मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय दुसरा|
श्लोक १७ वा

एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायणपरायणः ।

विख्यातं वर्षमेतद्यन्नाम्ना भारतमद्भुतम् ॥१७॥

जो ज्येष्ठपुत्र ’भरत’ जाण । तो नारायणपरायण ।

अद्यापि ’भरतवर्ष’ उच्चारण । त्याचेनि नांवें जाण विख्यात ॥३७॥

जो मनसा-वाचा-कर्मणा । अखंड भजे नारायणा ।

असतांही राज्यधर्मी जाणा । जो आत्मखुणा न चुके ॥३८॥

जेवीं मार्गीं चालतां । पाउलें वक्रेंही टाकितां ।

दैववशें अडखुळतां । आश्रयो तत्त्वतां भूमिकाचि ॥३९॥

तेवींचि तयासी असतां । राज्यधर्म चाळितां ।

यथोचित कर्म आचरतां । निजीं निजात्मता पालटेना ॥१४०॥

या नांव बोलिजे ’अखंडस्थिती’ । जे पालटेना कल्पांतीं ।

जेथ असतां सुखी होती । पुनरावृत्ति असेना ॥४१॥

ऐसें करी सदाचरण । आणि नारायणपरायण ।

आईक त्याचेंही व्याख्यान । विशद करुन सांगेन ॥४२॥

नरांचा समुदाय गहन । त्यासी ’नार’ म्हणती जाण ।

त्याचें ’अयन’ म्हणजे स्थान । म्हणौनि म्हणती ’नारायण’ आत्मयासी ॥४३॥

त्याच्या ठायीं परायण । म्हणिजे अनन्यत्वें शरण ।

निवटूनियां आपुलें अहंपण । तद्रूपें जाण राहिला ॥४४॥

ऐसा तो ऋषभाचा पुत्र । जयासी नांव ’भरत’ ।

ज्याच्या नामाची कीर्ति विचित्र । परम पवित्र जगामाजीं ॥४५॥

तो भरतु राहिला ये भूमिकेसी । म्हणौनि ’भारतवर्ष’ म्हणती यासी ।

सकळ कार्यारंभीं करितां संकल्पासी । ज्याचिया नामासी स्मरताति ॥४६॥

ऐसा आत्माराम जर्‍ही झाला । तर्‍ही विषयसंग नव्हे भला ।

यालागीं त्याचा वृत्तांतु पुढिला । सांगेन सकळां आइकें ॥४७॥

नामें ख्याती केली उदंड । यालागीं त्यातें म्हणती ’भरतखंड’ ।

आणीकही प्रताप प्रचंड । त्याचा वितंड तो ऐका ॥४८॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP