द्रव्यें सेवितां । सत्त्ववृद्धी होय तत्त्वतां । सत्त्ववृद्धी पुरुषीं होता । धर्म स्वभावतां प्रवर्ते ॥६१॥ धर्मप्रवृत्ति माझें भजन । माझ्या भक्तिउल्हासें जाण । भक्तांसी मी होयें प्रसन्न । तैं स्वभावें ज्ञान प्रकाशे ॥६२॥ तत्त्वमस्यादि वाक्यव्युत्पत्ती । ते गुरुद्वारा ज्ञानाची प्राप्ती । तरी सत्त्वशुद्धित्वें धर्म भक्ती । कोणे अर्थीं सेवावी ॥६३॥ ऐसा विकल्प जरी तूं धरिसी । उद्धवा ऐक त्याही विचारासी । यथार्थ सांगेन तुजपाशीं । सत्त्वशुद्धीसी उपयोगू ॥६४॥ केवळ सत्त्वशुद्धीविण । जाहल्या गुरुवाक्याचें श्रवण । तें पां हाटगाण्याऐसें जाण । अनोळखपण स्वस्वरूपा ॥६५॥ आंधळें उपजलें जे कुशीं । स्तनपान करी अहर्निशीं । परी तें न देखे माउलीसी । दशा तैशी उपदेशा ॥६६॥ इंद्रियें सचेतनमेळीं । भगवंत सर्वांतें प्रतिपाळी । त्यातें न देखती विषयांधळीं । अतिअंध झालीं चित्तशुद्धीविण ॥६७॥ अजागळां लोंबते जाण । मिथ्या भाषण म्हणती ते स्तन । त्यापरी सत्त्वशुद्धीविण । वृथा जाण उपदेश ॥६८॥ वाहते उदकीं लिहले लेख । तळीं अक्षर नुमटे एक । तेवीं सत्त्वशुद्धीविण देख । निजज्ञान सुटंक प्रकटेना ॥६९॥ झाल्या आपादतां सत्त्वशुद्धी । जंव प्रकटेना धर्मबुद्धी । तंव निजज्ञानाची नव्हे सिद्धी । जेवीं ग्रहणामधीं चंद्रमा ॥१७०॥ ऐकतां हरिकथाश्रवण । बाष्प रोमांच स्वेद रुदन । रुका वेंचितां जाय प्राण । तेथेंही ब्रह्मज्ञान प्रकटेना ॥७१॥ हृदयींचा लोभ जंव न तुटे । तंव निश्चयज्ञान कैंचे भेटे । सत्त्वशुद्धिधर्मू जैं प्रकटे । तैं निजज्ञाननेटें सुपंथीं लागे ॥७२॥ ते चालतां धर्मपंथीं । जै माझी भक्ति होय सांगाती । तैं चोरांची न पडे गुंती । शीघ्रगती मज पावे ॥७३॥ ते भक्तीचा सांडितां सांगातू । पुढील अनोळख महापंथू । तेथ कामक्रोध करिती घातू । विकल्पआवर्तू बुडविती ॥७४॥ भाग्येंवीण माझी भक्ती । प्राण्यासी नव्हे गा सांगाती । जिचे संगें चालतां पंथीं । अल्पही गुंती पडेना ॥७५॥ माझे भक्तीसवें महाशूर । नांवाणिगे नवविध वीर । सत्रदबद्ध सदा समोर । महाझुंझार निजबोधें ॥७६॥ यालागीं माझे भक्तीविण । सहस्त्रधा केल्या श्रवण मनन । माझी प्राप्ति नव्हे जाण । भजनें पूर्ण मत्प्राप्ती ॥७७॥ सर्व भूतीं भगवद्भावो । या नांव मुख्यभक्ति पहा हो । ते सांगाती झालिया स्वयमेवो । कामक्रोधमोहो न शकती बाधूं ॥७८॥ साक्षेपें नेऊनि घागरी । पालथी घातल्या गंगासागरीं । जळबिंदु रिघेना भीतरीं । तैशी परी महावाक्या ॥७९॥ यालागीं अत्यादरेंसीं जाण । धर्मयुक्त माझें भजन । करितां मी होय प्रसन्न । मत्प्रसादें ज्ञान प्रकाशे ॥१८०॥ लोभ ठेऊनि अर्थस्वार्थीं । कोरडी करितां माझी भक्ती । मी प्रसन्न नव्हें श्रीपती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८१॥ जो धनें मनें काया वचनें । वेंचूनि भजे मजकारणें । त्यासीच म्यां प्रसन्न होणें । जेवीं चंद्रकिरणें चकोरा ॥८२॥ व्याली धेनु वत्सा वोरसे । तेवीं मी तुष्टें अतिसंतोषें । तेवीं माझेनि प्रसादवशें । माझें ज्ञान प्रकाशे मद्भक्तां ॥८३॥ सगुण सुंदर आणि पतिव्रता । अतिशयें पढियंती होय कांता । तिसी सर्वस्व दे न मागतां भर्ता । तेवीं मी मद्भक्तां प्रसन्न ॥८४॥ माझेनि प्रसादें प्रकाशे ज्ञान । श्रुति स्मृती नांव म्हणती जाण । सविलास अविद्यानिरसन । 'अपोहन' या नांव ॥८५॥ गुणास्तव देह जाण । देहास्तव उपजे ज्ञान । तेणें ज्ञानें गुणनिर्दळण । देहनिरसन न घडे म्हणसी ॥८६॥ हे गोष्टी तूं म्हणसी कुडी । कीं पक्षी आपुले पांख मोडी । नारळ नारळीतें तोडी । स्वमांसाची गोडी व्याघ्र चाखे ॥८७॥ हें न घडतें जैं घडों बैसे । तैं देहींचेनि ज्ञानें गुणदेह नासे । हा विकल्पू धरिसी मानसें । ऐक अनायासें तो निरासू ॥८८॥ N/A References : N/A Last Updated : September 19, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP