मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय पाचवा|
श्लोक ३७ वा

एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


न ह्यतः परमो लाभो, देहिनां भ्राम्यतामिह ।

यतो विन्दत परमां शान्तिं नश्यति संसृतिः ॥३७॥

जे जन्ममरणांच्या आवर्तीं । पडिले, संसारीं सदा भ्रमती ।

त्या प्राणियां कलियुगाप्रती । कीर्तनें गती नृपनाथा ॥२२॥

कलियुगीं कीर्तनासाठीं । संसाराची काढूनि कांटी ।

परमशांतिसुखसंतुष्टीं । पडे मिठी परमानंदीं ॥२३॥

ऐसा कीर्तनीं परम लाभु । शिणतां सुरनरां दुर्लभु ।

तो कलियुगीं झाला सुलभु । यालागी सभाग्यां लोभु हरिकीर्तनीं ॥२४॥

'कीर्तनास्तव चारी मुक्ती । भक्तांपासीं वोळंगती ।

हें न घडे ' कोणी म्हणती । ऐक ते स्थिती नृपनाथा ॥२५॥

कीर्तनीं हरिनामाचा पाठा । तेणें देवासी संतोष मोठा ।

वेगीं सांडोनि वैकुंठा । धांवे अवचटा कीर्तनामाजीं ॥२६॥

हरिकीर्तना लोधला देवो । विसरला वैकुंठा जावों ।

तोचि आवडला ठावो । भक्तभावो देखोनी ॥२७॥

जेथ राहिला यदुनायक । तेथचि ये वैकुंठलोक ।

यापरी मुक्ति 'सलोक' । कीर्तनें देख पावती भक्त ॥२८॥

नामकीर्तन-निजगजरीं । भक्तां निकट धांवे श्रीहरी ।

तेचि 'समीपता' मुक्ति खरी । भक्तांच्या करीं हरिकीर्तनें ॥२९॥

कीर्तनें तोषला अधोक्षज । भक्ता प्रत्यक्ष गरुडध्वज ।

श्याम पीतवासा चतुर्भुज । तें ध्यान सहज ठसावे ॥४३०॥

भक्तु कीर्तन करी जेणें ध्यानें । तें ध्यान दृढ ठसावें मनें ।

तेव्हां देवाचीं निजचिन्हें । भक्तें पावणें संपूर्ण ॥३१॥

श्याम चतुर्भुज पीतांबरधारी । शंखचक्रादि आयुधें करीं ।

हे 'सरूपता' भक्तातें वरी । कीर्तनगजरीं भाळोनी ॥३२॥

तेव्हां देव भक्त समसमान । समान अवयव सम चिन्ह ।

भावें करितां हरिकीर्तन । एवढें महिमान हरिभक्तां ॥३३॥

दोघां एकत्र रमा देखे । देवो कोण तेंही नोळखे ।

ब्रह्मा नमस्कारीं चवके । देवो तात्विकें न कळे त्यासी ॥३४॥

भावें करितां हरिकीर्तन । तेणें संतोषे जनार्दन ।

उभयतां पडे आलिंगन । मिठी परतोन सुटेना ॥३५॥

तेव्हां सबाह्यांतरीं । देवो प्रगटे चराचरीं ।

दुजें देखावया संसारीं । सर्वथा उरी उरेना ॥३६॥

वृत्ति स्वानंदीं निमग्न । परतोनि कदा नव्हे भिन्न ।

'सायुज्यमुक्ति' या नांव पूर्ण । जेणें दुजेपण असेना ॥३७॥

ऐशी लाहूनि पूर्ण सायुज्यता । तो जैं करी हरिकथा ।

ते कथेची तल्लीनता । जीवां समस्तां अतिप्रिय ॥३८॥

यापरी हरिकीर्तनापासीं । चारी मुक्ती होती दासी ।

भक्त लोधले हरिभजनासी । सर्वथा मुक्तीसी न घेती ॥३९॥

एवं योगयागादि तपसाधनें । पोरटीं केलीं हरिकीर्तनें ।

कलियुगीं नामस्मरणें । जड उद्धरणें हरिकीर्तनीं ॥४४०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP