बलिप्रतिपदा

दिपावली म्हणजे दीपोत्सव. हा उत्सव साजरा करुन भोवतालचा अंधार नाहीसा करणे. ‘तमसो मा ज्योर्तिगमय’ म्हणजेच दिवाळी साजरी करणे दिवा ज्ञानाचे प्रतिक आहे.


बलिप्रतिपदा-पाडवा हा तर पुन्हा दिवाळीतील पती-पत्‍नींच्या स्नेहसंबधातली ठेव-मर्म जपणारा, जोगवणारा, वाढवणारा माधुर्यवर्धक सण. सासू-सासर्‍यांनी दिवाळ सण म्हणून जावईबापूंचे भरभरून कौतुक लाड करण्याचा. पतीने पत्‍नीचे लाड-हट्ट पुरविण्याचा हा गोड सण. पत्‍नीने पतीला ओवाळून (नीरांजन विधी) हवी ती भेट वसूल करण्याचा स्त्रीहट्ट पुरवून घेण्याचा हा दिवस. याची खुमारी ज्याची त्यानेच अनुभवावी. महावीर जैन संवत २५३३ ची कालगणनाही या दिवसापासून चालू होते. याच दिवशी सौर हेमंत हा ऋतू आणि भारतीय कार्तिक मासारंभ होतो.

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP