मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|कांकडआरती| पंचप्राण काकड आरती तत्त्व... कांकडआरती उठा उठा हो साधक, साधा आपु... भक्तीचिये पोटीं बोध-कंकडा... भक्तीचिंये पोटीं बोध -का... उठा पांडुरंगा आतां दर्शन ... कांकड -आरती परमात्मया रघु... श्रीगुरुदत्ता कांकड आरती ... पंचप्राण काकड आरती तत्त्व... काकड आरती स्वामी श्रीगुरु... काकडे आरती दत्ता तुजला ओव... कांकडआरती श्रीदत्तप्रभूची - पंचप्राण काकड आरती तत्त्व... कांकडआरती श्रीदत्तप्रभूची Tags : aratidattaआरतीकांकड आरतीदत्त कांकडआरती श्रीदत्तप्रभूची Translation - भाषांतर पंचप्राण काकड आरती तत्त्वात्मक ज्योती । लावुनि तत्त्वात्मक ज्योती । ओवाळिला श्री त्रयमूर्तिं परमात्मा प्रीती ॥ध्रु०॥ ओवाळूं आरती माझ्या सद्गुरुनाथा । स्वामी श्रीगुरुनाथा । शरण मी आलो तुज । शरण मी आलो तुज । श्री पदीं ठेवियला माथा ॥१॥ कृष्णा सुपंचगंगा अनादि संगमीं । राहे यतिवर तरुतळीं । तो हा माझा कुलस्वामी । ओवाळूं०॥२॥ द्वारीं चौघडा वाजे वाजंत्री वाजती । कर्णे वाजंत्री वाजती। नाना घोषें गर्जत । नाना वाद्यें गर्जत । भक्त स्वानंदें स्तविती ॥ओवाळूं ॥३॥ इंद्रादि सुरवर पन्नग दर्शनास येती। श्रीचे दर्शनास येती । नारद मुनिवर किंन्नर तुंबर आळविती ॥ओवाळूं॥४॥ पाहुनि सिंहासनीं आदि मूर्ति सांवळी । चिन्मय मूर्ति सांवळी । श्रीगुरुभक्त तन्मय । श्रीगुरुभक्त निर्भय श्रीपदीं ओवाळी ॥ओवाळूं॥५॥ N/A References : N/A Last Updated : August 30, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP